DeepSeek AI की इतनी चर्चा क्यों है भाई? ChatGPT आणि Google Gemini ला धोबीपछाड; सिलिकॉन व्हॅलीत खळबळ
DeepSeek ची R1 AI मॉडेलने ChatGPT आणि Google Gemini ला मागे टाकून जगभरात खळबळ उडवली आहे. याची किंमत तुलनेने खूपच कमी आहे, ज्यामुळे ते अफोर्डेबल आहे. हे ओपन-सोर्स असल्याने वापरकर्ते त्यात बदल करू शकतात. या मॉडेलने अल्पावधीतच यश मिळवले आहे.

पूर्वी चीन, अमेरिका आणि रशिया या तीन बलाढ्य शक्तींमध्ये नेहमीच स्पर्धा पाहायला मिळायची. पण गेल्या काही काळापासून रशिया या स्पर्धेत मागे पडला आहे. आता खरी स्पर्धा आहे ती चीन आणि अमेरिकेत. हे दोन्ही देश वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी नेहमीच प्रयत्न करताना दिसतात. पण यावेळे टेक्नॉलॉजीच्या जगात चीनने मोठी झेप घेत फक्त अमेरिकेतच नाही तर जगभरात खळबळ माजवली आहे. चीनच्या या आघाडीमुळे सिलिकॉन व्हॅलीलाही हादरे बसून गेले आहेत. Google, Microsoft सारख्या कंपन्या चीनच्या या कारनाम्यामुळे टेन्शमध्ये आल्या आहेत. चीनी कंपनी DeepSeek लॅबने R1 AI मॉडल लॉन्च केलंय. या मॉडलने जगाला प्रभावित केलं आहे. हे मॉडल जगभर प्रसिद्ध झालं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात ChatGPT, Google Gemini सारख्या AI मॉडललाही या चीनी मॉडेलने मागे टाकलं आहे.
2022 मध्ये जेव्हा OpenAI ने ChatGPT लॉन्च केलं होतं. तेव्हा या जनरेटिव्ह AI ची चर्चा सुरू झाली. मायक्रोसॉफ्टने प्रायोजित केलेल्या या AI टूलने गूगल, अॅपल आणि मेटा सारख्या दिग्गज कंपन्यांचं टेन्शन वाढवलं आहे. ChatGPT आल्यानंतर या कंपन्यांनी त्यांचा जनरेटिव्ह AI मॉडल लॉन्च केला होता. त्याचे दोन वर्षातच लाखोंच्या घरात यूजर्स आहेत. आता चीनी कंपनीच्या नवीन AI मॉडलने सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली आहे. चीनी स्टाटर्टअप कंपनी DeepSeekच्या नव्या AI मॉडलवर मायक्रोसॉफ्टचे CEO सत्य नडेला यांनीही भाष्य केलं आहे.
सिलिकॉन व्हॅलीत खळबळ
सत्य नडेला यांनी चीनी AI मॉडलवर भाष्य केलं आहे. या मॉडलला गंभीरपणे घेतलं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. तर, Perplexityचे CEO अरविंद श्रीनिवास यांनी डीपसीकने 01 मिनिटाला रेप्लिकेट करून त्याला प्रभावी सोर्स म्हणून ओपन केलं आहे, असं म्हटलंय. या नव्या मॉडलची टेक्नॉलॉजी स्वस्त आहे, त्यामुळे इनफरेन्स कॉस्टची बचत होत आहे. त्यामुळे डीपसीक AI मॉडल सध्या चर्चेत आहे. चीनी स्टार्टअप कंपनीचे हे AI मॉडल R1 एक महिन्यात लॉन्च झालं आहे. हे रिजनिंग मॉडल ऑगमेंटेड रिजनिंग आणि एनालिटिकल कॅपेबिलिटीसाठी तयार करण्यात आलं आहे.
DeepSeek AI म्हणजे काय रे भाऊ?
हे एआय टूल अॅडव्हान्स लँग्वेजवर काम करत आहे. त्यात हायब्रिड आर्किटेक्चरचा वापर करण्यात आला आहे. तथापि R1 कंपनीचं काही पहिलं मॉडेल नाहीये. हे कंपनीच्या मॉडलचं तिसरं व्हर्जन आहे. म्हणजे V3 आहे. डीपसीकचं हेड क्वॉर्टर चीनच्या हांग्जो शहरात आहे. या कंपनीला 2023मध्ये Liang Wenfeng ने स्टार्टअप म्हणून सुरू केलं होतं. या कंपनीचा उद्देश आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजे AGI डेव्हल्प करणं हा होता.
कमी खर्चात तयार
डीपसीक R1ची लोकप्रियतेचं मुख्य कारण म्हणजे हे अफोर्डेबल आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे हे AI मॉडेल अमेरिकेच्या AI मॉडलपेक्षा स्वस्त आहे. Open AI o1ची किमत 15 डॉलर प्रति मिलियन इनपुट टोकन आणि 60 डॉलर प्रति मिलियन आउटपूट टोकन आहे. तर या चीनी AI मॉडलची किमत 0.55 डॉलर प्रति मिलियन इनपूट आणि 2.19 डॉलर प्रति मिलियन आउटपूट टोकन आहे. हे AI मॉडेल तयार करण्यासाठी फक्त दोन महिने लागल्याचा दावा चीनी कंपनीने केला आहे. OpenAI, Microsoft, Meta सारख्या कंपन्यांना त्यांचं AI मॉडल तयार करण्यासाठी अनेक वर्ष लागली आणि या दिग्गज कंपन्यांनी त्यासाठी अब्जावधी रुपये खर्च केले. त्या तुलनेत चीनने बाजी मारलीय.
DeepSeek AI चे महत्त्वाचे फीचर्स:
कॉस्ट एफिशिएन्सी:
DeepSeek-V3 मॉडेल फक्त 6 मिलियन डॉलरमध्ये विकसित झाले आहे, जे OpenAI सारख्या कंपन्यांच्या मॉडेल्सच्या तुलनेत खूपच कमी आहे. यासाठी कमी पॉवर असलेल्या हार्डवेअरचा वापर करण्यात आल्यानेच हे मॉडल स्वस्तात विकसित होऊ शकले.
ओपन-सोर्स मॉडेल:
हे मॉडेल ओपन-सोर्स आहे, म्हणजे युझर्स कोड मॉडिफाय करू शकतात, संशोधन करू शकतात, इत्यादी. यामुळे वापरकर्त्यांना अधिक स्वातंत्र्य आणि लवचिकता मिळते.
उत्कृष्ट परफॉरमन्स:
DeepSeek AI ने स्वतंत्र बेंचमार्क टेस्ट्समध्ये आश्चर्यकारक परफॉरमन्स दाखवला आहे. या मॉडेलने OpenAI आणि इतर US कंपन्यांना अनेक कार्यांमध्ये मागे टाकले आहे, उदा- समस्या सोडवणे आणि कोडिंग.
Deepseek च्या लोगोचा अर्थ :
डीपसीकचा लोगो कंपनीची मुख्य मूल्ये आणि मिशनचे प्रतिबिंब आहे. “डीप” चा अर्थ संशोधन, नवकल्पना आणि चांगल्या समजुती असा आहे. हे ‘अत्यंत कठीण’ प्रश्नांची उत्तरे देण्याच्या उद्देशाने डिझाइन केले गेले आहे.
“सीक” चा अर्थ ज्ञान, शोध आणि सतत अद्ययावत राहण्याशी संबंधित आहे. हे कंपनीच्या कटिंग-एज सोल्यूशन्सकडचा कल आणि त्याच्या समर्पणाचे प्रदर्शन करते.
लोगोच्या दृश्य डिझाइनवर लक्ष द्याल तर, त्यात लहरी आणि स्तर दिसतात. हे अन्वेषण, प्रगती आणि नवकल्पनाच्या प्रवासाचे प्रतीक आहे. Deepseek लोगो ज्ञान-आधारित ओळख दर्शवितो.
निळा रंग विश्वास, बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान दर्शवितो, तर रचनात्मकता आणि शक्ती दर्शविण्यासाठी तेजस्वी रंगांचा वापर केला आहे.
डीपसीक काय आहे?
DeepSeek-V3 ही एक अत्याधुनिक ओपन-सोर्स AI सिस्टम आहे. अल्पावधीतच ती अनेक देशांमध्ये पॉप्युलर झाली आहे. यूएस, यूके आणि चीनमध्ये या चॅटबॉटचा प्रभाव दिसून येत आहे.
डीपसीक कोणी तयार केला?
DeepSeek हे Liang Wenfeng यांनी तयार केले आहे. त्यांनी एआयच्या जगात अमेरिकेसमोर मोठं आव्हान दिलं आहे. ChatGPT च्या प्रतिस्पर्ध्याच्या रुपात स्वतःचा चॅटबॉट लॉन्च करून बाजारात उपलब्ध सर्व एआय कंपन्यांना चीनने हादरवून सोडलं आहे. या प्रवासाची गोष्ट खूपच रोचक आणि प्रेरणादायक आहे.
डीपसीकमुळे अनेक देश अलर्ट
तथापि, डीपसीकच्या बाबतीत काही देश सतर्क झाले आहेत. चिनी अॅप्सवर अनेक देशांचा संशय आहे. काही देशांनी तर त्याला त्यांच्या वर्क प्लेसमध्ये प्रतिबंधित केले आहे, तर काहींनी त्याला आपल्या अॅप स्टोअरमध्ये प्रवेशच दिला नाही.