ॲपल बॅक टू स्कूल सेल सुरू, एअरपॉड प्रो आणि पेन्सिल प्रो मिळवा मोफत
ॲपलने त्यांच्या ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत मॅकबुकच्या खरेदीवर तुम्हाला मोफत एअरपॉड्स आणि आयपॅडच्या खरेदीवर मोफत पेन्सिल प्रो मिळेल. चला या ऑफरबद्दल जाणून घेऊयात.

ॲपलच्या अधिकृत वेबसाइटवर एक उत्तम ऑफर सुरू झाली आहे, ही ऑफर विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आहे. जर तुम्ही सुद्धा मॅकबुक किंवा आयपॅड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी एक फायदेशीर ठरेल. या ऑफरअंतर्गत कंपनी 12 हजार 900 रुपयांपर्यंतच्या ॲक्सेसरीज मोफत देत आहे. ॲपलची ही ऑफर महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी आहे. तुम्ही ॲपलच्या वेबसाइटला किंवा ॲपल रिटेल स्टोअरला भेट देऊन तुमची पात्रता तपासू शकता. ॲपलचा ‘बॅक टू स्कूल’ सेल 16 जुलै ते 27 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. लक्षात घ्या की, ॲपलने भारतात मॅकबुक आणि आयपॅडच्या किमती वाढवल्यानंतर काही आठवड्यांतच हा सेल सुरू झाला आहे. चला तर मग या सर्वोत्तम डिल्सबद्दल जाणून घेऊयात.
ॲपल बॅक टू स्कूल मॅकबुकवर उपलब्ध असलेल्या या आहेत सर्वोत्तम ऑफर्स
एज्युकेशन सेव्हिंग्जसह मॅकबुक एअर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक मोफत एअरपॉड्स 4 किंवा एअरटॅग 4 मिळेल. मात्र जर तुम्हाला ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) असलेले एअरपॉड्स 4 हवे असतील, तर तुम्हाला 5 हजार रूपये भरावे लागतील आणि जर तुम्हाला एअरपॉड्स प्रो 3 हवे असतील, तर तुम्हाला अतिरिक्त 13 हजार रूपये देऊन खरेदी करावे लागतील. त्यातच तुम्ही मॅकबुक प्रो खरेदी करत असाल तरीही, तुम्ही एअरपॉड्स 4 किंवा एअरटॅग 4 पॅक मोफत निवडू शकता. मात्र जर तुम्हाला ANC असलेले एअरपॉड्स 4 हवे असतील, तर तुम्हाला 5 हजार रूपये भरून खरेदी करता येतील आणि एअरपॉड्स प्रो 3 साठी तुम्हाला 13 हजार रूपये द्यावे लागतील.
13-इंची ॲपल मॅकबुक एअर एम5 ची किंमत 1 लाख 49 हजार 900 रूपये आहे, परंतु शैक्षणिक ऑफर अंतर्गत हे मॉडेल 1 लाख 37 हजार 900 रूपयांमध्ये उपलब्ध होईल. 14-इंची मॅकबुक प्रो एम5 2 लाख 39 हजार 900 रूपयांऐवजी 2 लाख 27 हजार 900 रूपयांना खरेदी करता येईल.
तुम्ही आयपॅड एअर किंवा आयपॅड प्रो खरेदी केल्यास तुम्हाला ॲपल पेन्सिल प्रो मोफत मिळू शकते. त्याऐवजी तुम्ही एअरटॅग 4 पॅक किंवा एअरपॉड्स प्रो चा पर्यायही निवडू शकता, पण त्यासाठी तुम्हाला 2 हजार रूपये मोजावे लागतील. तुम्हाला एएनसी (ANC) असलेले एअरपॉड्स 4 हवे असल्यास तुम्हाला 7 हजार रूपये भरून ते खरेदी करता येईल. त्यासोबतच एअरपॉड्स प्रो 3 हवे असल्यास, तुम्हाला 15 हजार रूपये खर्च करावे लागेल.
भारतात 11-इंचाच्या आयपॅड एअर एम4 च्या 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 89 हजार 900 रूपयांपासून सुरू होते, तर शैक्षणिक स्टोअर्समधून खरेदी करणाऱ्यांना हा आयपॅड 83 हजार 900 रूपयांना मिळेल. 11-इंचाच्या आयपॅड प्रो एम5 च्या 256 जीबी मॉडेलची किंमत 1 लाख 39 हजार 900 रूपयांपासून सुरू होते, तर शैक्षणिक स्टोअर्समधून खरेदी करणाऱ्यांना 1 लाख 27 हजार 900 रूपयांमध्ये खरेदी करता येईल.
