AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AC चा कंप्रेसर वारंवार बंद होतोय? ही लक्षणं हलक्यात घेऊ नका; घरबसल्या सोपा उपाय जाणून घ्या!

AC चा कंप्रेसर वारंवार बंद होणे किंवा सतत चालू राहणे ही गोष्ट केवळ आपल्याला त्रास देत नाही, तर उपकरणाच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेलाही धोका निर्माण करते. त्यामुळे अशी लक्षणं आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित या टीप्स घरच्या घरी फॉलो करा आणि मोठा धोका होण्यापासून टाळा.

AC चा कंप्रेसर वारंवार बंद होतोय? ही लक्षणं हलक्यात घेऊ नका; घरबसल्या सोपा उपाय जाणून घ्या!
AC CompressorImage Credit source: TV9 Telugu
| Edited By: | Updated on: Jun 29, 2025 | 2:07 AM
Share

दिवस उन्हाळ्याचे असो वा पावसाळ्याचे घरातील एअर कंडिशनर (AC) हा जणू एक आवश्यक भागच बनला आहे. पण जर तुमच्या AC चा कंप्रेसर सतत बंद होत असेल, किंवा तापमान सेट केल्यानंतरही बंद न होत चालूच राहत असेल, तर ही समस्या केवळ मशीनमधली नसून त्यामागे काही खास तांत्रिक कारणंही असू शकतात. अशा वेळी चिंता करण्याऐवजी या समस्येचं मूळ कारण ओळखून त्यावर उपाय करणे महत्त्वाचे ठरते.

जर कंप्रेसर योग्य वेळी ऑन-ऑफ होत नसेल, तर ही समस्या थर्मोस्टेट वायर किंवा सेंसरमुळे उद्भवू शकते. थर्मोस्टेट सेंसर AC ला खोलीच्या तापमानानुसार सिग्नल देतो. जर वायर ढिली, तुटलेली किंवा चुकीची जोडलेली असेल, तर कंप्रेसर चुकीचे सिग्नल घेऊन सतत चालू राहत असतो किंवा अचानक बंद होतो. सर्व्हिसनंतर ही वायर पुन्हा नीट कॉईलशी जोडली गेली नसेल, तर अशा त्रुटी उद्भवतात. ही वायर AC च्या फ्रंट कॉईलला लावण्यासाठी दिलेल्या क्लिपमध्ये नीट अटॅच करून आपण कंप्रेसरचे काम सुरळीत करू शकतो.

कधी कधी कॉईलवर जमा झालेली धूळ, चिकटपणा किंवा ग्रीसही हीट एक्सचेंजमध्ये अडथळा निर्माण करते. यामुळे कंप्रेसरवर जास्त लोड येतो आणि तो अचानक बंद होतो. यासाठी नियमितपणे कॉईलची सफाई करणं अत्यावश्यक आहे. यासाठी AC बंद करून सॉफ्ट ब्रश किंवा व्हॅक्यूम क्लीनर वापरून कॉईलची वरची घाण स्वच्छ केली पाहिजे. खोलवर सफाईसाठी कोइल क्लीनर स्प्रे वापरणे उपयुक्त ठरते. स्वच्छ कॉईलमुळे कूलिंग चांगली होते आणि ओव्हरहिटिंग टळते.

कूलिंग चांगली होते आणि ओव्हरहिटिंग टळते.

जर AC मधून अचानक काही वेळानंतर थंड हवा येणं बंद झालं, तर AC पूर्णपणे बंद करून किमान 15 ते 30 मिनिटं विश्रांती द्यावी. यामुळे जर कंप्रेसर ओव्हरहिट झाला असेल, तर तो थंड होतो. (AC पुन्हा सुरु केल्यानंतर तपासून पाहावे जर प्राॅब्लेमसेम असेल तरत्वरित कंपनीवाल्यांशी संपर्क साधावा)

कधी AC ला आवश्यक वीजपुरवठा न मिळाल्यास म्हणजेच लो वोल्टेजच्या परिस्थितीतही कंप्रेसर योग्य काम करत नाही. स्टेबलायझरशिवाय AC वापरत असल्यास ही समस्या अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे AC बरोबर नेहमी दर्जेदार स्टेबलायझर वापरणं केवळ कंप्रेसरच नव्हे तर संपूर्ण यंत्रणेसाठी उपयुक्त ठरतं.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.