AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IT Notice : X, Youtube सह Telegram रडारवर! IT मंत्रालयाने पाठवली नोटीस

IT Notice : केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला चांगलीच तंबी दिली आहे. मंत्रालयाने X, Youtube आणि Telegram ला नोटीस बजावली आहे. त्यामागे एक खास कारण आहे. त्यामुळे या तीनही प्लॅटफॉर्मला सज्जड दम भरला आहे. आयटी नियमांचे पालन करण्याची आठवण करुन देण्यात आली आहे.

IT Notice : X, Youtube सह Telegram रडारवर! IT मंत्रालयाने पाठवली नोटीस
| Updated on: Oct 06, 2023 | 7:04 PM
Share

नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : भारत सरकार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या नाराज आहे. भारतीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान खात्याने (IT Ministry) आता पुन्हा या प्लॅटफॉर्मला तंबी दिली आहे. IT Rules चे पालन करण्याची आठवण त्यांना करुन देण्यात आली आहे. मंत्रालयाने X, Youtube आणि Telegram ला नोटीस बजावली आहे. या तीनही प्लॅटफॉर्मला सज्जड दम भरण्यात आला आहे. त्यामागे एक खास कारण आहे. जर या नोटीसनंतर पण या प्लॅटफॉर्मने लागलीच कार्यवाही केली नाही तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, हे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. आईटी अधिनियमच्या कलम 66ई, 67, 67ए आणि 67बीच्या अंतर्गत या कंपन्यांना दोषी ठरवत दंड ठोठावण्यात येईल.

काय म्हटले मंत्रालय

इंटरनेटवर बाल लैंगिक शोषण संबंधीच्या पोस्टसंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे. मंत्रालयाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारची अशी नुकसानदायक माहिती आढळल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचा थेट इशारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिला आहे. आयटी अधिनियमच्या कलम 79 अंतर्गत ही कारवाई करण्यात येईल.

तर करा तयारी

मंत्रालयाने लहान मुलांच्या लैगिंक शोषणासंदर्भातील कंटेट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसावे अशी भूमिका घेतली आहे. जर कोणी अशा प्रकारचा कंटेट टाकल्यास, तो ओळखण्याचा आणि लागलीच ब्लॉक करण्याची व्यवस्था या प्लॅटफॉर्म करण्याच्या सूचना मंत्रालयाने दिल्या आहेत. त्यासाठी अल्गोरिदम सुधारण्याचे आणि त्यात बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर या नियमांचे पालन झाले नाही तर आयटी अधिनियम 2021 च्या नियम 3(1)(बी) आणि नियम 4(4) हे उल्लंघन मानण्यात येईल.

सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर जबाबदारी

आयटी मंत्रालयाने यासंदर्भातील जबाबदारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकली आहे. त्यामुळेच एक्स, युट्यूब आणि टेलीग्रामला नोटीस पाठवण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकाराचा बाल लैंगिक शोषणाचा कंटेट नसेल याची जबाबदारी या प्लँटफॉर्मनेच घ्यायची आहे. तसे न केल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा कडक इशारा मंत्रालयाने दिला आहे.

इंटरनेट सुरक्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न

आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी, सरकार इंटरनेट सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा सूर आळवला. आयटी अधिनियमातंर्गत सोशल मीडिया कंपन्यांना हा दणका देण्यात आला आहे. जर त्यांनी अशा पोस्टला प्रतिबंध घातला नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यांना आईटी अधिनियमच्या कलम 66ई, 67, 67ए आणि 67बीच्या अंतर्गत अश्लील साहित्याच्या प्रसारासाठी दोषी ठरवत दंड ठोठावण्यात येईल.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.