आयफोन वापरकर्त्यांसाठी खूशखबर, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटचे फिचर लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर होणार उपलब्ध

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 12, 2021 | 4:17 PM

या फिचरचे नाव आहे View Once, जे जूनमध्येच अँड्रॉइड बीटा वापरकर्त्यांसाठी आणले गेले होते आणि आता ते iOS बीटा वापरकर्त्यांसाठी देखील आणले गेले आहे.

आयफोन वापरकर्त्यांसाठी खूशखबर, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटचे फिचर लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर होणार उपलब्ध
आयफोन वापरकर्त्यांसाठी खूशखबर, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटचे फिचर लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर होणार उपलब्ध
Follow us

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत हटके फिचर्स आणत आहे. आता कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी असे फिचर आणत आहे, ज्यामध्ये चॅटमध्ये पाठविलेले फोटो आणि व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर डिलिट होतील. हे फिचर स्नॅपचॅट आणि इंस्टाग्रामच्या Disappearing Messages फिचरप्रमाणेच आहे. या फिचरचे नाव आहे View Once, जे जूनमध्येच अँड्रॉइड बीटा वापरकर्त्यांसाठी आणले गेले होते आणि आता ते iOS बीटा वापरकर्त्यांसाठी देखील आणले गेले आहे. (Good news for iPhone users, Instagram and Snapchat features will soon be available on WhatsApp)

याबद्दल WABetaInfo ने माहिती दिली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की हे आयओएस वापरकर्त्यांसाठी रोलआऊट केले आहे. यासह, WABetaInfo म्हणाले की, हे वैशिष्ट्य बीटा टेस्टर्ससाठी रोलआऊट झाले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला फक्त एक फोटो किंवा व्हिडिओ पाठवावा लागेल आणि आपल्याला चॅट बारमध्ये View Once फिचर मिळेल. यामध्ये हे देखील सांगितले गेले आहे की View Once या फिचरमध्ये स्क्रीनशॉट ब्लॉक केले गेले नाही. अशा स्थितीत जर फोटो आणि व्हिडिओ घेणारी व्यक्ती स्क्रीनशॉट घेत असेल तर पाठविणार्‍या व्यक्तीस त्याबद्दल माहिती मिळणार नाही. अशा परिस्थितीत हे वैशिष्ट्य योग्यरीत्या वापरले जाणे महत्वाचे आहे.

असे वापरू शकता हे फिचर

जर आपण View Once हे फिचर वापरत असला तर आपण चॅट मॅसेजमध्ये पाठवलेले फोटो आणि व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या मोबाईलमधून डिलिट होतील. यामध्ये पाठविणाऱ्या व्यक्तीला फोटो आणि व्हिडिओ कधी ओपन केले हे कळेल, कारण बबल मॅसेजमध्ये ‘Opened’लिहिलेले असेल. आयओएस बीटा परीक्षकांसाठी हे फिचर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आपण बीटा टेस्टर असल्यास आपण हे फिचर वापरू शकता. व्हॉट्सअॅप हे सतत रोलआऊट करीत आहे.

Android बीटा टेस्टरसाठी रोलआऊट झाले आहे हे फिचर

हे फिचर आधीपासूनच Android बीटा टेस्टरसाठी आणले गेले आहे. हे फिचर वापरण्यासाठी, Android वापरकर्त्यांनी प्रथम मीडिया सिलेक्ट करणे आवश्यक आहे आणि नंतर क्लॉक आयकॉनवर टॅप करावे लागेल. हा पर्याय “Add a Caption” बारमध्ये मिळेल. चॅटमध्ये पाठविलेला फोटो रिसिव्हरने ओपन करताच सेंडरला ती माहिती मिळेल. एकदा मीडिया ओपन केल्यानंतर व्हॉट्सअॅप रिसिव्ह करणाऱ्याला “This Photo is set to view once. For more privacy, this photo will disappear after you close it” म्हणजेच, “हा फोटो एकदा पाहण्यासाठी सेट केला आहे. अधिक गोपनीयतेसाठी हा फोटो आपण चॅट बंद केल्यानंतर डिलिट होईल, असा मॅसेज दिसेल. (Good news for iPhone users, Instagram and Snapchat features will soon be available on WhatsApp)

इतर बातम्या

भारतीय महिलांना 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यश, दिर्घकाळापासूनची अपयशाची मालिका खंडित

Video | हिमाचल प्रदेशात ढगफुटी, नद्यांना पूर, वाहनेही गेली वाहून, व्हिडीओ व्हायरल

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI