लाँचिंगसाठी FAU-G सज्ज, अँड्रॉयडवर डाऊनलोड कसा कराल? जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

लाँचिंगसाठी FAU-G सज्ज, अँड्रॉयडवर डाऊनलोड कसा कराल? जाणून घ्या पूर्ण प्रोसेस
FAU-G

अभिनेता अक्षय कुमारने PUBG गेमला पर्याय म्हणून FAU-G गेम लाँच होणार असल्याची घोषणा केली होती.

अक्षय चोरगे

|

Jan 25, 2021 | 2:49 PM

मुंबई : जगभरात PUBG हा गेम प्रचंड लोकप्रिय ठरला होता. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत या गेमची क्रेझ होती. मात्र केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. यानंतर PUBG गेमच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं होतं. मात्र आता PUBG गेमला पर्याय म्हणून FAU-G गेम लाँच केला जाणार आहे. उद्या (26 जानेवारी) हा गेम लाँच केला जाणार आहे. अशी घोषणा आधीच करण्यात आली होती. त्यात कोणताही बदल केला जाणार नाही, कारण कंपनीने नुकतेच सांगितले आहे की, हा गेम आता लाँचिंगसाठी पूर्णपणे सज्ज आहे. हा गेम nCore गेमिंगने डेव्हलप केला आहे. (FAU-G releasing tomorrow 26th January, here are the tips to download on android device)

nCore कडून 30 नोव्हेंबर 2020 पासून हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध करण्यात आला आहे. मेड इन इंडिया मल्टी-प्लेयर मोबाइल गेम FAU-G ला युजर्सचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुगल प्ले-स्टोरवर अवघ्या 24 तासांमध्ये 10.6 लाख युजर्सनी या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन केले होतं. आता ही संख्या चार पटींनी वाढली आहे. आतापर्यंत 40 लाख युजर्सनी या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन केलं आहे. NCore Games चे सह-संस्थापक विशाल गोंडल म्हणाले की, हा गेम केवळ मिड-रेंज आणि हाय-एंड स्मार्टफोन्ससाठीच आहे, तरिदेखील या गेमसाठी आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांनी प्री-रजिस्ट्रेशन केलं आहे, हे खूप मोठं यश आहे.

दरम्यान, कंपनीने आधीच घोषणा केली आहे की, युजर्सचा फिडबॅक आणि मागणीचा विचार करुन हा गेम स्वस्तातल्या स्मार्टफोन्साठी उपलब्ध करुन दिला जाईल, किंवा त्यांच्यासाठी या गेमचं लाईट व्हर्जन लाँच केलं जाईल. NCore गेम्सचे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणाले की, “आम्हाला असं वाटतंय की लवकरच या गेमसाठी 5 मिलियन (50 लाख) किंवा त्याहून अधिक युजर्स प्री-रजिस्टर करतील. आतापर्यंत कोणत्याही मोबाईल गेमसाठी भारतात आतापर्यंत इतक्या मोठ्या संख्येने युजर्सनी प्री-रजिस्टर केलं असेल, असं मला तरी वाटत नाही. या आकडेवारीवरुन Fau-G गेमसाठी युजर्समध्ये असलेली क्रेझ पाहायला मिळत आहे.”

दरम्यान काही युजर्सना किंवा नव्या बॅटल गेम प्रेमींना प्रश्न पडला आहे की, हा गेम डाऊनलोड कसा करायचा किंवा त्यांच्या अँड्रॉयड डिव्हाईसवर हा गेम कसा सुरु करायचा? त्यांना आम्ही Fau-G कसा डाऊनलोड करायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत.

FAU-G कसा डाऊनलोड कराल?

FAU-G हा गेम गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करता येईल. परंतु उद्या गेमच्या लाँचिंगपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. गेम लाँच झाल्यानंतर काय-काय करावं लागेल. त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1. सर्वात आधी गुगल प्ले स्टोर ओपन करा.

2. FAU-G असं सर्च करा.

3. त्यानंतर सर्च रिझल्ट्स दिसतील. त्यामधील पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावरच FAU-G असेल, त्यावर क्लिक करा. (सुरुवातीच्या पर्यायांमध्ये FAU-G गेम दिसला नाही, तर तुम्हाला थोडं स्क्रोल करावं लागेल.

4. गुगल प्ले स्टोरवर गेम इन्स्टॉल करण्यासाठीचं पेज ओपन होईल.

5. इन्स्टॉलचं बटण युजर्सना तेव्हाच दिसेल, जेव्हा कंपनीकडून गेम लाईव्ह केला जाईल.

6. ज्या युजर्सनी या गेमसाठी आधीच प्री-रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांना गेम लाईव्ह होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल. नोटिफिकेशनवर क्लिक करताच युजर्स थेट इन्स्टॉलेशन पेजवर जातील. युजर्स त्याद्वारे गेम इन्स्टॉल करु शकतात.

गुगल प्ले स्टोरवरुन बनावट FauG गेम्स हटवले

हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करण्यापूर्वी कंपनीने या नावाचे बनावट गेम्स प्ले स्टोरवरुन हटवले होते. FauG गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करुन देताना कंपनीने काही गेम प्ले फोटोदेखील शेअर केले आहेत, ज्यावरून या गेमची थीम कशी असणार आहे, याचा आपण अंदाज बांधू शकतो. काही दिवसांपूर्वी या गेमचा एक व्हिडिओ ट्रेलरही शेअर करण्यात आला होता. दरम्यान, या गेमसाठी प्ले स्टोरवर रजिस्टर करणाऱ्या युजर्सना गेम लाँच होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल, त्यानंतर युजर्स गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करुन खेळू शकतील.

अ‍ॅपल युजर्सची प्रतीक्षा संपली

FAU-G हा मोबाइल गेम अद्याप लाँच झालेला नाही, हा गेम Google Play Store वर प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे. सुरूवातीला हा गेम केवळ अँड्रॉयड युजर्ससाठीच लाँच केला जाणार आहे, अशी चर्चा होती. त्या चर्चा आधी खऱ्या ठरल्या होत्या, कारण हा गेम केवळ गुगल प्ले स्टोरवर प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्यामुळे या गेमसाठी अ‍ॅपल युजर्सना प्रतीक्षा करावी लागेल, असे बोलले जात होते. परंतु अ‍ॅपल युजर्सची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण हा गेम 26 जानेवारी रोजी अँड्रॉयडसह अ‍ॅपल युजर्ससाठीदेखील लाँच केला जाणार आहे.

कसा आहे गेम प्ले?

गुगल प्ले स्टोअरवर कंपनीने गेमसोबत काही फोटो अपलोड केले आहेत. यामध्ये सैनिक लढताना दिसत आहेत. डोंगराळ प्रदेशात लढाई सुरु असल्याचे दिसत आहे. या गेमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले आहे की, FauG कमांडो अत्यंत धोकादायक सीमावर्ती भागात गस्त घालत आहेत आणि ते भारताच्या शत्रूंबरोबर युद्ध करतील. गेम-प्ले भारतीय सैन्याशी संबंधित आहे, असं प्ले स्टोरवरील फोटोंवरुन वाटतंय. गेममधील खेळाडूंना FAU-G कमांडो म्हटलं जाईल, धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची ही तुकडी असेल.

या गेमबाबत माहिती देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्विट केले होते. त्यामध्ये अक्षयने म्हटले होते की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानाला समर्थन देत FAU-G गेम सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. या गेममध्ये प्लेयर्स मनोरंजनाव्यतिरिक्त सैनिकांच्या बलिदानाविषयी माहिती मिळवू शकतील. या गेममधून जे उत्पन्न येईल त्यापैकी 20 टक्के रक्कम भारताच्या ‘वीर ट्रस्ट’साठी दान केलं जाईल.” अक्षय कुमारने 4 सप्टेंबर रोजी या गेमची घोषणा केली होती.

संबंधित बातम्या

PUBG Mobile India आज भारतात लाँच होणार?

PUBG नंतर आता TikTok ही परतणार? युजर्समध्ये आनंदाचं वातावरण

ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल दिला, पोराने PUBG गेममध्ये 16 लाख उडवले

PUBG गेम खेळू दिला नाही, मुलाने वडिलांच्या शरीराचे तीन तुकडे केले

(FAU-G releasing tomorrow 26th January, here are the tips to download on android device)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें