AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ChatGPT च्या सगळ्या चॅट्स एकाच वेळी कशा डिलीट कराल? ही सोपी ट्रिक वापरा

ChatGPT चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकजण यावर वैयक्तिक माहिती किंवा खासगी प्रश्न विचारतात. त्यामुळे, तुमची प्राइवेसी जपण्यासाठी आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ChatGPT ची हिस्ट्री कशी डिलीट करावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

ChatGPT च्या सगळ्या चॅट्स एकाच वेळी कशा डिलीट कराल? ही सोपी ट्रिक वापरा
ChatGPT HistoryImage Credit source: Unsplash/Freepik
| Edited By: | Updated on: Aug 15, 2025 | 12:44 AM
Share

आजच्या काळात OpenAI चा लोकप्रिय चॅटबॉट ChatGPT जगभरात मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. अनेकजण गुगलऐवजी आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ChatGPT चा वापर करतात. कारण तो एका प्रश्नाचे थेट आणि अचूक उत्तर देतो, ज्यामुळे वेळ वाचतो. अनेक लोक या चॅटबॉटचा वापर वैयक्तिक कामांसाठीही करतात, जसे की ईमेल लिहिणे किंवा काही खासगी प्रश्न विचारणे.

जर तुम्हीही ChatGPT चा वापर अशा कामांसाठी करत असाल, तर तुमची सर्च हिस्ट्री कशी डिलीट करावी, हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. चला, मोबाईल आणि वेबवर ChatGPT ची हिस्ट्री डिलीट करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.

मोबाईलवर ChatGPT ची सर्च हिस्ट्री कशी डिलीट कराल?

मोबाईलवर हिस्ट्री डिलीट करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

स्टेप 1: तुमच्या स्मार्टफोनमध्ये ChatGPT ॲप उघडा.

स्टेप 2: टॉप राइट कॉर्नरमध्ये दिसणाऱ्या दोन आडव्या रेषांच्या (lines) आयकॉनवर क्लिक करा.

स्टेप 3: इथे तुम्हाला ChatGPT आणि Explore GPT च्या खाली तुमची सर्च हिस्ट्री दिसेल. तुम्ही विचारलेले सर्व प्रश्न इथे पाहू शकता.

स्टेप 4: ही हिस्ट्री डिलीट करण्यासाठी, तळाशी तुमच्या प्रोफाइलच्या बाजूला असलेल्या तीन डाॅट्सवर क्लिक करा.

स्टेप 5: आता ‘Data Controls’ या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 6: त्यानंतर उघडणाऱ्या नवीन विंडोमध्ये तुम्हाला ‘Clear Chat History’ चा पर्याय दिसेल. यावर क्लिक करताच तुमची संपूर्ण हिस्ट्री डिलीट होईल.

वेबवर (Web) ChatGPT ची सर्च हिस्ट्री कशी डिलीट कराल?

जर तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर ChatGPT वापरत असाल, तर हिस्ट्री डिलीट करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

स्टेप 1: ChatGPT च्या वेब व्हर्जनमध्ये लॉग इन करा.

स्टेप 2: वरच्या उजव्या कोपऱ्यात (top right corner) दिसणाऱ्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.

स्टेप 3: आता ‘Settings’ या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 4: ‘Settings’ मध्ये ‘General’ या पर्यायावर जा.

स्टेप 5: या सेक्शनमध्ये खाली तुम्हाला ‘Delete All Chats’ चा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही एकाच वेळी तुमची संपूर्ण हिस्ट्री डिलीट करू शकता.

ही सोपी पद्धत वापरून तुम्ही तुमचा डेटा आणि तुमची प्राईवेट माहिती सुरक्षित ठेवू शकता.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.