अमेझॉन इंडिया आणि महिंद्रा इलेक्ट्रिकमध्ये करार, डिलीवरी नेटवर्कसाठी 100 ई-व्हेईकल्सचा समावेश

अमेझॉन इंडिया आणि महिंद्रा इलेक्ट्रिकमध्ये करार, डिलीवरी नेटवर्कसाठी 100 ई व्हेईकल्सचा समावेश (agreement between Amazon India and Mahindra Electric, involving 100 e-vehicles for delivery network)

अमेझॉन इंडिया आणि महिंद्रा इलेक्ट्रिकमध्ये करार, डिलीवरी नेटवर्कसाठी 100 ई-व्हेईकल्सचा समावेश
अमेझॉन इंडिया आणि महिंद्रा इलेक्ट्रिकमध्ये करार
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 2:50 PM

मुंबई : ई-वाणिज्य कंपनी एमेजॉन इंडिया आणि ई-वाहन कंपनी महिंद्रा इलेक्ट्रिक यांच्यात मंगळवारी एक करार करण्यात आला. या करारानुसार अमेझॉनने देशभरात आपल्या डिलिव्हरी नेटवर्कमध्ये महिंद्रा इलेक्ट्रिकची जवळपास 100 ई-वाहनांचा समावेश केला आहे. दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या संयुक्त जबाबनुसार, महिंद्राच्या सुमारे 100 ट्रियो जोर ई-वाहनांचा देशातील सात शहरात अमेझॉनच्या डिलिव्हरी नेटवर्कमध्ये समावेश केला आहे. बंगळुरु, नवी दिल्ली, हैद्राबाद, अहमदाबाद, भोपाळ, इंदौर, लखनऊ आदि शहरांचा समावेश आहे. अमेझॉन इंडियाच्या वितरण सेवा भागीदारांच्या नेटवर्कमध्ये याचा समावेश आहे. (agreement between Amazon India and Mahindra Electric, involving 100 e-vehicles for delivery network)

2025 पर्यंत 10,000 ई-वाहनांचा समावेश करणार

अमेझॉनने पर्यावरणासाठी दिलेल्या आश्वासनानुसार 2030 पर्यंत त्यांच्या जागतिक वितरण नेटवर्कमध्ये एक लाख ई-वाहन समाविष्ट करण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत, कंपनी 2025 पर्यंत भारतातील वितरण नेटवर्कमध्ये 10,000 ई-वाहनांचा समावेश करेल. त्यानुसार कंपनीने महिंद्रा इलेक्ट्रिकची सुमारे 100 ई-वाहने डिलिव्हरी नेटवर्कमध्ये समाविष्ट केली आहेत.

पर्यावरणाबाबत एक महत्वपूर्ण पाऊल

महिंद्रा इलेक्ट्रिकबरोबरची ही भागीदारी पर्यावरणीय स्थिरतेची उद्दीष्टे साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे अमेझॉनने म्हटले आहे. महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश बाबू यांनी सांगितले की, आमचा विश्वास आहे की ही भागीदारी भारताची फ्लिट आणि डिलिव्हरी आवश्यकतांना पुन्हा परिभाषित करेल.

ट्रेयो झोरचा इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर मार्केटमध्ये 56 टक्के हिस्सा

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2020 मध्ये लॉन्च झालेल्या ट्रेयो झोरचा इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर मार्केटमध्ये 56 टक्के हिस्सा आहे. 8 किलोवॅट पॉवर असलेल्या महिंद्रा ट्रेयो झोरची 550 किलो वजन वाहतूक करण्याची क्षमता असून यात अॅडव्हान्स लिथियम-आयन बॅटरी आहे.

फ्लिपकार्टही करणार ई-सेवांचा वापर

ई-कॉमर्स क्षेत्रातील अमेझॉनची प्रतिस्पर्धी कंपनी फ्लिपकार्टनेही सन 2030 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक वाहनांचा समावेश करण्याची घोषणा केली आहे. फ्लिपकार्ट सध्या दिल्ली, हैदराबाद, जयपूर, भुवनेश्वर, पुणे, मुंबई, बंगळुरू, कोलकाता आणि लखनऊमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करीत आहे. (agreement between Amazon India and Mahindra Electric, involving 100 e-vehicles for delivery network)

इतर बातम्या

सोशल मीडियासाठी नवी नियमावली घोषित, जाणून घ्या फेसबुक, ट्विटर, युट्युब आणि इंस्टाग्रामवर काय होणार परिणाम

जबरदस्त फीचर्ससह Huawei चा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, भारतात सेल कधी?

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.