AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा फोन Waterproof आहे की Water Resistant? तुम्ही विकत घेतना ही चूक केली नाही ना

Waterproof Vs Water Resistant: मोबाईल घेणं आणि लगेच बदलणं हे काय प्रत्येकाला शक्य नसतं. त्यामुळे निदान दोन ते तीन वर्षे फोन व्यवस्थितरित्या चालेल असा कल असतो. पण हा फोन घेताना वॉटरप्रूफ की वॉटर रेसिस्टंट घ्यावा हे मात्र कळत नाही. अनेकदा यामुळे संभ्रम असतो. चला जाणून घेऊया या दोघांमधील अंतर

तुमचा फोन Waterproof आहे की Water Resistant? तुम्ही विकत घेतना ही चूक केली नाही ना
स्मार्टफोनImage Credit source: TV9 Network
| Updated on: May 06, 2025 | 7:55 PM
Share

इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा काही भरवसा नसतो. आज घेतलेली वस्तूही टिकेल की नाही याची गॅरेंटी नसते. त्यामुळे या वस्तू घेताना काळजी घेणं गजरेचं आहे. कोणताही स्मार्टफोन, घड्याळ किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना त्याच्या फीचरचा अभ्यास करूनच घेतली जातात. दुकानदारांने सांगितलं आणि घेतलं असं होत नाही. यासाठी त्या डिव्हाईसची शहनिशा केली जाते. तसेच त्याला किती रेटिंग मिळालं आहे याचा अभ्यास केला जातो. यापैकी एक फिचर आपण कायम पाहतो तो म्हणजे वॉटरप्रूफ आहे की वॉटर रेसिस्टंट.. अनेक कंपन्या आपलं प्रोडक्ट वॉटरप्रूफ किंवा वॉटर रेसिस्टंट असल्याचं सांगतात. पण या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे? हे अनेकांना माहिती नाही. वॉटर रेसिस्टंट मोबाईल पाण्यात टाकू शकतो का? वॉटरप्रूफ म्हणजे पाण्यात पूर्ण सुरक्षित असतो का? असे प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.

वॉटर रेसिस्टंट म्हणजे तुमच्याकडे असलेला डिव्हाईस पाण्यापासून काही अंशी वाचू शकतो. म्हणजेच पूर्णपणे सुरक्षित नाही. दुसरं वॉटरप्रूफ म्हणजे काय? जर तुमचं डिव्हाईस पाण्याच्या आतही गेलं तर त्याला काही नुकसान होतं नाही. त्यामुळे तुमच्या डोक्यात असलेली पहिली शंका दूर झाली. वॉटर रेसिस्टंटपेक्षा वॉटरप्रूफ डिव्हाईस घेणं चांगलं ठरेल. आता वॉटरप्रूफ आणि वॉटर रेसिस्टंट डिव्हाईस कसे तयार होतात? हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. तर यासाठी कंपन्या आयपी रेटिंग सिस्टमचा वापर करतात. म्हणजेच इनग्रेस प्रोटेक्शनच्या माध्यमातून कळतं डिव्हाईस पाणी आणि धुळीपासून किती सुरक्षित आहे.

जर तुमच्या स्मार्टफोनची रेटिंग आयपी67 आहे. तर तुमचा फोन काही काळ पाण्यात राहू शकतो. पण डिव्हाइसची रेटींग आयपीएक्स8 असेल तर डिव्हाईसला पाण्यात काहीच होणार नाही. मग आता कोणतं डिव्हाइस घेणं फायद्याचं ठरेल. तर ज्यांचं जाणं येणं पाण्याच्या ठिकाणी नाही. अशा लोकांनी वॉटर रेसिस्टंट फोन घ्यायला हरकत नाही. पण जे लोकं स्विमिंग किंवा आसपास पाणी असलेल्या ठिकाणी राहत असतील तर त्यांनी वॉटरप्रूफ डिव्हाइस घ्यावं. पण हे गोष्ट लक्षात ठेवा कोणतंही प्रोडक्ट हे 100 टक्के वॉटरप्रूफ नसतं. पाण्यात दीर्घकाळ राहिलं तर खराब होऊ शकतं.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.