AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car Laptop | आता कारमध्ये पण करा लॅपटॉप चार्ज, हे डिव्हाईस आले मदतीला

Car Laptop | कारमध्ये लॅपटॉप कसा चार्ज करावा, असा अनेकांना प्रश्न पडतो. त्यामुळे अनेकांना कारमध्ये काम करता येत नाही. पण ही अडचण आता दूर होणार आहे. कारमध्ये पण तुम्हाला ऑफिससारखे काम करता येईल. ई-कॉमर्स प्लेटफॉर्म एमेझॉनवर हे डिव्हाईस सवलतीत खरेदी करता येईल.

Car Laptop | आता कारमध्ये पण करा लॅपटॉप चार्ज, हे डिव्हाईस आले मदतीला
| Updated on: Feb 04, 2024 | 10:58 AM
Share

नवी दिल्ली | 4 February 2024 : लॅपटॉपची बॅटरी उतरली तर तुमचे काम खोळंबते. प्रवासादरम्यान ही समस्या अनेकांना भेडसावते. कारमध्ये लॅपटॉप कसा चार्जर करावा याविषयी अनेक जण विचारणा करतात. कारण नॉर्मल चार्जर लॅपटॉपसाठी कुचकामी ठरते. त्याचा काहीच वापर करता येत नाही. गरज असेल तेव्हा कारमध्ये लॅपटॉपवर काम करता येत नाही. पण आता या अडचणीवर एक तोडगा काढला गेला आहे. तुम्ही या डिव्हाईसच्या मदतीने स्मार्टफोन-लॅपटॉप सहज चार्ज करु शकता. हे डिव्हाईस एमेझॉनवर तुम्हाला अत्यंत स्वस्तात मिळेल.

Ceptics 200W Car Laptop Charger

हा चार्जर महागडा आहे. त्याची किंमत 8,999 रुपये इतकी आहे. पण ई-कॉमर्स प्लेटफॉर्म एमेझॉनवर त्यावर मोठी सवलत मिळाली आहे. 77 टक्के सवलतीसह हे चार्जर तुम्हाला अवघ्या 2,099 रुपयांना मिळेल. 200W पॉवरसह हे चार्जर स्मार्टवोल्टेज टेक्नोलॉजीसह येते. हे चार्जर तुम्ही कारमध्ये कनेक्ट करु शकता. या चार्जरवर तुम्हाला मोबाईल आणि लॅपटॉप चार्जर करता येतो. यामध्ये ग्राहकांना 5 यूएसबी पोर्ट आणि 2 प्लग पॉईंट मिळते. आयपॅड, लॅपटॉप आणि दुसरी इलेक्ट्रॉनिक उपकरणे यावर सहज चार्ज करता येतात.

myTVS 200W Car Laptop and Mobile Charger

हे एक अजून उपकरण आहे. याआधारे लॅपटॉप चार्ज करता येते. Amazon वर हे उपकरण ग्राहकांना 14 टक्के सवलतीसह केवळ 2,594 रुपयांत खरेदी करता येईल. हे 3 इन वन फास्ट चार्जिंग चार्जर डिव्हाईस आहे. या उपकरणावर कंपनी 2 वर्षांची वॉरंटी देते.

Soletal 150W Car Inverter

4 यूएसबी, 2 टाइप-C पोर्ट्स आणि ड्यूअल 220V आउटलेट्स सह मिळते. हे चार्जर Amazon वर 32 टक्के डिस्काऊंटसह केवळ 1299 रुपयांना मिळते. ग्राहकांना Amazon वर हे चार्जर नो कॉस्ट ईएमआई पर्यायासह मिळते. त्यामुळे महिन्याला केवळ 118 रुपयांच्या हप्त्यांवर हे डिव्हाईस खरेदी करता येईल.

CAZAR Car Laptop Charger

CAZAR Car Laptop Charger तुम्हाला फ्लिपकार्टवर खरेदी करता येईल. या चार्जवर सवलत मिळते. या चार्जरची किंमत 2479 रुपये आहे. या चार्जची काही वैशिष्ट्ये पण आहेत. हे चार्जर तुम्हाला ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन, ओव्हरलोड प्रोटेक्शन, कमी दबाच्या विद्यूत पुरवठा, शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन आणि ओव्हर हिटिंग प्रोटेक्शनचा पर्याय मिळतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.