Battlegrounds Mobile India गेमही ब्लॉक, सरकारच्या IT कायद्याची अडसर की आणखी काही?

भारताच्या IT कायद्याच्या कलम 69A अंतर्गत केंद्र सरकारला राष्ट्रीय सुरक्षा आणि इतर कारणांमुळे विशिष्ट सामग्रीवरील कुणालाही बंधन आणण्याचा अधिकार आहे. या कलमांतर्गत आदेश साधारणपणं गोपनीय ठेवले जातात.

Battlegrounds Mobile India गेमही ब्लॉक, सरकारच्या IT कायद्याची अडसर की आणखी काही?
BGMIImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 1:06 PM

नवी दिल्ली :  बॅटल रॉयल फॉरमॅट मोबाईल गेम PUBG वर भारतात बंदी लाऊन बराच काळ लोटला आहे. चीनकडून डेटा लीक होण्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अनेक चीनी अ‍ॅप्सवर (Chinese App) भारतात बंदी घालण्यात आली होती. PUBG ची प्रकाशक कंपनी Tencent Games चायनीज होती. यानंतर PUBG BGMI (Battlegrounds Mobile India) च्या धर्तीवर एक नवीन गेम आला. दक्षिण कोरियन डेव्हलपर कंपनी क्राफ्टननं या गेमला भारतात (India) आणलं होतं. गुरुवारी भारतात हा गेम Google ची मूळ कंपनी Alphabet Incने बँन केलं आहे. अचानक कोणतीही माहिती किंवा भीती न बाळगता गुरुवारी हा गेम Google Play Store आणि App Store वरून गायब झाला. त्यानंतर त्याच्या कारणांवर चर्चा केली जात आहे. याविषयी वेगवेगळ्या अँगलनं बघितलं जातंय. यावर अलीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा देखील रंगील आहे. त्यामुळे याविषयी आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत.

काही आदेश गोपनीय

काही रिपोर्टनुसार बीजीएमआयवर बंदी घालण्यामागे अशीच काही कारणं असू शकतात. सरकारच्या नवीन आयटी कायद्यांतर्गत हा गेम काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे. रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार सरकारनं आयटी कायद्यांच्या तरतुदींनुसार क्राफ्टनचा गेम काढून टाकण्यास सांगितलं आहे. रिपोर्टमध्ये या प्रकरणाची थेट माहिती असलेल्या एका सूत्रानं सांगितलं की सरकारनं या प्रकरणातही त्याच तरतुदींचा उल्लेख केला आहे. यामुळे 2020 मध्ये चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यासाठी करण्यात आला होता.  जाणकार असं सांगतात की, भारताच्या IT कायद्याच्या कलम 69A अंतर्गत केंद्र सरकारला राष्ट्रीय सुरक्षा आणि इतर कारणांमुळे विशिष्ट सामग्रीवरील कुणालाही बंधन आणण्याचा अधिकार आहे. या कलमांतर्गत दिलेले आदेश साधारणपणं गोपनीय ठेवले जातात.

इतर रिपोर्टचं काय म्हणनं आहे?

रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार गुरुवारी गुगलच्या प्रवक्त्याकडून असं विधान केलं होतं की, भारत सरकारच्या आदेशानंतर क्राफ्टनचा गेम ब्लॉक करण्यात आला आहे. दक्षिण कोरियन कंपनी क्राफ्टननं लोकप्रिय मोबाइल गेम PUBG च्या जागी गेल्या वर्षी जुलैमध्ये बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया हा नवीन मोबाइल गेम भारतात लाँच केला. यासाठी 18 मे 2021 पासून नोंदणी सुरू झाली.

हे सुद्धा वाचा

PUBG सह 118 मोबाईल ऍप्लिकेशन्स ब्लॉक

सप्टेंबर 2020 मध्ये भारत सरकारनं राष्ट्राच्या सार्वभौमत्व, अखंडता आणि संरक्षणाला लेखी धोका असल्याचं कारण देत PUBG सह 118 मोबाईल ऍप्लिकेशन्स ब्लॉक केले होते. त्यानंतर, क्राफ्टनच्या उपकंपनी PUBG कॉर्पोरेशननं सांगितले होतं की, चीनच्या Tencent Games यापुढे PUBG मोबाइल फ्रँचायझी भारतात वितरीत करण्यासाठी अधिकृत असतील. यानंतर भारतीय बाजारपेठेसाठी नवीन गेम लाँच करण्याची तयारी सुरू झाली.

तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.