AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

90,000 रुपयांचा लॅपटॉप अवघ्या 29 हजारात, 13 हजारांचा लॅपटॉप 10 हजारात, वॉरंटीसह

कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बहुसंख्य कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत.

90,000 रुपयांचा लॅपटॉप अवघ्या 29 हजारात, 13 हजारांचा लॅपटॉप 10 हजारात, वॉरंटीसह
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 22, 2021 | 6:51 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बहुसंख्य कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश (घरुन काम करण्याचे आदेश) दिले आहेत. परंतु घरून काम करताना आपल्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे एक चांगला लॅपटॉप (Laptop) आणि दुसरं म्हणजे फास्ट इंटरनेट कनेक्शन. (Dell, HP, Acer Refurbhished Laptop with warranty under 20000)

बहुतेक कर्मचारी त्यांच्याकडे चांगला लॅपटॉप नसल्याने चिंतेत असतात, किंवा काही जणांकडे लॅपटॉप नसल्याने चिंतेत असतात. अनेकदा लोक जुन्या किंवा खराब लॅपटॉपवरुन काम करत असतात. कारण नवीन लॅपटॉप घेण्याइतपत त्यांचं बजेट नसतं. तुमचीदेखील अशीच अवस्था असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण अशा अनेक ऑनलाईन डील्स उपलब्ध आहेत, ज्यात ग्राहकांना अगदी कमी किंमतीत लॅपटॉप खरेदी करता येतात. यामध्ये डेल, एचपी, लेनोव्हो, अॅसर यांसारख्या कंपन्यांच्या प्रोफेशनल लॅपटॉपचा समावेश आहे. चला तर मग जाणून घ्या, चांगले आणि स्वस्त लॅपटॉप्स कुठे मिळतील. (सूचना : यामध्ये तुम्हाला रिफर्बिश्ड (नुतनीकरण करण्यात आलेले) लॅपटॉप्स खरेदी करता येतील.)

HP Chromebook 14a-na0003TU

या लॅपटॉपची किंमत 24,990 रुपये इतकी आहे. हा लॅपटॉप तुम्ही 5,011 रुपयांच्या फ्लॅट डिस्काऊंटसह खरेदी करु शकता. सोबतच यावर तुम्हाला 6 महिन्यांची वॉरंटीदेखील मिळेल. हा लॅपटॉप 14 इंचांच्या स्क्रीनससह सादर करण्यात आला आहे. हा एक लाईटवेट प्लस टचस्क्रीन लॅपटॉप आहे.

या लॅपटॉपमध्ये इंटेल N4020 प्रोसेसर आहे. तसेच यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी SSD स्टोरेज आहे. या लॅपटॉपची स्टोरेज स्पेस 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा लॅपटॉप क्रोम ओएस वर चालतो. 940 रुपयांच्या ईएमआयसह तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करु शकता. ही डील अमेझॉनवर उपलब्ध आहे.

Avita Essential NE14A2INC433-CR

या लॅपटॉपची किंमत 17,990 रुपये इतकी आहे. 1,990 रुपयांच्या फ्लॅट डिस्काऊंटसह तुम्ही हा लॅपटॉप 16,000 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यावर 6 महिन्यांची वॉरंटीदेखील देण्यात आली आहे. हा लॅपटॉप 14 इंचांच्या स्क्रीनसह येतो. त्यात इंटीग्रेटेड ग्राफिक्स देण्यात आले आहेत.

यामध्ये सेलेरॉन N4020 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी एसएसडी स्टोरेज आहे. हा लॅपटॉप विंडोज 10 वर चालतो. 753 रुपयांच्या ईएमआयसह तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करु शकता. ही डील अमेझॉनवर उपलब्ध आहे.

Dell Latitude E6420-i5-16 GB-500 GB

या लॅपटॉपची मूळ किंमत 89,000 रुपये इतकी आहे. हा लॅपटॉप 60,310 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही हा लॅपटॉप अवघ्या 28,699 रुपयामध्ये खरेदी करु शकता. यावर 6 महिन्यांची वॉरंटीदेखील मिळेल. हा लॅपटॉप 14 इंचांची स्क्रीन आणि इंटीग्रेटेड ग्राफिक्ससह येतो.

सोबतच यामध्ये 2 जनरेशन कोर आय 5 प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामध्ये 16 जीबी रॅम आणि 500 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. हा लॅपटॉप व्हिंडोज 7 वर काम करतो. हा लॅपटॉप 1,351 रुपयांच्या EMI वर तुम्ही खरेदी करु शकता. ही डील अमेझॉनवर उपलब्ध आहे.

Iball Compbook-OHD Atom

या लॅपटॉपची किंमत 12,999 रुपये इतकी आहे. हा लॅपटॉप 2,009 रुपयांच्या फ्लॅट डिस्काऊंटसह 10,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. सोबतच यावर 6 महिन्यांची वॉरंटी देण्यात आली आहे. 11.6 इंचांच्या स्क्रीनसह येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये इंटेल इंटीग्रेटेड ग्राफिक्स देण्यात आले आहेत.

या लॅपटॉपमध्ये इंटेल अॅटम प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी EMMC स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. हा लॅपटॉप व्हिंडोज 7 वर चालतो. तसेच अवघ्या 376 रुपयांच्या EMI वर तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करु शकता. ही डील Flipkart च्या 2Gud प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या

Work From Home साठी लॅपटॉप घेताय? मग ‘हे’ 5 स्वस्त आणि दमदार लॅपटॉप्स जरुर पाहा

सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, 8GB/128GB स्टोरेजसह ढासू फीचर्स मिळणार

(Dell, HP, Acer Refurbhished Laptop with warranty under 20000)

Follow Us
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...
Sanjay Raut | राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट म्हणाले...