‘या’ दिवशी लाँच होणार Amazfit GTS 2 स्मार्टवॉच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

स्मार्टवॉच मेकर कंपनी Amazfit ने गेल्या आठवड्यात Amazfit GTR 2 हे स्मार्टवॉच भारतात लाँच केलं होतं. आता कंपनी त्यांचं बहुप्रतीक्षित Amazfit GTS 2 हे स्मार्टवॉच लाँच करणार आहे.

'या' दिवशी लाँच होणार Amazfit GTS 2 स्मार्टवॉच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मुंबई : स्मार्टवॉच मेकर कंपनी Amazfit ने गेल्या आठवड्यात Amazfit GTR 2 हे स्मार्टवॉच भारतात लाँच केलं होतं. आता कंपनी त्यांचं बहुप्रतीक्षित Amazfit GTS 2 हे स्मार्टवॉच लाँच करणार आहे. कंपनी 21 डिसेंबर रोजी हे स्मार्टवॉच लाँच होणार असून सर्वजण या स्मार्टवॉचमधील फिचर्स आणि त्याची किंमत जाणून घेण्यासाठी उत्सूक आहेत.

Amazfit GTS 2 या स्मार्टवॉचची किंमत 12,999 रुपये असू शकते. GTS 2 हे स्मार्टवॉच ग्राहक अमेझॉन या ई-कॉमर्स साईटवरुन अथवा अमेझफिटच्या ऑफिशियल साईटवरुन खरेदी करु शकतील. सध्या हे स्मार्टवॉच मिडनाईट ब्लॅक वेरिएंटमध्ये प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. या वॉचमध्ये तुम्हाला 1.65 इंचांची एमोलेड स्क्रिन मिळते जी 341ppi पिक्सल HD रेजॉल्यूशनसह येते.

या वॉचमध्ये अॅल्युमिनियम एलॉय बॉडी आहे, जी रोटेटबल स्क्रिनसह असते. डिस्प्लेवर तुम्हाला 3D कॉर्निग गोरिला ग्लास आणि अँटी फिंगरप्रिंट कोटिंग दिलं आहे. डिस्प्ले डायमंड लाईन कार्बन कोटिंगसह आहे. तसेच हा डिस्प्ले स्क्रॅचप्रुफदेखील आहे.

या वॉचमध्ये तुम्हाला 50 वॉच फेसेस देण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला कस्टमायजेबल सबमेनू मिळतो ज्याद्वारे तुम्ही अॅप्लिकेशन आणि हेल्थ तसेच फिटनेस ट्रॅक करु शकता. बायोट्रॅक 2 PPG ऑप्टिकल सेन्सरसह येतो ज्याद्वारे तुम्ही 24*7 हार्ट रेट मॉनिटर करु शकता, तसेच ब्लड ऑक्सिजन मोजू शकता.

अमेजफिट जीटीएस 2 मध्ये 90 बिल्ट इन स्पोर्ट्स मोड्स आहेत. हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफ आहे. या वॉचमध्ये 246mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. Amazfit GTS 2 मध्ये एक पर्सनल अॅक्टिव्हिटी इंटेलिजेन्स (PAI) हेल्थ असेसमेंट सिस्टम आहे जी हार्ट रेट, ट्रॅक केलेल्या अॅक्टिव्हिटी आणि अन्य स्वास्थ्य डेटा PAI स्कोरमध्ये बदलून साठवून ठेवते.

Amazfit GTR 2 स्मार्टवॉच लाँच, 38 दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफ, किंमत फक्त…

Amazfit कंपनीनी गेल्या आठवड्यात Amazfit GTR 2 हे स्मार्टवॉच भारतात लाँच केलं. हे स्मार्टवॉच तुम्ही फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या दोन ई-कॉमर्स साईट्सवरुन खरेदी करु शकता. या वॉचसोबत कंपनीकडून 1799 रुपये किंमतीची एक स्ट्रॅपदेखील दिली जात आहे. नव्या फिटनेस ट्रॅकरमध्ये एमोलेड पॅनलही देण्यात आलं आहे. या वॉचमध्ये तुम्हाला 12 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.

कंपनी हे स्मार्टवॉच दोन वेगवेगळ्या एडिशन्समध्ये विकत आहे. लेटेस्ट Amazfit GTR 2 स्पोर्ट्स एडिशनची किंमत 12,999 रुपये इतकी आहे. तर क्लासिक एडिशनची किंमत 13,499 रुपये इतकी आहे. 17 डिसेंबरपासून या वॉचची शिपिंग सुरु होईल. ग्राहक फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे या स्मार्टवॉचवर 5 टक्क्यांचा कॅशबॅक मिळवू शकतात.

या स्मार्टवॉचवर ईएमआयचा पर्यायही देण्यात आला आहे. 445 रुपये प्रतिमहिना इतक्या ईएमआयवर तुम्ही हे स्मार्टवॉच खरेदी करु शकता. दरम्यान कंपनीने अजून दोन स्मार्टवॉच लाँच केले आहेत. अमेजफिट GTS 2 (Amazfit GTS 2) आणि अमेजफिट GTS 2 मिनी (Amazfit GTS 2 mini) या नावांचे दोन स्मार्टवॉच कंपनीने लाँच केले आहेत.

संबंधित बातम्या

Xiaomi ची अ‍ॅपलला टक्कर, Mi Watch Lite लाँच, जाणून घ्या फिचर्स

जबरदस्त बॅटरी आणि फिचर्स असलेला Timex चा फिटनेस बँड लाँच, किंमत फक्त…

बहुप्रतीक्षित Amazfit GTR 2 स्मार्टवॉच लाँच, 38 दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफ, किंमत फक्त…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI