AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील ‘या’ लोकप्रिय Hyundai कारचे फीचर्स कमी होणार, कंपनीचा मोठा निर्णय

ह्युंदाय (Hyundai) कंपनी त्यांची लोकप्रिय कार क्रेटामधून 4 फीचर्स कायमचे काढून टाकत आहे. (Hyundai going to reduce 4 Features from Creta)

भारतातील 'या' लोकप्रिय Hyundai कारचे फीचर्स कमी होणार, कंपनीचा मोठा निर्णय
Hyundai Creta
| Updated on: May 10, 2021 | 11:24 PM
Share

मुंबई : ह्युंदाय (Hyundai) कंपनीची सर्वात लोकप्रिय कार क्रेटा ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. आता कंपनी या वाहनातून 4 फीचर्स कायमचे काढून टाकत आहे. कंपनी एंट्री लेव्हल ई ग्रेडमधील 4 महत्त्वाचे फीचर्स काढून टाकणार आहे. यात लगेज, लँप, पॅसेंजर सीटबॅक पॉकेट, इलेक्ट्रिकली अ‍ॅडजेस्टेबल विंग मिरर आणि ORVMs वरील टर्न इंडिकेटरचा समावेश आहे. (Hyundai going to reduce 4 Features from Creta)

या व्यतिरिक्त, कंपनी EX, S, SX आणि SX(O) ट्रिममध्ये काही नवीन फीचर्स जोडणार आहे. वायरलेस Apple कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी एक्स आणि एस ग्रेडमध्ये जोडली जाईल, तर SX आणि SX (O) टॉप स्पेक ट्रिममध्ये कनेक्टिव्हिटी एनहांस्मेंट्स आधीपासूनच उपलब्ध आहे.

ह्युंदाय क्रेटाच्या विविध व्हेरिएंट्सच्या किंमती अलीकडेच वाढवण्यात आल्या आहेत. क्रेटाच्या किंमतीत 20,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तथापि, पेट्रोलच्या ई ट्रिमच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पण एंट्री लेव्हल डिझेल ई ची किंमत 13,000 रुपयांनी महाग केली आहे. मागील वर्षी पदार्पण करणारी ही 5 सीटर एसयूव्ही लोकांच्या पसंतीस उतरली आहे.

बाजारात तगडी स्पर्धा

सध्या या कारची किआ सेल्टॉस, टाटा हॅरियर, एमजी हेक्टर, निसान किक्स, रेनॉ डस्टर आणि इतर वाहनांबरोबर स्पर्धा सुरु आहे. क्रेटा ही कार तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 1.5 लीटर पेट्रोल, 1.5 लीटर डिझेल आणि 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे.

दमदार इंजिन

पेट्रोल इंजिन 115 PS ची शक्ती आणि 114Nm पीक टॉर्क देतं. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल किंवा सीव्हीटीसह येतं. त्याच वेळी, डिझेल इंजन 115 पीएसची शक्ती आणि 250 एनएम टॉर्क देतं. हे 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टरसह उपलब्ध आहे. तर टर्बो पेट्रोल 140 PS शक्ती आणि 242Nm टॉर्कसह येतं. हे इंजिन 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोसह जोडलेलं आहे.

संबंधित बातम्या

कोरोना रुग्णांसाठी Hyundai India कडून 20 कोटी रुपयांचं मदत पॅकेज, महाराष्ट्रासह पाच राज्यांना लाभ

Tata Safari Vs Hyundai Alcazar; कोणती SUV अधिक दमदार, कोणाचे फीचर्स टॉप क्लास?

नवी कार खरेदी करण्यापूर्वी भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ‘या’ टॉप 10 गाड्या पाहा

(Hyundai going to reduce 4 Features from Creta)

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.