रेसिंग आवडते! मग लगेच बुक करा BMW S 1000 RR, सेकंदात मिळेल 100 स्पीड!

तुम्हाला रेसिंग आवडते का? असं असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास पर्याय सांगत आहोत. BMW ने रेसिंगची आवड असणाऱ्यांसाठी BMW S 1000 RR बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक ऑटो एक्स्पो 2025 मध्ये लाँच करण्यात आली आहे. 1000 सीसीचे जबरदस्त इंजिन असलेल्या या बाईकमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स आहेत. जाणून घेऊया.

रेसिंग आवडते! मग लगेच बुक करा BMW S 1000 RR, सेकंदात मिळेल 100 स्पीड!
Follow us
| Updated on: Jan 22, 2025 | 1:04 PM

BMW मोटररॅडने ऑटो एक्स्पो 2025 मध्ये आपली परफॉर्मन्स ओरिएंटेड बाईक BMW S 1000 RR लाँच केली आहे. कंपनीने BMW S 1000 RR या बाईकची किंमतही जाहीर केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, BMW S 1000 RR या बाईकची एक्स-शोरूम किंमत 21.10 लाख रुपये आहे.

BMW S 1000 RR बाईकचे बुकिंगही सुरू

कंपनीने बाईकच्या डिझाइनपासून पॉवरपर्यंत सर्व काही बदलले आहे. BMW S 1000 RR या बाईकचे बुकिंगही सुरू झाले आहे. एप्रिल 2025 पासून ज्या ग्राहकांनी BMW S 1000 RR ही बाईक बुक केली आहे, त्यांना कंपनी डिलिव्हरी करणार आहे.

ट्विन-हेडलॅम्प सेटअपसह कॉम्पॅक्ट डिझाइन

BMW S 1000 RR बाईकमध्ये ट्विन-हेडलॅम्प सेटअपसह कॉम्पॅक्ट डिझाइन आहे. यामुळे BMW S 1000 RR बाईक खूपच आकर्षक बनते. BMW S 1000 RR यात हाय विंडस्क्रीन, साईड विंगलेट आणि लोअर ट्रिपल क्लॅम्पचे मिश्रण आहे. BMW S 1000 RR ही बाईक ब्लॅक स्टॉर्म मेटॅलिक, ब्लूस्टोन मेटॅलिक आणि लाइट व्हाईट सॉलिड या तीन रंगांमध्ये BMW S 1000 RR बाईक लॉन्च करण्यात आली आहे.

BMW S 1000 RR मध्ये 999 सीसीचे इनलाइन-फोर सिलिंडर इंजिन आहे जे 13,750 RPM वर 210 एचपीपॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. BMW S 1000 RR यात पॉवर युनिट बाय-डायरेक्शनल क्विक-शिफ्टरसह सहा-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. याशिवाय ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, लाँच कंट्रोल, हिल स्टार्ट कंट्रोल, पिट लेन टाइमर असे अनेक फीचर्स BMW S 1000 RR या बाईकमध्ये देण्यात आले आहेत.

BMW S 1000 RR 3.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग

BMW S 1000 RR 3.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते, असा कंपनीचा दावा आहे. मात्र, त्याचा टॉप स्पीड ताशी 300 किमी नोंदवण्यात आला आहे.

ऑटो एक्स्पोमध्ये BMW S 1000 RR च्या लाँचिंगबद्दल बोलताना BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पावाह म्हणाले, “नवीन BMW S 1000 RR आपले नेतृत्व स्थान मजबूत करण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. BMW S 1000 RR ही बाईक रेसिंग शौकिनांना एक वेगळीच अनुभूती देईल, असे ते म्हणाले

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.