फोनचे स्टोरेज वाढवताना ‘हे’ उपाय नक्की करा, नाहीतर होईल मोठ नुकसान !
फोनचे स्टोरेज वाढवणं जितकं सोपं वाटतं, तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं जर योग्य खबरदारी घेतली नाही. चुकीची मेमरी कार्डं, थर्ड पार्टी अॅप्स किंवा अनोळखी फाइल्समुळे तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो किंवा फोन स्लो होऊ शकतो. त्यामुळे ‘हे’ आवश्यक उपाय जरूर करा आणि सुरक्षित रहा

फोनचे स्टोरेज एकदा का भरलं , की अनेक अडचणी येतात. फोन हळू चालतो, स्पेस क्लिअर होत नाही. यामुळे फोन बदलण्याची वेळ आली, असं वाटतं. पण थांबा! काही सोप्या पद्धतींनी फोनची स्टोरेज वाढवता येते. नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी या चुका टाळा आणि स्टोरेज मोकळी करा. चला, जाणून घेऊया पाच सोप्या टिप्स.
1. व्हॉट्सॲप हे प्रत्येकाच्या फोनमध्ये असतं. रोजच्या गप्पांमध्ये फोटो, व्हिडिओ, कागदपत्रं आणि मेसेज शेअर होतात. हे सर्व फोनची स्टोरेज भरून टाकतात. अनेकांना याची जाणीवच नसते. अनावश्यक चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ नियमित डिलीट करा. गरजेचे फोटो आणि व्हिडिओ बॅकअप घेऊन मोकळी जागा बनवा.
2. फोनमध्ये अशी अनेक ॲप्स असतात, जी तुम्ही कधीच वापरत नाही. काही ॲप्स बॅकग्राऊंडमध्ये चालत राहतात किंवा अपडेट होतात. यामुळे स्टोरेज आणि प्रोसेसरवर ताण येतो. अशी ॲप्स डिलीट करा. ज्या ॲप्सचा वापर क्वचित होतो, त्यांना अपडेट होण्यापासून थांबवा. यामुळे फोनची गती सुधारेल.
3. फोनमध्ये फोटो आणि व्हिडिओ खूप जागा व्यापतात. डिलीट करताना सगळं गरजेचं वाटतं. अशावेळी महत्त्वाचे फोटो आणि व्हिडिओ एसडी कार्ड, पेन ड्राइव्ह किंवा क्लाऊड स्टोरेजवर हलवा. गुगल ड्राइव्ह किंवा वन ड्राइव्हसारख्या सेवा वापरून बॅकअप घ्या. यामुळे फोनची जागा मोकळी होईल.
4. काही ॲप्स तात्पुरत्या फाइल्स जमा करतात. सर्च हिस्ट्री, युजर सेटिंग्ज किंवा ब्राउझर डेटा यासारख्या गोष्टी स्टोरेज भरतात. फोनच्या सेटिंग्जमधून कॅशे डेटा नियमित डिलीट करा. यामुळे फोन हलका होतो आणि गती वाढते. ब्राउझर आणि ॲप्स च्या कॅशे फाइल्सवर लक्ष ठेवा.
5. अनेकदा आपण आवडते चित्रपट, गाणी किंवा फाइल्स डाउनलोड करतो आणि डिलीट करायला विसरतो. फोनच्या फाइल मॅनेजरमध्ये जा. अनावश्यक डाउनलोड्स तपासा आणि डिलीट करा. यामुळे स्टोरेजमध्ये बरीच जागा मोकळी होऊ शकते. डाउनलोड फोल्डर नियमित तपासण्याची सवय लावा.
