कॉल रेकॉर्ड करणे योग्य की अयोग्य? कायदा काय सांगतो? वाचा…
सर्व स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग फीचर मिळते. त्यामुळे बरेच लोक पुराव्यासाठी किंवा अधिकृतरित्या झालेले संभाषण सुरक्षित ठेवण्यासाठी या फीचरचा वापर करतात. मात्र कॉल रेकॉर्ड करणे कायदेशीररित्या योग्य आहे का? हे जाणून घेऊयात.

सध्या बाजारात मिळणाऱ्या सर्व स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग फीचर मिळते. त्यामुळे बरेच लोक पुराव्यासाठी किंवा अधिकृतरित्या झालेले संभाषण सुरक्षित ठेवण्यासाठी या फीचरचा वापर करतात. मात्र कॉल रेकॉर्ड करणे कायदेशीररित्या योग्य आहे का? यासाठी शिक्षा होऊ शकते का? आज आपण भारतात कॉल रेकॉर्डिंगशी संबंधित काय नियम आणि कायदे आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कॉल रेकॉर्ड करणे योग्य की अयोग्य ?
भारतात असलेल्या कायद्यांनुसार, कॉल रेकॉर्ड करणे बेकायदेशीर नाही, मात्र त्यासाठी काही अटी आहेत. तुम्ही जर समोरच्या व्यक्तीच्या संमतीने कॉल रेकॉर्ड करत असाल तर कॉल रेकॉर्ड करणे कायदेशीर आहे. मात्र तुम्ही समोरच्याला माहिती न देता एखाद्याचा कॉल रेकॉर्ड केला तर ते बेकायदेशीर आहे. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन मानले जाऊ शकते आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
कायदा काय आहे?
भारतीय दंड संहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे आणि नंतर तो एखाद्याच्या विरोधात वापरणे किंवा सोशल मीडियावर पोस्ट करणे हा गुन्हा मानला जातो. अशा प्रकारचे कॉल रेकॉर्डिंग हे हेरगिरी, फसवणूक किंवा ब्लॅकमेलिंगच्या श्रेणीत मोडले जाऊ शकते.
काय शिक्षा होऊ शकते?
तुम्ही जर समोरच्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय एखाद्याचा कॉल रेकॉर्ड केला आणि त्याचा गैरवापर केला तर तुमच्याविरुद्ध पुढील कलमांखाली कारवाई केली जाऊ शकते. तुम्हाला आयपीसी कलम 354 डी, गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल आयटी कायदा कलम 66 ई, बदनामीसाठी आयपीसी कलम 499 आणि 500 याअंतर्गत 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो.
कॉल रेकॉर्डिंग कायदेशीररित्या कधी योग्य आहे?
जेव्हा दोन्ही व्यक्ती कॉल रेकॉर्डिंग करण्यास सहमत असतात तेव्हा कॉल रेकॉर्डिंग करने योग्य आहे. ऑफिस किंवा कस्टमर केअर कॉलमध्ये, कॉल रेकॉर्डिंगबाबत माहिती दिली जाते. हा कॉल गुणवत्ता आणि प्रशिक्षणाच्या उद्देशाने रेकॉर्ड केला जात आहे अशी माहिती दिली जाते. याशिवाय स्वतःच्या सुरक्षिततेसाठी किंवा कायदेशीर पुराव्यासाठी कॉल रेकॉर्डिंग मानले जाते. (मात्र त्याचा वापर मर्यादित असावा).
रेकॉर्डिंग शेअर करणे धोकादायक
कायद्यानुसार, एखाद्याचा कॉल रेकॉर्ड करणे आणि नंतर तो सोशल मीडियावर अपलोड करणे, तो इतरांना पाठवणे, धमकी देण्यासाठी किंवा ब्लॅकमेलिंगसाठी वापरणे हे चुकीचे आहे. यामुळे तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.
डेटा चोरी
सध्या अनेकथर्ड पार्टी अॅप्स कॉल रेकॉर्ड करतात आणि ते तुम्हाला न सांगता तुमची माहिती सर्व्हरवर अपलोड करू शकतात. त्यामुळे डेटा लीक होण्याची शक्यता असते.