AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपाटातल्या जुन्या फोनला द्या नवी नोकरी, फेकून देण्याऐवजी करा स्मार्ट वापर

तुमच्याही घरात ड्रॉवरच्या कोपऱ्यात एखादा जुना स्मार्टफोन धूळ खात पडून आहे का? नवा फोन आल्यावर जुन्याचं काय करायचं, विकला तर चांगली किंमत नाही, आणि फेकून द्यायलाही जीवावर येतं! पण थांबा!

कपाटातल्या जुन्या फोनला द्या नवी नोकरी, फेकून देण्याऐवजी करा स्मार्ट वापर
smartphone
| Edited By: | Updated on: May 16, 2025 | 12:06 AM
Share

आपल्या प्रत्येकाच्या घरात कुठेतरी कोपऱ्यात किंवा ड्रॉवरमध्ये एक जुना स्मार्टफोन हमखास पडून असतो. नवीन मॉडेल आलं की आपण उत्साहाने ते घेतो आणि जुना फोन अडगळीत जातो. कधीतरी त्याला विकण्याचा विचार येतो, पण चांगली किंमत मिळत नाही किंवा विकायचा कंटाळा येतो. मग तो तसाच पडून राहतो, पण विचार करा, हा ‘रिटायर्ड’ वाटणारा फोन अजूनही तुमच्यासाठी खूप काही करू शकतो! त्याला फेकून देण्याऐवजी किंवा अडगळीत ठेवण्याऐवजी आपण त्याला काही नवीन आणि उपयोगी ‘नोकऱ्या’ देऊ शकतो.

सुरक्षा रक्षक म्हणून ड्युटी

तुमच्या जुन्या फोनचा Camera अजूनही ठीकठाक चालतोय? मग त्याला तुमच्या घराचा किंवा ऑफिसचा २४ तास नजर ठेवणारा ‘सुरक्षा रक्षक’ बनवता येईल! कसं? अगदी सोप्पं! फोनला एका ठिकाणी स्टँडवर ठेवा, जिथून तुम्हाला हवा तो View मिळेल. त्याला Wi-Fi ने कनेक्ट करा आणि प्ले स्टोअरमधून Alfred Home Security Camera किंवा IP Webcam सारखं एखादं सिक्युरिटी कॅमेरा ॲप इंस्टॉल करा. झालं! आता तुम्ही तुमच्या नवीन फोनवरून कधीही, कुठूनही तिथलं लाईव्ह फुटेज बघू शकता. घरात लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्ती असतील, किंवा तुम्ही बाहेरगावी गेला असाल, तर हा उपाय खूपच उपयोगी ठरू शकतो. काही ॲप्स तर हालचाल दिसल्यास तुम्हाला अलर्टही पाठवतात.

मुलांच्या अभ्यासाचा डिजिटल मित्र

आजकाल मुलांना अभ्यासासाठी किंवा काहीतरी नवीन शिकण्यासाठी ऑनलाइन साधनांची गरज लागते. पण त्यांना सतत आपला महागडा नवीन फोन देणं पालकांना सुरक्षित वाटत नाही. इथे तुमचा जुना फोन कामाला येतो! त्याला Factory Reset करा. त्यात फक्त आणि फक्त मुलांसाठी उपयुक्त असलेले लर्निंग ॲप्स, एज्युकेशनल गेम्स किंवा माहितीपूर्ण व्हिडीओज असलेले ॲप्स (उदा. YouTube Kids) टाका. महत्त्वाचं म्हणजे, त्यावर Parental Control जरूर सेट करा, म्हणजे मुलं चुकीच्या गोष्टी बघू शकणार नाहीत. झालं, मुलांसाठी एक सुरक्षित ‘डिजिटल मित्र’ तयार!

म्युझिक लव्हर

तुम्ही म्युझिक लव्हर आहात? तर जुना फोन तुमचा खास ‘म्युझिक स्टेशन’ बनू शकतो. त्यात तुमचे आवडते म्युझिक ॲप्स इंस्टॉल करा, गाणी डाउनलोड करा आणि एका चांगल्या ब्लूटूथ स्पीकरला जोडून ठेवा. आता म्युझिकचा आनंद घ्या, तोही तुमच्या नवीन फोनवर कॉल किंवा नोटिफिकेशनचा व्यत्यय न येऊ देता! तुम्ही हा फोन कारमध्येही फक्त गाण्यांसाठी वापरू शकता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.