AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Instagram Down : फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन, मॅसेज पाठवण्यात अडचणी, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

5 जुलै रोजी रात्री 8.30 वाजल्यापासून ते आजही इन्स्टाग्रामवर मॅसेज करण्यात समस्या आहे. फेसबुकवरही तोच प्रकार होतोय. अनेकांनी ट्विटरवर मीम्समधून संताप व्यक्त केलाय. कुणी आपल्याला आलेल्या आडचणींचा पाढा वाचला. तर काहींनी लवकरात लवकर ही अडचण दूर करण्याची मागणी केली.

Instagram Down : फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन, मॅसेज पाठवण्यात अडचणी, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव
इन्स्टाग्राम डाऊनImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Jul 06, 2022 | 3:10 PM
Share

मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्राम डाऊन (Instagram Down) झाले असून युजर्स वैतागले आहेत. त्यांनी ट्विटरवर अडचणींचा मीम्सच्या माध्यमातून पाढा मांडला आहे.  यूजर्सना (User) मॅसेज (Massage) पाठवण्यात आणि रिसिव्ह करण्यातही त्रास होत आहे. DownDetector ने देखील इन्स्टाग्राम डाउन असल्याची पुष्टी केली आहे. अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरवर तक्रार केली आहे आणि माहिती दिली आहे की, त्यांना जवळपास 12 तास संदेश पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात समस्या येत आहेत. 5 जुलै रोजी रात्री 8.30 वाजल्यापासून ते आजही इन्स्टाग्रामवर मॅसेज करण्यात समस्या आहे. DownDetector नुसार इंस्टाग्राम सुमारे 12 तासांसाठी डाऊन आहे. बातमी लिहेपर्यंत सोशल मीडियावर सेकंदा-सेकंदाला इन्स्टाग्राम, फेसबुक डाऊनचे मीम्स ट्विट केले जात होते. याबाबत यूजर्स इन्स्टाग्राम डीएमला ट्रेंड करत आहेत. या डाऊनबाबत यूजर्स ट्विटरवर अनेक प्रकारचे क्रिएटिव्ह मीम्स शेअर करत आहेत.

ट्विटरवर इन्स्टा डाऊन झाल्याचे ट्विट

फेसबुकवर मॅसेज जात नाहीत

अनेक फेसबुक युजर्सनी ट्विटरवर या अ‍ॅपच्या मेसेंजरच्या डाऊनिंगची माहितीही शेअर केली आहे. इंस्टाग्रामप्रमाणेच फेसबुक मेसेंजरवरही मॅसेज पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी 25 मे रोजी सकाळी 9.45 वाजल्यापासून इंस्टाग्राम बंद करण्यात आले होते. त्यानंतर यूजर्सना मॅसेज पाठवताना आणि रिसिव्ह करण्यात अडचणी येत होत्या. दिल्ली, जयपूर, बंगळुरू आणि लखनऊच्या बहुतांश युजर्सनी इन्स्टाग्राम डाऊन झाल्याची तक्रार केली.

ट्विटरवर इन्स्टा डाऊन झाल्याचे ट्विट

कधीपासून बंद?

5 जुलै रोजी रात्री 8.30 वाजल्यापासून ते आजही इन्स्टाग्रामवर मॅसेज करण्यात समस्या आहे. DownDetector नुसार इंस्टाग्राम सुमारे 12 तासांसाठी डाऊन आहे. बातमी लिहेपर्यंत काही युजर्सनी ट्विटरवर आपल्या त्रासाची माहिती दिली होती. काहींनी मजेशीर मीम्स देखील ट्विट केल्या. याबाबत यूजर्स इन्स्टाग्राम डीएमला ट्रेंड करत आहेत. या डाऊनबाबत यूजर्स ट्विटरवर अनेक प्रकारचे क्रिएटिव्ह मीम्स शेअर करत आहेत. तर अनेकांनी संताप व्यक्त केला. कुणी आपल्याला आलेल्या आडचणींचा पाढा वाचला. तर काहींनी लवकरात लवकर ही अडचण दूर करण्याची मागणी केली. आता हे कधी सुरळीत  होणार ते पहावं लागेल.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल