Video : चहलच्या बायकोचे पुन्हा लटके-झटके; पडद्याआडून युजवेंद्र प्रेक्षक, धनश्री म्हणते…

अमेरिकन रॅपर टी पेन याच्या 'बुटी वुर्क' गाण्यावर धनश्री वर्माचे लटके झटके पाहायला मिळाले. घराच्या गॅलरीत तिने हा जबरदस्त डान्स केला. हा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षक म्हणून तिचा नवरा युजवेंद्र चहल पडद्याआडून होता. (Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Rocking Dance)

Video : चहलच्या बायकोचे पुन्हा लटके-झटके; पडद्याआडून युजवेंद्र प्रेक्षक, धनश्री म्हणते...
धनश्री वर्मा

मुंबई :  टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची बायको धनश्री वर्मा (Dhanashree Verma ) पाठीमागच्या काही दिवसांपासून अचडणीत सापडले होते. चहलच्या आई बाबांना कोरोनाची बाधा झाली होती तर धनश्रीच्या आई आणि भावाला देखील कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता दोघांच्याही कुटुंबातले सदस्य ठीक आहेत. घरातील सदस्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे युजवेंद्र आणि धनश्रीने सुटकेचा निश्वास सोडलाय. ते आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झालेत. याचीच झलक पाहायला मिळाली ती नुकत्याच व्हायरल झालेल्या धनश्री वर्माच्या व्हिडीओतून…! (Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Rocking Dance instagram Video)

धनश्रीचे ठुमके, युजवेंद्र पडद्याआडचा प्रेक्षक

सोमवारी सोशल मीडियावर अमेरिकन रॅपर टी पेन याच्या ‘बुटी वुर्क’ गाण्यावर धनश्री वर्माचे लटके झटके पाहायला मिळाले. घराच्या गॅलरीत तिने हा जबरदस्त डान्स केला. हा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षक म्हणून तिचा नवरा युजवेंद्र चहल पडद्याआडून होता. पडद्याच्या आडून युजवेंद्रने धनश्रीच्या अदा पाहिल्या. डान्स सुरु असताना युजवेंद्र सारखाच बाहेर डोकं काढून धनश्रीच्या अदा डोळ्यात टिपत होता.

धनश्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “जेव्हा तुमचा सर्वोत्तम प्रेक्षक तुमचा डान्स पाहतो, ते म्हणतात ना वर्क फ्रॉम होम… त्याला माझ्या व्हिडीओत दिसायचंय.. आता तुम्हाला समजेल की पाठीमागच्या आणि आताच्या व्हिडीओत काय फरक आहे…”

कोण आहे चहलची बायको धनश्री वर्मा?

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यानंतर दोघं विवाहबंधनात अडकलेत.

धनश्रीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

धनश्री अधून मधून आपल्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. तिचे व्हिडीओ चाहत्यांना कमालीचे आवडतात. तिचा नुकताच चहलची पोलखोल केलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसंच भारतीय संघाचा खेळाडू श्रेयस अय्यरसोबतचा तिच्या डान्सचा व्हिडीओ देखील तुफान लोकप्रिय झाला होता.

(Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Rocking Dance instagram Video)

हे ही वाचा :

‘काळ कठीण पण लढाई नक्की जिंकू’, कोरोनाविरोधी लढ्यात भाऊ-भाऊ मैदानात, हार्दिक-कृणालकडून मदतीची घोषणा

WTC Final : न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विराट-रोहित नव्हे, तर टीम इंडियाच्या ‘या’ नवख्या खेळाडूची धास्ती

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात BCCI मैदानात, 2000 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स देण्याची घोषणा