ई-सिम डिलिट झाला? काळजी करू नका! पुन्हा कसा मिळवायचा? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
आजकाल अनेकजण ई-सिम वापरत आहेत, पण कधीमधी तो फोनमधून डिलीट होतो आणि गोंधळ उडतो. अशा वेळी काय करावे हे समजत नाही. त्यामुळे हे स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन फॉलो करा आणि ई-सिम पुन्हा कसा मिळवता येईल, ते जाणून घ्या.

नवीन जमाना डिजिटलचा आहे आणि याच डिजिटल युगात सिमकार्डही आता ई-सिमच्या स्वरूपात वापरले जात आहे. पण जर कधी तुमचा ई-सिम मोबाईलमधून डिलीट झाला, तर घाबरू नका. यासाठी एक सोपी आणि अधिकृत प्रक्रिया आहे ज्याच्या मदतीने तुम्ही पुन्हा ई-सिम मिळवू शकता. जिओ किंवा एअरटेल वापरत असाल, तरीही ही प्रक्रिया अगदी सोपी आहे.
ई-सिम म्हणजे काय?
ई-सिम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक सिम, हे पारंपरिक सिमकार्डचे सॉफ्टवेअर स्वरूप आहे. यामध्ये कुठलाही फिजिकल कार्ड नसतो. ई-सिम मोबाईलच्या चिपमध्ये सॉफ्टवेअरच्या स्वरूपात इन्स्टॉल होतो. मात्र यासाठी तुमचा फोन ई-सिमला सपोर्ट करणे आवश्यक असते. आजच्या बहुतेक 5G फोन्समध्ये ई-सिमचा सपोर्ट असतो.
ई-सिम डिलीट झाल्यास काय कराल?
कधी कधी फोन रिसेट केल्यामुळे किंवा सिस्टीम एररमुळे ई-सिम डिलीट होतो. अशावेळी तुम्हाला तुमचा मोबाईल सेवा पुरवठादार म्हणजेच जिओ किंवा एअरटेलच्या स्टोअरला भेट द्यावी लागेल.
तेथे सर्वप्रथम तुम्हाला पुन्हा एकदा फिजिकल सिम इश्यू करून घ्यावा लागेल. पण लक्षात ठेवा, फिजिकल सिम चालू झाल्यावर सुरुवातीच्या 24 तासांपर्यंत SMS सेवा बंद असते. सुरक्षेच्या कारणास्तव ही पॉलिसी आहे.
नंतर ई-सिममध्ये कसे कन्व्हर्ट करावे?
जर तुम्ही Jio वापरत असाल तर:
- https://www.jio.com या जिओच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- तुमची ईमेल आयडी टाका व OTPद्वारे ती व्हेरिफाय करा.
- नंतर तुमचा EID नंबर टाका.
- पुन्हा एक OTP येईल, तो टाकून सबमिट करा.
- त्यानंतर +91 2235072222 या नंबरवरून कॉल येईल. कॉल उचलून दिलेल्या सूचनांनुसार ई-सिम विनंती कन्फर्म करा.
- जर कॉल उचलता आला नाही तर 199 वर RECALL लिहून मेसेज पाठवा.
जर तुम्ही Airtel वापरत असाल तर:
- तुमच्या मोबाईलवरून 121 वर eSIM <तुमचा ईमेल> असा SMS पाठवा.
- 121 वरून आलेल्या मेसेजला ‘1’ रिप्लाय करा.
- तुम्हाला एक कॉलद्वारे कन्फर्मेशन विचारले जाईल. होकार दिल्यावर QR कोड मेलद्वारे येईल.
- मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जा, ‘Mobile Network’ > ‘Add Data Plan’ निवडा.
- QR कोड स्कॅन करा आणि ई-सिम पुन्हा अॅक्टिव्ह करा.
महत्त्वाचं, ई-सिमसाठी आधार-आधारित व्हेरिफिकेशन लागते. त्यामुळे तुमची ओळख सुस्पष्ट असावी. ही प्रोसेस फिजिकल सिमपेक्षा अधिक सुरक्षित आणि कमीत कमी वेळ घेणारी आहे, पण ती पूर्णपणे सेवा पुरवठादारावर अवलंबून असते.
