बॉयकॉट Facebook च्या नुसत्याच घोषणा, WhatsApp प्रायवसी पॉलिसीच्या विरोधानंतरही 11.22 अब्ज डॉलर्सची कमाई

नव्या गोपनीयता धोरणामुळे WhatsApp विरोधात युजर्समध्ये तीव्र नाराजी आहे. जगभरातून WhatsApp ला आणि WhatsApp चा मालकी हक्क असलेल्या Facebook ला मोठा विरोध होत आहे.

बॉयकॉट Facebook च्या नुसत्याच घोषणा, WhatsApp प्रायवसी पॉलिसीच्या विरोधानंतरही 11.22 अब्ज डॉलर्सची कमाई
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 3:07 PM

वॉशिंग्टन : WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीलाच नवं गोपनीयता धोरण (Privacy Policy) सादर केलं आहे. जर तुम्ही या अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, WhatsApp वरील मेसेजेस, चॅट्स व युजर्सचा डेटा आता सुरक्षित राहिलेला नाही. हा सर्व डेटा आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाणार आहे, अशा आशयाच्या बातम्या गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे WhatsApp विरोधात युजर्समध्ये तीव्र नाराजी आहे. जगभरातून WhatsApp ला आणि WhatsApp चा मालकी हक्क असलेल्या Facebook ला मोठा विरोध होत आहे. लोकांनी सोशल मीडियावर बॉयकॉट Facebook चा नारादेखील दिला. परंतु हा विरोध आणि या बॉयकॉटच्या घोषणा केवळ सोशल मीडियावरच आहेत, असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कारण इतक्या विरोधानंतरही Facebook ची कमाई सातत्याने वाढत आहे. (Facebook 4Q results soar despite protests over WhatsApp privacy)

Facebook ने 2020 च्या शेवटच्या तिमाहीमध्ये जोरदार प्रॉफिट (नफा) कमावलं आहे. कोरोना महामारीमुळे लोकांना घरीच राहावे लागले. त्यामुळे या काळात लोकांनी सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालवला. त्यामुळे कोरोना महामारीचा फेसबुकला फायदाच झाला आहे. डिजिटल जाहिरातींच्या माध्यमातून कंपनीने अब्जावधी डॉलर्सची उलाढाल केली आहे. दरम्यान, कंपनीने असा अंदाज व्यक्त केला आहे की, 2020 मध्ये जरी कंपनीने मोठा नफा कमावला असला तरी 2021 च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनी किती पैसे कमावेल याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे. येत्या काळात कंपनीला आर्थिक दबावाचा सामना करावा लागू शकतो, असे मत या क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

तीन महिन्यात 11.22 अब्ज डॉलर्सचा नफा

कंपनी सध्या नव्या गोपनीयता धोरणामुळे काही अडचणींचा सामना करत आहे. परंतु अद्याप त्याचा कंपनीच्या कमाईवर फारसा परिणाम झालेला नाही. परंतु सध्या तरी कंपनी नफ्यात आहे, असं म्हणता येईल. फॅक्टसॅटद्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेमध्ये विश्लेषकांनी म्हटलं आहे की, फेसबुकने ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल 11.22 अब्ज डॉलर्स किंवा 3.88 डॉलर प्रति शेयर इतका नफा कमावला आहे. ही कमाई 2019 च्या शेवटच्या तिमाहीमधील कमाईपेक्षा 53 टक्क्यांनी जास्त आहे. तसेच या वर्षभरात कंपनीच्या कमाईमध्ये 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर फेसबुकचा मंथली युजरबेस (मासिक वापरकर्त्यांची संख्या) 12 टक्क्यांनी वाढून 2.8 अब्ज इतका झाला आहे. 2020 च्या शेवटपर्यंत फेसबुकची एकूण कर्मचारी संख्या 58,604 इतकी होती.

सिग्नलला फायदा

प्रायव्हसी पॉलिसी बदलल्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअ‍ॅपला चांगलाच फटका बसला आहे. प्रायव्हसीच्या नव्या फंद्यामुळे यूझर्सनी सिग्नल मेसेजिंग अ‍ॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यास सुरुवात केली आहे. या क्रॉस-प्लॅटफॉर्म एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिस सिग्नल अ‍ॅपने भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. डाऊनलोडिंगच्या बाबतीत सिग्नल अ‍ॅप (Signal App) टॉपवर आहेत.

नवे युजर्स मिळवण्यात सिग्नल अव्वलस्थानी

क्रॉस-प्लॅटफॉर्म एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिस सिग्नल अॅपने भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये डाऊनलोडिंगच्या बाबतीत पहिला क्रमांक मिळवला आहे. शनिवारी सिग्नलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करत भारतात व्हॉट्सअ‍ॅपला मागे सारत सिग्लनने पहिलं स्थान मिळावल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे. फक्त भारतातच नाही तर जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँगकाँग, स्वित्झर्लंडमध्येही सर्वाधिक डाउनलोड केलेल्या अ‍ॅप्समध्ये हा अव्वल स्थानावर आहे.

दोन दिवसात एक लाखांहून अधिक नवे युजर्स

रॉयटर्सने त्यांच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, सेन्सर टॉवर डेटाचा हवाला देत गेल्या दोन दिवसांमध्ये सिग्नल अॅप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर 100,000 पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केला आहे. इतकंच नाही तर, 2021 च्या पहिल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपच्या नवीन यूजर्समध्ये 11 टक्क्यांनी घट झाली असल्याचंही समोर आलं आहे.

संबंधित बातम्या 

WhatsApp, Signal की Telegram, कोणतं अ‍ॅप आहे बेस्ट आणि सुरक्षित?

सावधान! गुगलच्या एका क्लिकवर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये कोणीही होऊ शकतं सहभागी

टेलिग्रामवर मात करण्यासाठी फेसबुककडून खोटा अपप्रचार, मार्केटिंगवर 73 हजार कोटींचा खर्च केल्याचा दावा

WhatsApp ऐवजी Telegram निवडणाऱ्या युजर्ससाठी वाईट बातमी, अ‍ॅप सुरक्षित नसल्याचा दावा

तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल

नागरिकांकडून WhatsApp ऐवजी Signal अ‍ॅपचा वापर, ‘या’ देशात Signal अ‍ॅप कायमस्वरुपी बॅन

(Facebook 4Q results soar despite protests over WhatsApp privacy)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.