YouTube च्या नियमांमध्ये बदल, तुमचं चॅनल कधीही बंद होऊ शकतं

गुगलची व्हिडीओ स्ट्रीमिंग साईट युट्यूबने (YouTube) आपल्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. युट्यूबचे नवे नियम युट्यूबर्ससाठी डोकेदुखी ठरु शकतात

YouTube Policy Changed, YouTube च्या नियमांमध्ये बदल, तुमचं चॅनल कधीही बंद होऊ शकतं

मुंबई : गुगलची व्हिडीओ स्ट्रीमिंग साईट युट्यूबने (YouTube) आपल्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. युट्यूबचे नवे नियम युट्यूबर्ससाठी डोकेदुखी ठरु शकतात (YouTube Policy Changed). युट्यूबने नवे नियम जारी करत सांगितलं की, जर कुठल्या चॅनलमुळे युट्यूबची कमाई होत नसेल, तर ते चॅनल डिलीट केलं जाईल किंवा त्यावर निर्बंध लावले जातील (YouTube Policy Changed).

युट्यूबने “Account Suspension & Termination” नावाने एक ब्लॉग प्रकाशित केला आहे. या अंतर्गत जर तुमच्या युट्यूब चॅनलने कंपनीची कमाई होत नाही, तर युट्यूब तुमचं अकाऊंट किंवा चॅनल डिलीट करेल. युट्यूबचे नवे नियम 10 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. मात्र, यामध्ये किती दिवसांपर्यंत चॅनलपासून कमाई झाली नाही तर चॅनल डिलीट केलं जाईल याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

YouTube Policy Changed, YouTube च्या नियमांमध्ये बदल, तुमचं चॅनल कधीही बंद होऊ शकतं

म्हणजेच, जर तुमचं युट्यूब चॅनल मोनोटाईज झालं नाही, तर तुमचं चॅनल कुठल्याही क्षणी बंद होऊ शकतं. यासंबंधी युट्यूबने गेल्या आठवड्यात युट्यूबर्सला ई-मेल पाठवला आहे. तसेच, युट्यूबच्या नव्या नियमांनुसार जर कुणाला त्यांचं चॅनल डिलीटच होण्याची भीती असेल तर तुम्ही तुमचा कंटेट डाऊनलोड करु शकता, असंही युट्यूबने सांगितलं आहे.

युट्यूबच्या नव्या नियमांनुसार, युट्यूबकडे आता तुमचं चॅनल डिलीट करण्याचा अधिकार आहे. मात्र, कंपनी तुमचं चॅनल बंद करण्यापूर्वी तुम्हाला नोटीस पाठवेल. जे चांगले व्हिडीओ बनवतात, ज्यांचे बऱ्यापैकी सब्सक्राईबरही आहेत, पण त्यांचं चॅनल मोनेटाईज नाही, अशा युट्यूबर्सलाही युट्यूबच्या या नव्या नियमांचा फटका बसणार आहे.

एकूणच काय तर, तुम्हाला तुमचं युट्यूब चॅनेल सुरु ठेवायचं असेल तर तुम्हाला त्यातून कमाई करावी लागणार आहे. कारण जर तुम्ही कमाई कराल, तर कंपनी कमाई करेल आमि कंपनीला फायदा होणार असेल तर ती तुमचं चॅलन डिलीट करणार नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *