AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Birthday Doodle : गुगलचा 22 वा जन्मदिवस, जन्मदिनानिमित्त खास डुडल

गुगल आज आपला 22 वा जन्मदिवस साजरा करत आहे (Google Birthday Doodle). जन्मदिनानिमित्त गुगलने एक खास डुडल होम पेजवर तयार केले आहे.

Google Birthday Doodle : गुगलचा 22 वा जन्मदिवस, जन्मदिनानिमित्त खास डुडल
| Edited By: | Updated on: Sep 27, 2020 | 1:42 PM
Share

मुंबई : गुगल आज आपला 22 वा जन्मदिवस साजरा करत आहे (Google Birthday Doodle). जन्मदिनानिमित्त गुगलने एक खास डुडल होम पेजवर तयार केले आहे. या खास रंग-बेरंगी डुडलवर क्लिक केल्यावर गुगलच्या सर्च रिझल्ट पेजवर तुम्ही जाणार. गुगल डुडलला फेसबुक, ट्विटर आणि इमेलद्वारेही तुम्ही शेअर करु शकता. गुगल डुडलवर एक कॉपी बटण दिले आहे. त्यामुळे तुम्ही सहज कुठेही शेअर करु शकता (Google Birthday Doodle).

प्रत्येक डुडलप्रमाणे यावरही एक शॉर्ट डिस्क्रिप्शन तयार केलं आहे. ज्यामध्ये सेलिब्रेशन संबंधित एक माहिती दिली आहे. गुगलची स्थापना लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी 1998 मध्ये केली होती. हे दोघे त्यावेळी स्टॅनफोर्ड यूनिव्हिर्सिटीमध्ये पीएचडी करत होते. गुगल हा शब्द गणिताच्या Googol या शब्दावरुन तयार केला आहे.

गुगलची पेरेंट कंपनी Alphabet Inc. आहे. गुगल प्रत्येक विशेष दिनी आणि महापुरुषांच्या आठवणींना गुगल डुडलच्या माध्यमातून उजाळा देत असतो. तसेच शुभेच्छा आणि श्रद्धांजलीही अर्पत करतो.

आज गुगलचा 22 व्या जन्मदिनानिमित्त एक खास डुडल आहे आणि यामध्ये G अक्षर एका बर्थडेच्या टोपीसारखे तयार केले आहे. तसेच ते अॅनिमेटड आहे. हा G एका लॅपटॉपमध्ये पाहत आहे आणि त्याच्या आजूबाजूला सर्व गिफ्ट बॉक्स, एक केक आहे. तर बाकीचे चार अक्षरं एका विंडोमध्ये दाखवले आहेत.

दरम्यान, गुगल शब्द 2002 मध्ये अमेरिकन डायलेक्ट सोसायटीद्वारे सर्वाधिक वापरणारा शब्द म्हणून निवडला गेला. यानंतर चार वर्षांनी हा शब्द ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये जोडला गेला.

संबंधित बातम्या :

एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल, व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर येणार

ना पक्ष पाहतो, ना राजकीय हितसंबंध; भाजपबाबत नरमाईच्या आरोपांवर फेसबुकचे स्पष्टीकरण

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.