AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Instagram अकाउंट बॅन झालं तर ते रिकव्हर कसं करायचं? ‘हा’ आहे सोपा मार्ग

तुमचे इंस्टाग्राम अकाउंट बॅन किंवा डिसेबल झाले तर तुम्हाला त्रासाचा सामना करावा लागू शकते. मात्र बॅन झालेले अकाउंट रिकव्हर करणे शक्य आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

Instagram  अकाउंट बॅन झालं तर ते रिकव्हर कसं करायचं? 'हा' आहे सोपा मार्ग
insta ban
| Updated on: Jun 18, 2025 | 9:34 PM
Share

भारतासह जगभरातील देशांमध्ये मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यामुळे सोशल मीडियाचाही वापर वाढला आहे. सोशल मीडिया वापरणारे लोक मोठ्या प्रमाणात इंस्टाग्रामचा वापर करतात. इंस्टाग्राम हे फक्त एक सोशल मीडिया अॅप नसून ते उत्पन्न आणि ओळखीचे एक मोठे साधन बनले आहे. त्यामुळे जर तुमचे इंस्टाग्राम अकाउंट बॅन किंवा डिसेबल झाले तर तुम्हाला त्रासाचा सामना करावा लागू शकते. मात्र बॅन झालेले अकाउंट रिकव्हर करणे शक्य आहे, आज आम्ही तुम्हाला अकाउंट रिकव्हर कसे करायचे याबाबत माहिती जाणून घेऊयात.

इंस्टाग्रामवर अनेकदा नको ती माहिती व्हायरल होत असते. त्यामुळे अनेक खाती बॅन केली जातात. जर तुमचे इंस्टाग्राम अकाउंट कोणत्याही चुकीशिवाय बॅन झाले असेल किंवा तुमच्याकडून चुकून असे काही पोस्ट केले असेल ज्यामुळे अकाउंट सस्पेंड झाले असेल तर ते रिकव्हर करता येते. य़ासाठी पुढील प्रोसेस वापरा.

इंस्टाग्राम अकाउंट रिकव्हर करण्याचा सोपा मार्ग

  • इंस्टाग्राम अॅप किंवा वेबसाइटवर जा. लॉग इन करताना, जर तुमचे अकाउंट डिसेबल केले गेले असेल, तर Learn More किंवा Request a Review वर क्लिक करा.
  • यानंतर तुमची Request सबमिट करा. आता तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, युजर नेम, ईमेल आणि अकाउंटशी संबंधित माहिती विचारली जाईल.
  • येथे तुम्हाला असेही विचारले जाईल की, तुम्हाला असे का वाटते की अकाउंट चुकून बॅन केले गेले आहे? याचे खरे कारण लिहा.
  • तुमची आयडेन्टिटी व्हेरिफाय करा, यासाठी इंस्टाग्राम तुम्हाला आयडी प्रूफ (जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स) अपलोड करण्यास सांगू शकते.
  • यानंतर इंस्टाग्रामकडून ईमेलची वाट पहा. फॉर्म सबमिट केल्यानंतर, 3 ते 7 दिवसांत इंस्टाग्रामकडून एक ईमेल येईल. ज्यात तुमचे खाते रिकव्हर झाले की नाही याची माहिती सांगेल.

जर अकाउंट हॅक झाले असेल तर काय करायचे?

जर तुमचे अकाउंट हॅक झाले असेल, तर https://www.instagram.com/hacked या लिंकवर जा. तुमची माहिती एंटर करा आणि खाते अकाउंट झाले आहे असे सांगा. इंस्टाग्राम तुम्हाला सिक्युरिटी कोड पाठवेल, यामुळे तुम्हाला तुमचे खाते परत मिळू शकेल.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.