AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लिपकार्टवर बंपर सेल!!! Vivo V25 Pro वर भरघोस सूट, वाचवा हजारो रुपये…

विवोने आपला रंग बदलनारा मोबाईल बाजारात आणला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून नवनवीन आकर्षक स्मार्टफोन बाजारात आणले जात आहेत. जर तुम्हालाही हा रंग बदलणारा स्मार्टफोन आवडत असेल, तर आजपासून फ्लिपकार्टवर Vivo V25 Pro ची विक्री सुरू झाली आहे. फोनच्या ऑफर्स, फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घ्या.

फ्लिपकार्टवर बंपर सेल!!! Vivo V25 Pro वर भरघोस सूट, वाचवा हजारो रुपये...
| Edited By: | Updated on: Aug 25, 2022 | 1:19 PM
Share

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने (Vivo) भारतीय बाजारात आपला रंग बदलणारा स्मार्टफोन गेल्याच आठवड्यात आणला आहे. या नवीन स्मार्टफोनच्या महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या नवीन मोबाइल फोनमध्ये मोठा अमोलेड (AMOLED) डिस्प्ले, 64 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 66 W फास्ट चार्ज सपोर्ट यांसारख्या फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. विवो व्ही25 प्रो 5जी (Vivo V25 Pro 5G) खरेदी करण्यापूर्वी, या लेखाच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्टफोनची किंमत, फ्लिपकार्टवर फोनसोबत उपलब्ध ऑफर आणि फीचर्सबद्दल माहिती देणार आहोत.

किती होईल बचत?

फ्लिपकार्ट ऑफर्स : HDFC क्रेडिट-डेबिट कार्डवर 3500 रुपये, एसबीआय क्रेडिट कार्डवर 10 टक्के (सुमारे 750 रुपयांपर्यंत) आणि ईएमआय ट्रांझेशनवर 10 टक्के (सुमारे 1500 रुपयांपर्यंत) सूट असेल. याशिवाय, ग्राहकांसाठी कोणतीही व्याज ईएमआय सुविधा नाही आणि जुना फोन दिल्यावर 20,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील देण्यात आले आहे.

Vivo V25 Pro चे स्पेसिफिकेशन्स

स्क्रीन : Vivo V25 Pro ला 6.56 इंच फुल एचडी प्लस (2376×1080 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले दिला आहे.

कॅमेरा सेटअप : फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यात, 64 मेगापिक्सलचा प्राथमिक सेंसर, सोबत 8 मेगापिक्सलचा वाइड सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर उपलब्ध असेल. सेल्फीसाठी फोनच्या समोर 32 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर आहे.

चिपसेट : स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये, कंपनी MediaTek Dimensity 1300 चिपसेटसह 12 जीबीपर्यंत रॅम दिली आहे.

बॅटरी : 66 डब्ल्यू फास्ट चार्ज सपोर्ट असलेली 4830 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

काय आहे किंमत ?

या विवो मोबाईलच्या 8 जीबी रॅम / 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 35,999 रुपये आहे. टॉप मॉडेलमध्ये कंपनीने 12 जीबी रॅम / 256 जीबी स्टोरेज दिले आहे. या वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. आजपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवर फोनची विक्री सुरू झाली आहे. ग्राहक हा फोन सेलिंग ब्लू आणि ब्लॅक कलरमध्ये खरेदी करू शकता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.