Hyundai Car Discount: ह्युंदाई कंपनीचा बंपर धमाका, विवध कार खरेदीवर मिळवा तब्बल 1.5 लाखांपर्यंत डिस्काउंट

डिस्काऊंटची ही ऑफर 31 मार्च 2021 पर्यंत सुरु असून कंपनी तर्फे सँन्ट्रो, ग्रँड i10 Nios, ऑरा, अ‌ॅलांट्रा और कॉना EV अशा कारवर 1.5 लाखांपर्यंतची सूट देत आहे. (hyundai car company discount)

Hyundai Car Discount: ह्युंदाई कंपनीचा बंपर धमाका, विवध कार खरेदीवर मिळवा तब्बल 1.5 लाखांपर्यंत डिस्काउंट
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 11:08 PM

मुंबई : कार निर्मिती क्षेत्रात आघाडीची कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्युंदाई (Hyundai India) या कंपनीने एक खास ऑफर आणली आहे. ही कंपनी आपल्या सिलेक्टेड कारवर बंपर डिस्काऊंट देत आहे. डिस्काऊंटची ही ऑफर 31 मार्च 2021 पर्यंत सुरु असून कंपनी तर्फे सँन्ट्रो, ग्रँड i10 Nios, ऑरा, अ‌ॅलांट्रा और कॉना EV अशा कारवर 1.5 लाखांपर्यंतची सूट देण्यात येत आहे.

ह्युंदाई ईंडियाने (Hyundai Car Offers) आपल्या वेगवेगळ्या कारवर बंपर ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर 31 मार्च 2021 पर्यंत असून कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट प्रॉफिट, फायनान्स बोनस तसेच इतर प्रकारचे डिस्काउंट यांचा यात समावेश आहे.  त्यासोबतच मेडिकल प्रोफेशनल्स, सिलेक्टेड कॉर्पोरेट कंपन्या, एसएमई उद्योजक, शिक्षक आणि चार्टर्ड अकाउंटन्ट्स यांच्यासाठीसुद्धा ही ऑफर असेल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना 8,000 रुपयांची स्पेशल सूटसुद्धा दिली जाणार आहे.

या गाड्यांवर बंपर ऑफर

  1. ह्युंदाई अँन्टी-लेवह हॅचबॅक सेंट्रो (Hyundai Santro) : या कारवर ह्युंदाईच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिल्याप्रमाणे 50,000 रुपयांची सवलत देण्यात आली आहे. यामध्ये रोख डिस्काउंट 30,000 रुपये, एक्सचेंज ऑफरसाठी 15,000 रुपये आणि कॉर्पोरेट डिस्काऊंट म्हणून 5,000 रुपये सूट असेल.

2) Hyundai Era : या कारसाठी 20,000 रुपयांची कॅशबॅक ऑफर आहे.

3) Hyundai Grand i10 NIOS : ही कार खरेदी करण्यासाठीसुद्धा ह्युंदाई कंपनीने बंपर ऑफर जारी केली आहे. ही कार खरेदी केल्यानंतर एकूण 60,000 रुपयांची सूट मिळू शकते. यामध्ये एक्सचेंज ऑफर म्हणून 45,000 सूट, रोख 10 हजारांची सूट आणि कॉर्पोटेर डिस्काउंट म्हणून 5 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे.

4) कार निर्मीती करणारी कंपनी ह्युंदाईने Hyundai Aura : ही कार खरेदी केल्यानंतर एकूण 70,000 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट जाहीर केले आहे. ऑरा सबकॉम्पॅक्ट सेडान Hyundai Aura ही कार खरेदी केल्यानंतर कॅश डिस्काउंट म्हणून 50 हजार रुपये सूट दिली जाईल. तसेच एक्सचेंच बोनस म्हणून 15,000 आणखी कमी होतील. तसेच कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणून आणखी 5,000 रुपयांचा फायदा होऊ शकतो. अशी एकूण 70 हजार रुपयांची सूट तुम्हाला ऑरा सबकॉम्पॅक्ट सेडान Hyundai Aura ही कार खरेदी केल्यानंतर मिळू शकेल.

5) Hyundai Elantra : या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या अशा दोन्ही प्रकारामध्ये जवळपास 1 लाख रुपयांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट म्हणून 70,000 रुपयांची सूट असेल तसेच 30,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरसुद्धा ही कार खरेदी करताना लागू होईल.

6) ह्युंदाई कंपनीच्या कोना इलेक्ट्रिक एसयूव्ही (Hyundai Kona electric SUV) या कारवर तर तब्बल 1.5 लाख रुपयांची बचत होऊ शकते. वेन्यू, वर्ना, i20, क्रेटा और टक्सन या कार मॉडेल्सवर कोणतीही सूट नाही.

इतर बातम्या :

बंपर ऑफर! 1.45 लाखांची बाईक अवघ्या 45 हजारात

Tata आणि Mahindra च्या ‘या’ गाड्यांवर 3 लाखांचा डिस्काऊंट

इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘या’ शहरात 100 नवे चार्जिंग स्टेशन उभारणार, राज्य सरकारचा पुढाकार

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.