News Game :’एपिक क्रिकेट -बिग लीग’ भारतात लाँच, गेममध्ये काय विशेष, कुणी बनवलाय? वाचा सविस्तर…

डॉल्‍बी अ‍ॅटमॉसच्‍या माध्‍यमातून एपिक क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण क्षण अधिक वास्‍तववादी वाटतील. खेळाडूला चेंडू स्‍टॅण्‍डमध्‍ये गेल्‍यानंतर स्‍टॅण्‍ड्समधील गर्दीचा मोठा आवाजही ऐकू येईल. खेळाडूंना गेम अस्‍सल अनुभव देईल. अधिक वाचा...

News Game :'एपिक क्रिकेट -बिग लीग' भारतात लाँच, गेममध्ये काय विशेष, कुणी बनवलाय? वाचा सविस्तर...
'एपिक क्रिकेट -बिग लीग' भारतात लाँच
Image Credit source: social
शुभम कुलकर्णी

|

Aug 17, 2022 | 1:44 PM

नवी दिल्ली : मूंग लॅब्‍स या स्‍मार्टफोन्‍स (Smartphone) व टॅब्‍लेट डिवाईसेससाठी फ्री-टू-प्‍ले (F2P) गेम्‍सच्‍या आघाडीच्‍या विकासक व प्रकाशक कंपनीने डॉल्‍बी लॅबोरेटरीजसोबत काम करत डॉल्बी अ‍ॅटमॉस मध्‍ये त्‍यांचा लोकप्रिय मोबाइल गेम एपिक क्रिकेट (Game Epic Cricket) लाँच केला. क्रिकेटची अतीव आवड असलेल्‍या चाहत्‍यांसाठी डिझाइन करण्‍यात आलेला डॉल्‍बी अ‍ॅटमॉसमधील एपिक क्रिकेट क्रांतिकारी मोबाइल क्रिकेट गेमिंग अनुभव आहे, जो अभूतपूर्व, अविश्‍वसनीय व सर्वोत्तम गेमप्‍लेचा आनंद देतो. या गेममागील टीमने अभूतपूर्व वास्‍तविक अनुभवाच्‍या निर्मितीसाठी जटिल अल्‍गोदिरम्‍स व तंत्रांचा वापर केला आहे. हा अनुभव गेमरच्‍या दृश्‍य व श्रवण इंद्रियांवर दीर्घकालीन प्रभाव निर्माण करेल. डॉल्‍बी अ‍ॅटमॉसच्‍या माध्‍यमातून एपिक क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण क्षण अधिक वास्‍तववादी वाटतील. खेळाडूला चेंडू स्‍टॅण्‍डमध्‍ये गेल्‍यानंतर स्‍टॅण्‍ड्समधील गर्दीचा मोठा आवाजही ऐकू येईल.

खेळाडू पुढील चेंडूचा सामना करण्‍यासाठी सज्‍ज होईल. तसेच स्‍टम्‍प्‍समागून यष्‍टीरक्षकाचा स्‍पष्‍टपणे ऐकू येणारा आवाज गेमच्‍या वास्‍तविकतेमध्‍ये अधिक भर करेल. खेळाडू व प्रेक्षकांच्‍या सर्व भावना अस्‍सल अनुभव देतील, ज्‍यामुळे खेळाडू अभूतपूर्वरित्‍या गेमशी संलग्‍न राहिल.

गेममध्ये काय?

या विकासाबाबत बोलताना मूंग लॅब्‍सचे उत्‍पादन प्रमुख समित बब्‍बर म्‍हणाले, ”भारतीय गेमर आज मोबाइलवर त्‍याचा आवडता गेम खेळताना दर्जात्‍मक अनुभवाचा शोध घेत आहे. डॉल्‍बी अ‍ॅटमॉससह एपिक क्रिकेटने सर्वोत्तम गेमप्‍लेच्‍या पूर्णत: नवीन स्‍तराला सादर केले आणि गेमर्सना अस्‍सल आवाजासह गेमचा आनंद देईल, ज्‍यामुळे त्‍यांना वास्‍तविकत: मैदानावर खेळत असल्‍यासारखे वाटेल. तुम्‍ही एपिक क्रिकेट प्रवासादरम्‍यान तुमच्‍या संघाचे नेतृत्‍व करत असताना प्रेक्षकांचा आवाज, तणाव व उत्‍साहामध्‍ये सामील व्‍हाल.”

अधिकाधिक मागणी

”मोबाइल-केंद्रित देश असल्‍यामुळे भारतात मोबाइल गेमिंग झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांकडून त्‍यांच्‍या स्‍मार्टफोन्‍सवर भव्‍य ऑडिओ अनुभवासांसाठी अधिकाधिक मागणी होत आहे. आम्‍ही डॉल्‍बी अ‍ॅटमॉससह या मागणीची पूर्तता करतो, जे गेमिंगच्‍या वेळी अधिक वास्‍तविक व रोमांचक अनुभव निर्माण करण्‍यासाठी सर्वोत्तम सुस्‍पष्‍टता, सविस्‍तर व सखोल आवाज देते. आम्‍हाला विश्‍वास आहे की, डॉल्‍बी अ‍ॅटमॉससह गेमर्स एपिक क्रिकेट खेळताना संपन्‍न अनुभवाचा आनंद घेतील,” असे डॉल्‍बी लॅबोरेटरीजचे जपान व उदयोन्‍मुख बाजारपेठांमधील वरिष्‍ठ प्रादेशिक संचालक आशीम माथूर म्‍हणाले.

सुस्‍पष्‍ट व शार्पर आवाज

डॉल्‍बी अ‍ॅटमॉस चोहो बाजूंनी सराऊंड साऊंड ऐकू येण्‍याची खात्री देते, ज्‍यामधून तुम्‍हाला अधिक सुस्‍पष्‍ट व शार्पर आवाजासह गेमचा आनंद घेता येतो, ज्‍यामुळे तुम्‍हाला मैदानावर खेळत असल्‍यासारखे वाटते. अत्‍यंत अचूकता अधिक वास्‍तविक व अभूतपूर्व रोमांचक गेम अनुभवासाठी गंतव्‍य व ऑडिओ दिशा परिभाषित करते.

हे सुद्धा वाचा

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें