AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! फेसबुकवर कोव्हिड-19 आणि लसीसंदर्भात अफवा पसरवणं महागात पडेल, कंपनी कठोर पावलं उचलणार

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं थैमान घातलं आहे. त्याचदरम्यान, लोक सोशल मीडियावर खोटी माहिती किंवा त्यासंबंधित अफवा पसरवत आहेत.

सावधान! फेसबुकवर कोव्हिड-19 आणि लसीसंदर्भात अफवा पसरवणं महागात पडेल, कंपनी कठोर पावलं उचलणार
Facebook Hate content
| Updated on: May 21, 2021 | 8:15 PM
Share

मुंबई : भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं (Corona Second Wave) थैमान घातलं आहे. त्याचदरम्यान, लोक सोशल मीडियावर खोटी माहिती किंवा त्यासंबंधित अफवा पसरवत आहेत. विशेषत: फेसबुकवर असा कंटेट अनेकदा आढळला आहे, ज्यात कोरोनाशी संबंधित बर्‍याच अफवा आहेत. जर आपणही फेसबुकवर असे काही करत असाल तर जागरूक राहा, कारण फेसबुकचं अशा कंटेटवर लक्ष आहे. (Do not spread rumors about corona and vaccine on facebook)

भारत आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील बहुतांश भागात परिस्थिती हाताबाहेर जात आहे. अशातच भारतात विविध राज्यांच्या सरकारांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. याचदरम्यान फेसबुकने म्हटले आहे की, कोरोनाबाबत चुकीची माहिती आणि फेसबुकच्या धोरणांचे धोरणांचे उल्लंघन करणारा कंटेंट फेसबुकने हटवला आहे. कंपनीने इंस्टाग्रामवरुन 1.8 कोटींहून अधिक पोस्ट्स हटवल्या आहेत. फेसबुक गेल्या वर्षभरापासून अशा कंटेंटवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कंटेट आढळल्यास कंपनी तत्परतेने त्यावर अॅक्शन घेत आहे.

कोरोनावरील लसीबद्दल चुकीची माहिती पसरवू नका

आपल्या पहिल्या तिमाहीच्या कम्युनिटी स्टँडर्ड इनफोर्समेंट रिपोर्टमध्ये कंपनीने म्हटले आहे की, आम्ही या लसीची स्वीकृती वाढवण्याचे आणि लसीबद्दलची चुकीची माहिती थांबवण्यासाठी काम करत आहोत. सोशल मीडिया दिग्गज फेसबुकने बुधवारी आपल्या कोविड -19 घोषणेचा विस्तार केला आहे. जो राज्य आणि केंद्रीय आरोग्य विभागांना भारतात आवश्यक असलेल्या कोरोनाव्हायरस संबंधित अपडेट्स शेअर करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

अभ्रद भाषेचा वापर करणं महागात पडेल

फेसबुकवरील व्हीपी इंटिग्रिटी गाय रोझनच्या मते, लोक त्यांच्या व्यासपीठावर हानिकारक सामग्री किती वेळा पाहतात हे समजून घेण्यासाठी मेट्रिक्स सर्वात उपयुक्त आहे. फेसबुकवर अभ्रद भाषेचा प्रसार सातत्याने कमी होत आहे. रोझन म्हणाले, पहिल्या तिमाहीत अशा कंटेंटचे प्रमाण 0.05-0.06 टक्के इतकं होतं किंवा प्रति 10,000 व्ह्यूजपैकी 5 ते 6 व्ह्यूज इतकं होतं. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर द्वेषयुक्त भाषण किंवा अभद्र पोस्ट शक्य तितक्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर आम्ही त्यासाठी जो प्लॅन केला आहे त्याच्या अंमलबजावणीच्या प्रभावशीलतेचं सातत्याने मूल्यांकन करत आहोत. याशिवाय आम्ही चुका कमी केल्या आहेत आणि आम्ही तत्सम कंटेट प्लॅटफॉर्मवरुन हटवला आहे.

देशात कोरोनाबळी वाढले

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. (Corona Cases in India) सलग तीन दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्यानंतर काहीशी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 17 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 59 हजार 591 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र कोरोनाबळींचा आकडा पुन्हा एकदा वाढला आहे. कालच्या दिवसात 4 हजार 209 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.

गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 59 हजार 591 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 209 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 57 हजार 295 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

देशातील कोरोना रुग्णसंख्या

देशात 24 तासात नवे रुग्ण 2,59,591

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,57,295

देशात 24 तासात मृत्यू 4,209

एकूण रूग्ण 2,60,31,991

एकूण डिस्चार्ज 2,27,12,735

एकूण मृत्यू 2,91,331

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 30,27,925

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 19,18,79,503 ( Corona Cases in India 24 hours)

संबंधित बातम्या

कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतर जास्त अँटीबॉडी तयार होतात, ICMR प्रमुखांचा दावा

Covid 19 Home Test Kit Demo : 250 रुपयाच्या किटने घरीच कोरोना टेस्ट कशी करायची? स्टेप बाय स्टेप माहिती

(Do not spread rumors about corona and vaccine on facebook)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.