BMW च्या किमती इतका टॅक्स, जगातल्या सर्वात महागड्या कारची किंमत किती?

BMW च्या किमती इतका टॅक्स, जगातल्या सर्वात महागड्या कारची किंमत किती?

मुंबई : कारच्या चाहत्यांना नेहमीच नवनवीन कार आकर्षित करत असतात. नवीन कार मॉडेल लाँच होताच अनेकांना ती कार आपल्या घरासमोर असावी असं वाटतं. अशाच एका कार वेड्याने जगातील सर्वात महागडी कार विकत घेतली आहे आणि ते ही अवघ्या काही मिनिटांत. ही कार जगातील सर्वात महागडी कार असून याचा नुसता टॅक्सच BMW च्या किमती इतका आहे. […]

Nupur Chilkulwar

|

Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : कारच्या चाहत्यांना नेहमीच नवनवीन कार आकर्षित करत असतात. नवीन कार मॉडेल लाँच होताच अनेकांना ती कार आपल्या घरासमोर असावी असं वाटतं. अशाच एका कार वेड्याने जगातील सर्वात महागडी कार विकत घेतली आहे आणि ते ही अवघ्या काही मिनिटांत. ही कार जगातील सर्वात महागडी कार असून याचा नुसता टॅक्सच BMW च्या किमती इतका आहे. या कारचा टॅक्स तब्बल 45 कोटी रुपये आहे.

Bugatti La Voiture Noire ही कार जगातील सर्वात महागडी आणि सर्वात वेगवान कार आहे. या कारला फ्रान्सची सुपरकार बनवणारी कंपनी बुगाती (Bugatti)ने बनवलं आहे. 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये ही कार प्रदर्शित करण्यात आली. या कारची किंमत तब्बल 133 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे मोटार शोमध्ये या कारवरुन पडदा उठण्यापूर्वीच एका अज्ञात व्यक्तीने या कारला खरेदी केलं. तशी या कारची किंमत 87 कोटी रुपये आहे. मात्र, या कारची ऑन रोड किंमत 133 कोटी आहे.

जगातील महागड्या कारचे भन्नाट फिचर्स

Bugatti La Voiture Noire ही एक सुपर स्पोर्ट्स कार आहे. ही कार 2.4 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावू शकते. या कारचा सर्वाधिक वेग 420 किलोमीटर प्रति तास आहे. कंपनीच्या मते शहरात या कारला 100 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 35.2 लीटर पेट्रोलची गरज असेल.

La Voiture Noire हा एक फ्रेंच शब्द आहे. याचा अर्थ ‘द ब्लॅक कार’ असा होतो. या कारचं डिझाईन 1930 सालच्या 57SC Atlantic या कारवरुन बनवण्यात आलं आहे. या कारचं डिझाईन बुगातीचे संस्थापक एटोर बुगाती (Ettore Bugatti) यांचा मुलगा जीन बुगातीने (Jean Bugatti) केलं.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें