अ‍ॅपल आयफोन 15 प्रो मॉडेलमध्ये LiDAR स्कॅनर फीचर ! कसं काम करतं जाणून घ्या

आयफोन म्हंटलं की तरुणांचा जीव की प्राण असतो. कारण या फोनमधील फीचर्सची सर्वाधिक भावतात. त्यामुळे येत्या आयफोन 15 सीरिजमध्येनवं काय असेल याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

अ‍ॅपल आयफोन 15 प्रो मॉडेलमध्ये LiDAR स्कॅनर फीचर ! कसं काम करतं जाणून घ्या
आयफोन 15 प्रो मॉडेलमधील नव्या फीचरची जोरदार चर्चा, LiDAR स्कॅनर नेमकं आहे तरी काय? समजून घ्याImage Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 4:16 PM

मुंबई : आयफोन 14 नंतर आता 15 मॉडेलबाबत जोरदार चर्चा रंगली. या आयफोनच्या नव्या मॉडेलमध्ये काय असेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आयफोन दरवर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच होतो. कंपनीने तारखेबाबतची अधिकृत माहिती दिली नसली तरी आजपासून सहा महिन्यांनी आयफोन 15 लाँच होईल, अशी शक्यता आहे. असं असलं तरी आयफोन 15 लाँच होण्यापूर्वी या फोनबाबत अनेक अफवा आणि चर्चा आधीच रंगू लागल्या आहेत. खासकरुन आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स मॉडेलबाबत सर्वाधिक चर्चा रंगत आहेत. नव्या माहितीनुसार आयफोन 15 प्रो मॉडेलमध्ये लिडार (LiDAR) स्कॅनर असण्याची शक्यता आहे.

मॅकरुमर्सच्या माहितीनुसार, सोनी कंपनीकडून आयफोनसाठी लिडार स्कॅनर प्रोव्हाईड केलं जाणार आहे. गुंतवणूकदारांसोबत शेअर केलेल्या एका संशोधन नोटमधून ही माहिती समोर आली आहे. बार्कलेज विश्लेषक ब्लेने कर्टिस आणि टॉम ओमॅली म्हणाले की, या वर्षाच्या शेवटी लाँच होणार्‍या आयफोन 15 प्रो मॉडेल्ससाठी सोनी लिडार स्कॅनरचा पुरवठा करू शकेल.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातील विश्लेषक मिंग-ची कुओ यांनीही हीच माहिती देत सांगितलं होतं की, सोनी आयफोन 15 प्रो मॉडेल्ससाठी लिडार स्कॅनर घटकांचा विशेष पुरवठादार म्हणून लुमेन्टम आणि विन सेमीकंडक्टर्सची जागा घेईल.

LiDAR म्हणजे काय?

लिडारचा पूर्ण नाव लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग असं अहे. लिडार एक प्रकारचं लेजर, स्कॅनर आणि जीपीएस रिसीवर आहे. खासकरुन या सिस्टमचा वापर विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये होतो. लिडारच्या माध्यमातून दुरून वस्तू मोजता येतात, तसेच त्याचं आकलन करता येते.यासाठी लेजरचा वापर होतो. त्यामुळे एखाद्या वस्तुचं आकारमान काढणं सोपं होतं. तसेच वस्तू किती लांब आहे याचाही अंदाज येतो.

आयफोन 15 सीरिज सप्टेंबर 2023 रोजी लाँच होईल असं सांगण्यात येत आहे. यामध्ये आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स यांचा समावेश असेल. खासकरून डायनामिक आयलँड आणि युएसबी सी टाईप पोर्ट असणार आहे. या मॉडेलमध्ये ए17 बायोनिक चिप असण्याची शक्यता आहे. तसेच प्रो मॉडेल टायटॅनियम फ्रेम, सॉलिड स्टेट व्हॉल्यूम आणि पॉवर बटण फीचर्ससह मिळेल.

अ‍ॅपल कंपनी आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस स्वस्तात आणण्याच्या प्रयत्नात आहे. सध्याच्या आयफोन 14 प्लसची सुरुवातीची किंमत 128 जीबी स्टोरेज बेस मॉडेलसाठी 89,900 रुपये आहे. तसेच आयफोन 14 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.