8GB/256GB, 64MP ट्रिपल कॅमेरासह iQOO Z3 बाजारात, किंमत 20 हजारांहून कमी

स्मार्टफोन निर्माता कंपनी iQOO ने आज आपला नवीन मिड-रेंज स्मार्टफोन iQOO Z3 लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन तीन व्हेरिएंट्समध्ये सादर केला आहे.

8GB/256GB, 64MP ट्रिपल कॅमेरासह iQOO Z3 बाजारात, किंमत 20 हजारांहून कमी
iQOO Z3

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी iQOO ने आज आपला नवीन मिड-रेंज स्मार्टफोन iQOO Z3 लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 120Hz रीफ्रेश रेट असलेली स्क्रीन आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 768G SoC प्रोसेसर आणि 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची सुरूवातीची किंमत 19,900 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. (iQOO Z3 5G launches internationally with Qualcomm Snapdragon 768G SoC and 64MP camera)

iQOO Z3 च्या 6GB RAM आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 19,990 रुपये, 8GB RAM आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 20,990 रुपये आणि 8GB RAM प्लस 256GB व्हेरिएंटची किंमत 22,990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

हा फोन ऐस ब्लॅक आणि सायबर ब्लू या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन आजपासून Amazon या ई-कॉमर्स साईटवर उपलब्ध आहे. आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून या फोनची खरेदी केल्यास ग्राहकांना या फोनवर 1500 रुपयांची सूट मिळू शकते.

iQOO Z3 चे स्पेसिफिकेशन्स

iQOO Z3 स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचांचा IPS LCD FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. युजर्स हा फोन 60Hz, 90Hz, 120Hz रिफ्रेश रेटसह खरेदी करु शकतात किंवा स्मार्ट स्विच मोडवर सेट करु सकतात, जो आपोआप अॅप आणि त्याच्या वापरानुसार रिफ्रेश रेट स्विच करेल.

या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 768G SoC प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 5G इनेबल्ड आहे. सोबतच यामध्ये 8GB LPDDRX4 RAM आणि टॉप व्हेरिएंटमध्ये 256GB UFS 2.2 स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, याच्या एक्सटेंडेड रॅम फीचरद्वारे युजर्स या फोनच्या इंटर्नल स्टोरेजमधील 3 जीबी स्पेसचा रॅम म्हणून वापर करु शकतात.

या फोनमध्ये 4,400mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 55W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 11 वर बेस्ड FuntouchOS 11 वर चालतो

iQOO Z3 चा कॅमेरा

iQOO Z3 च्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास, त्याच्या रीयर पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात वॉटरड्रॉप नॉचमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ब्लूटूथ 5.1, एक यूएसबी टाईप-सी पोर्ट आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

इतर बातम्या

Realme कंपनी 20 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या स्वस्त फोन कधी उपलब्ध होणार

64MP कॅमेरा, 256GB स्टोरेजसह Infinix चे नवे स्मार्टफोन लाँच, किंमत 11 हजारांहून कमी

Vivo Y73 2021 भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या मिड-रेंज स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स

(iQOO Z3 5G launches internationally with Qualcomm Snapdragon 768G SoC and 64MP camera)