Jio च्या ढासू प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह LIVE क्रिकेट मॅच पाहा

जर तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल आणि तुम्हाला कोणताही सामना मिस करायचा नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Jio Cricket Plan)

Jio च्या ढासू प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह LIVE क्रिकेट मॅच पाहा
Jio-Plan
अक्षय चोरगे

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 08, 2021 | 8:15 AM

मुंबई : जर तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल आणि तुम्हाला कोणताही सामना मिस करायचा नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे, कारण आज आम्ही तुम्हाला जियोच्या (Jio) अशा काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत ज्यात तुम्ही क्रिकेटचे सर्व मोफत पाहू शकाल. सोबतच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट आणि एसएमसची सुविधादेखील मिळेल. (Jio launches 3 Cricket plans for users, watch unlimited Live cricket with unlimited calling sms and data free)

Reliance Jio च्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनसुर कंपनी तीन असे प्लॅन सादर केले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळेल. सोबत तुम्ही सर्व प्रकारचे क्रिकेट सामनेदेखील पाहू शकाल. या प्लॅन्सच्या किंमती 249 रुपयांपासून सुरु होतात.

Jio चा 249 रुपयांचा क्रिकेट प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज 100 SMS पाठवता येतील. सोबत दररोज 2GB डेटादेखील मिळेल. 2 जीबी डेटा संपल्यानंतर 64kbps च्या स्पीडने तुम्ही इंटरनेटचा वापर करु शकता.

Jio चा 599 रुपयांचा क्रिकेट प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज 100 SMS पाठवता येतील. सोबत दररोज 2GB डेटादेखील मिळेल. 2 जीबी डेटा संपल्यानंतर 64kbps च्या स्पीडने तुम्ही इंटरनेटचा वापर करु शकता.

Jio चा 2399 रुपयांचा क्रिकेट प्लॅन

कंपनीचा हा बेस्ट सेलर प्लॅन आहे. Jio च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज 100 SMS पाठवता येतील. सोबत दररोज 2GB डेटादेखील मिळेल. 2 जीबी डेटा संपल्यानंतर 64kbps च्या स्पीडने तुम्ही इंटरनेटचा वापर करु शकता.

क्रिकेट सामने कुठे पाहायचे?

जर तुम्ही यापैकी कोणताही प्लॅन घेतला असेल तर Jio TV वर तुमच्या जियो नंबरवरुन लॉगिन करा, त्यानंतर जियो क्रिकट चॅनेलवर तुम्ही लाईव्ह सामने पाहू शकाल. विशेष म्हणजे सध्या सुरु असलेल्या ‘इंग्लंड टूर ऑफ इंडिया’ या मालिकेचाही आनंद घेऊ शकता. यासह या तिन्ही प्लॅन्समध्ये Jio Movies, Jio Cinema, Jio Saavn, Jio Security सारख्या अॅप्सचंही मोफत सब्सक्रिप्शन देण्यात आलं आहे.

इतर बातम्या

एअरटेल, जिओ आणि व्हीआयचे बेस्ट प्लान, 56 दिवसांच्या वैधतेसह विनामूल्य पहा डिस्ने + हॉटस्टार, झी 5 प्रीमियम आणि प्राईम व्हिडिओ

इंटरनेटशिवाय WhatsApp वरुन व्हॉईस, व्हिडीओ कॉल करा, जाणून घ्या कसं असेल नवं फीचर

(Jio launches 3 Cricket plans for users, watch unlimited Live cricket with unlimited calling sms and data free)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें