AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV नसला तरी बेडरूममधले खासगी क्षण होऊ शकतात लीक, पण कसं ?

आजकाल आपण कुठेही बाहेर फिरायला गेल्यावर हॉटेलमध्ये मुक्काम करतो तेव्हा आपल्याला पैशांपेक्षा रूममधील कॅमेऱ्याचीच जास्त काळजी वाटते. कोणत्याही खोलीत कॅमेरे बसवलेले नाहीत. सीसीटीव्हीची भीती कायम आहे. पण सीसीटीव्ही नसतानाही व्हिडिओ लीक होऊ शकतो. कसं, ते जाणून घेऊया.

CCTV नसला तरी बेडरूममधले खासगी क्षण होऊ शकतात लीक, पण कसं ?
| Updated on: Mar 09, 2024 | 1:27 PM
Share

CCTV Check : आजकाल सोशल मीडियाचा वापर हा खूप कॉमन झाला आहे. प्रत्येक व्यक्ती जिवसात कधी न कधी तरी सोशल मीडिया वापरतच असतं. मात्र त्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. सोशल मीडियावरून कोणाचा तरी वैयक्तिक व्हिडिओ व्हायरल होत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. त्यांच्या बेडरूममध्ये सीसीटीव्ही होता का, असं त्यांना विचारलं असता, उत्तर आलं ‘नाही’… मग हे व्हिडीओ व्हायरल होतात तरी कसे ? सीसीटीव्ही कॅमेरा नसताना हे व्हिडीओ बनल कसे आणि लीक झाले कसे ? असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. पण याचं उत्तर फारच कमी लोकांना माहीत असेल.

बऱ्याच लोकांना असं वाटतं की एखाद्या रूममध्ये सीसीटीव्ही असेल तर त्या माध्यमातूनच व्हिडीओ लीक होतात. त्यामुळे कोणीही एखाद्या ठिकाणी बाहेर गेलं तर, त्या रूममध्ये सीसीटीव्ही आहे की नाही हे आधी चेक करतात. पण सीसीटीव्ही शिवायही व्हिडीओ व्हायरल होऊ शकतं. हे सगळं कसं होऊ शकतं, हे जाणून घेऊया.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून कसा होतो व्हिडीओ लीक ?

हे समजून घेण्यासाठी आधी काही गोष्टी समजून घ्यावी लागतील. बरेच लोक आपल्या घरात सीसीटीव्ही बसवतात. घराची सुरक्षा अबाधित रहावी, त्यावर नीट लक्ष ठेवता यावे यासाठी हे कॅमेरे लावले जातात. अशा परिस्थितीत व्हिडिओ लीक होण्याची शक्यता जास्त असते, कारण कॅमेरा फुटेज कोणीही लीक करू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीसीटीव्ही कॅमेरे हॅक होण्याची शक्यता जास्त असते. भारतात उपलब्ध असलेल्या बहुतांश सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चिनी सॉफ्टवेअर असते जे सहज हॅक केले जाऊ शकतात.

जेव्हा आपण सीसीटीव्ही कॅमेरा विकत घेण्यासाठी जातो तेव्हा बरेच जण प्रायव्हसी पॉलिसी तपासायला विसरतात, परंतु हा निष्काळजीपणा लोकांना महागात पडू शकतो. त्यात साठवलेला डेटा एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहे की नाही हेही तपासले पाहिजे. म्हणजे ज्या कंपनीचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले आहे ती कंपनी हा डेटा वाचू शकते, चेक करू शकते की नाही, हे तपासावे. जर असे झाले नाही तर तुमचा डेटा लीक होण्याची शक्यता वाढते.

लॅपटॉपचा वेबकॅम

दुसरा मुद्दा हा की सीसीटीव्ही कॅमेरा नसतानाही व्हिडीओ लीक कसा होतो ? तर त्यासाठी तुमचा लॅपटॉपही कारणीभूत ठरू शकतो. खरंतर लॅपटॉपमध्ये वेबकॅम असतो. बरेच जण बेडरूममध्ही लॅपटॉप वापरतात. त्याच लॅपटॉपचा वेबकॅमही हॅक होऊ शकतो. त्यामुळे लॅपटॉप बेडरूममध्ये ठेवणं धोकादायक ठरू शकतं. वेबकॅम हॅक करून समोरील हॅकर तुमच्या बेडरूममधील सर्व हालचाली पाहू शकतो. एवढेच नाही तर तुमचा मायक्रोफोनही हे सर्व रेकॉर्ड करू शकतो. हे टाळायचं असेल तर तुमच्या लॅपटॉपचा वेबकॅम नेहमी झाकून ठेवावा. खरंतर, आजकाल बाजारातील बहुतेक लॅपटॉप वेबकॅम शटरसह येतात. तुमच्या कॅमेऱ्याला शटर नसल्यास, तुम्ही त्यावर टेप देखील लावू शकता.

घरातील स्मार्ट डिव्हाइसही ठरू शकतात धोकादायक

तुमच्या घरात स्मार्ट टीव्ही, स्मार्ट स्पीकर लावले असतील तर तुम्हाला धोका आहे. स्मार्ट स्पीकर नेहमी चालू असतात, त्यांच्याकडे कॅमेरा नसतो, त्यामुळे ते तुमचे व्हिज्युअल रेकॉर्ड करू शकत नाहीत परंतु ते तुमचा ऑडिओ रेकॉर्ड करू शकतात आणि हॅकर तुमचे स्पीकर हॅक करून तुमचे शब्द ऐकू शकतात.  म्हणूनच तुमच्या स्पीकरचं ऑलवेज ऑन हे सेटिंग बंद ठेवा.

तर बरेच लोक व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्ट टीव्हीला कॅमेरा कनेक्ट करतात, अशा परिस्थितीत हे कॅमेरे लॅपटॉपच्या वेब कॅमप्रमाणे हॅक केले जाऊ शकतात आणि त्यातूनही डेटा लीक होऊ शकतो. त्यामुळे तो कॅमेराही झाकून ठेवा.

असा करा बचाव

  • तुमच्या घरात किंवा बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला असेल तर त्याकडे विशेष लक्ष द्या. ही सेटिंग्ज अपडेट करा.
  • कॅमेरा अपडेट करा. कॅमेरा अपडेटमध्ये अनेक प्रायव्हसी फीचर्स असतात, जे अपडेट करणं महत्वाचं ठरतं.
  • काही लोक त्यांच्या कॅमेऱ्याचा आयडी आणि पासवर्ड हा बाय डीफॉल्ट सेव्ह करतात, जेणेकरुन इतर कोणत्याही व्यक्तीला त्याचा ॲक्सेस मिळू शकेल. पण ते डिफॉल्ट सेटिंग काढून टाका. जर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा पर्याय दिला असेल तर तो चालू करा आणि मजबूत पासवर्ड सेट करा.
  • स्मार्ट डिव्हाइस घरात असतील तर व्हिडीओ लीक होण्याचा धोका नेहमी असतो. त्यामुळे नेहमीच पुरेशी काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.