डुकाती बाईकच्या खरेदीवर तब्बल 6 लाखांची सवलत, मर्यादित ऑफर

डुकाती बाईकच्या खरेदीवर तब्बल 6 लाखांची सवलत, मर्यादित ऑफर

नवी दिल्ली : Ducati Diavel ही बाईक जगातील सर्वोत्तम बाईक्सपैकी एक मानली जाते. या बाईकची दिल्लीत शोरुममधील किंमत 16.15 लाख आहे. तसेच ऑनरोड किंमत 18.12 लाख रुपये एवढी होते. मात्र, सध्या या बाईकच्या खरेदीवर तब्बल 6 लाखांची सवलत मिळत आहे. बिग बॉईज टॉईज (बीबीटी) कार डिलर ही विक्री करत आहे. मात्र, बाईकची संख्या केवळ 20 एवढी […]

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 05, 2019 | 3:37 PM

नवी दिल्ली : Ducati Diavel ही बाईक जगातील सर्वोत्तम बाईक्सपैकी एक मानली जाते. या बाईकची दिल्लीत शोरुममधील किंमत 16.15 लाख आहे. तसेच ऑनरोड किंमत 18.12 लाख रुपये एवढी होते. मात्र, सध्या या बाईकच्या खरेदीवर तब्बल 6 लाखांची सवलत मिळत आहे.

बिग बॉईज टॉईज (बीबीटी) कार डिलर ही विक्री करत आहे. मात्र, बाईकची संख्या केवळ 20 एवढी मर्यादित आहे. ग्राहकांना ही बाईक 6 लाखांच्या सवलतीसह 11.99 रुपयांना खरेदी करता येईल. तुलना केल्यास ही बाईक मारुती विटारा ब्रेजा एसयूव्हीच्या टॉप मॉडेलपेक्षाही कमी किमतीत मिळत आहे. ब्रेजाच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 12.56 लाख रुपये आहे.

Ducati Diavel एवढ्या कमी किमतीत विकली जाण्याचे महत्वाचे कारण म्हणजे डिलरने केलेल्या बाईक खरेदीचा कालावधी. डिलरने या बाईकचा 2018 चा अनसोल्ड (विक्री न झालेला) स्टॉक खरेदी केला होता. त्यामुळेच आता त्यांना कमी किमतीत ही बाईक विक्री करता येत आहे. जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल, तर तुम्हाला डिलरकडे यासाठी नोंदणी करावी लागेल.

‘तुम्ही या बाईकचे पहिले नाही, तर दुसरे मालक असाल’

एक विशेष म्हणजे बाईक खरेदी केल्यास तुम्ही या बाईकचे पहिले मालक नाही, दुसरे मालक असाल. या बाईकचा पहिला मालक बाईक डिलर बीबीटी  स्वतः असेल. बीबीटीकडे 4 Ducati Diavel डिझेल बाईकही होत्या. मात्र, त्याआधीच बुक झाल्या आहेत. जगभरात अशा डिझेल बाईकची संख्या केवळ 666 एवढी आहे.

या Ducati Diavel बाईकमध्ये 1198 सीसीचे दोन सिलेंडर इंजिन आहेत. हे इंजिन 9250 आरपीएमवर 159 बीएचपीची शक्ती आणि 8000 आरपीएमवर 130.5 एनएम टॉर्क देते. या बाईकच्या लिक्विड कूल्ड इंजिनमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स असून त्यांचे वजन 239 किलोग्रॅम आहे.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें