AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honor चा नवा रेकॉर्ड, एका महिन्यात 9X सीरिजच्या 30 लाख स्मार्टफोनची विक्री

Huawei चा सब-ब्रँड Honor ने गेल्या महिन्यात मिड-रेंजचे दोन नवे स्मार्टफोन Honor 9X आणि 9X Pro लाँच केले. लाँच झाल्याच्या एका महिन्याच्या आत Honor 9X सिरीजने विक्रीचा नवा रेकॉर्ड बनवला आहे. एका महिन्याच्या आत या सिरीजचे 30 लाखांहून जास्त युनिट्सची विक्री झाली आहे.

Honor चा नवा रेकॉर्ड, एका महिन्यात 9X सीरिजच्या 30 लाख स्मार्टफोनची विक्री
| Updated on: Aug 28, 2019 | 7:56 PM
Share

मुंबई : Huawei चा सब-ब्रँड Honor ने गेल्या महिन्यात मिड-रेंजचे दोन नवे स्मार्टफोन Honor 9X आणि 9X Pro लाँच केले. लाँच झाल्याच्या एका महिन्याच्या आत Honor 9X सीरिजने विक्रीचा नवा रेकॉर्ड (Honor 9X new record) बनवला आहे. एका महिन्याच्या आत या सीरिजचे 30 लाखांहून जास्त युनिट्सची विक्री झाली आहे, असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये Honor 9X आणि Honor 9X Pro दोन्ही स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

गेल्या महिन्यात जेव्हा कंपनीने Honor 9X सीरिज लाँच केली, तेव्हा या सीरिजचे फोन हे कंपनीचे बेस्ट सेलिंग स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला होता. तेव्हा या सीरिजचे 1.5 कोटी युनिट्सची विक्री झाली होती. यापैकी 1 कोटी युनिट्सची विक्री 173 दिवसांमध्येच झाली होती.

Honor 9X आणि 9X Pro च्या किमती

Honor 9X ची किंमत जवळपास 14,000 रुपये आहे, तर Honor 9X Pro ची किंमत जवळपास 22,000 रुपये आहे. कंपनी भारतातही याच रेंजमध्ये हे फोन लाँच करण्याची शक्यता आहे.

Honor 9X आणि 9X Pro चे स्पेसिफिकेशन्स

Honor 9X आणि Honor 9X Pro स्मार्टफोन मध्ये 7nm Kirin 810 चिपसेटची वापर करण्यात आला आहे. Honor 9X मध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर Honor 9X Pro मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.59 इंचाचा आयपीएस एलईडी डिस्प्ले नॉचलेस डिजाइनसोबतच फुल्ल एचडी+ रिझॉल्युशन देण्यात आलं आहे.

या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमरा देण्यात आला आहे. Honor 9X मध्ये रिअर पॅनलवर 48 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल सेंसर असलेला ड्युअल कॅमरा सेटअपही देण्यात आला आहे. तर Honor 9X Pro च्या रिअर पॅनलमध्ये 48 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. Honor 9X आणि 9X Pro स्मार्टफोन्समध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Nokia : या दोन फोनच्या किमतीत भरघोस कपात

OnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, ‘हे’ आहेत खास फीचर्स

पुढच्या वर्षी नोकियाचा स्वस्त 5G फोन लाँच होणार

आता फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबलाही आधार कार्ड लिंक होणार?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.