AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा iPhone नवीन आहे की जुना? फक्त या एका अक्षरातून मिळवा संपूर्ण माहिती

iPhone विकत घेताना तो नवीन आहे की रिफर्बिश्ड, हे ओळखणं महत्त्वाचं असतं. बहुतांश लोकांना माहितच नसतं की मॉडेल नंबरच्या पहिल्या अक्षरातून ही माहिती मिळते. चला, ‘M’, ‘F’, ‘N’, ‘P’ चा अर्थ आणि तपासण्याची पद्धत जाणून घेऊ.

तुमचा iPhone नवीन आहे की जुना? फक्त या एका अक्षरातून मिळवा संपूर्ण माहिती
iphone
| Edited By: | Updated on: Jul 08, 2025 | 4:05 PM
Share

तुमच्याकडे iPhone आहे का? किंवा तुम्ही नवीन iPhone घेण्याचा विचार करत आहात का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. कारण तुमच्या iPhone चा मॉडेल नंबर खूप काही सांगतो अगदी तो नवीन आहे की रिप्लेस केलेला, रिफर्बिश्ड आहे की खास ऑर्डरचा, हे सर्व! विशेष म्हणजे iPhone च्या मॉडेल नंबरच्या पहिल्या अक्षरावरून तुम्हाला हे सर्व समजू शकतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे 90 टक्क्यांहून अधिक लोकांना हे अजूनही माहित नाही.

मॉडेल नंबर सांगतो iPhone ची ओळख

तुमचा iPhone ओरिजिनल आहे की दुसऱ्यांदा तयार केलेला आहे, हे तपासण्यासाठी सर्वप्रथम सेटिंग्स > अबाउट (About) या सेक्शनमध्ये जावं लागतं. तिथं मॉडेल नंबर दिसेल. त्या नंबरचा पहिला अक्षर तुमच्या iPhone ची खरी ओळख सांगतो. हा कोड Apple कडून दिला जातो आणि यावरून उत्पादनाची मूळ माहिती समजते. चला तर मग पाहूया त्या अक्षरांचे अर्थ:

  • M : हा iPhone नवीन आहे आणि ओरिजिनल रिटेल युनिट म्हणून विकला गेला आहे.
  • F : हा फोन रिफर्बिश्ड युनिट आहे, म्हणजे वापरण्यात आलेला आणि नंतर दुरुस्त करून पुन्हा विक्रीसाठी आणलेला.
  • N : हा फोन रिप्लेस केला गेलेला युनिट आहे. म्हणजे मूळ iPhone मध्ये काही समस्या आल्यामुळे Apple ने वापरकर्त्याला नवीन युनिट रिप्लेस करून दिला.
  • P : हा iPhone पर्सनलाइज्ड युनिट आहे, म्हणजे वापरकर्त्याने खास ऑर्डर देऊन घेतलेला, जसे engraving किंवा कस्टम सेटिंग्ससह.

हे लक्षात घेतल्यास तुम्हाला सहज कळू शकतं की तुमचा iPhone नेमका कोणत्या श्रेणीत मोडतो.

तुमचा iPhone कोणत्या देशात बनलाय?

फक्त पहिलं अक्षरच नाही, तर मॉडेल नंबरच्या शेवटच्या काही शब्दांवरून देखील महत्त्वाची माहिती मिळते तो iPhone कोणत्या देशासाठी तयार केला गेला आहे, हे त्यावरून समजतं. खाली दिलेली कोड्स त्या देशांचे प्रतिनिधित्व करतात:

  • HN/A – India
  • J/A – Japan
  • ZA/A – Singapore
  • CH/A – China
  • KH/A – South Korea
  • LL/A – USA
  • B/A – UK
  • AE/A – UAE

उदाहरणार्थ, जर तुमच्या iPhone चा मॉडेल नंबर MN572HN/A असा असेल, तर त्याचा अर्थ ‘M’ मुळे तो नवीन युनिट आहे आणि ‘HN/A’ मुळे तो भारतासाठी डिझाइन केलेला आहे.

ही माहिती का महत्त्वाची आहे?

आजच्या काळात iPhone विकत घेणं ही एक मोठी गुंतवणूक आहे. अनेकदा ऑनलाइन किंवा ऑफलाइन मार्केटमध्ये वापरलेले किंवा रिफर्बिश्ड फोन ‘नवीन’ म्हणून विकले जातात. त्यामुळे अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी ही छोटी पण प्रभावी माहिती फार मोलाची ठरते. जर तुम्ही सेकंड हँड iPhone विकत घेत असाल, तर त्याचा मॉडेल नंबर तपासणं अत्यावश्यक आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.