25 लाख एअरटेल ग्राहकांचा डेटा लीक; आधार कार्ड क्रमांक आणि गोपनीय माहिती हॅकर्सच्या हाती?

यामध्ये ग्राहकांचे आधार कार्ड क्रमांक, घराचा पत्ता आणि इतर गोपनीय माहितीचा समावेश आहे. (Airtel customers numbers Aadhaar details data leaked)

25 लाख एअरटेल ग्राहकांचा डेटा लीक; आधार कार्ड क्रमांक आणि गोपनीय माहिती हॅकर्सच्या हाती?

नवी दिल्ली : भारतातील आघाडीची मोबाईल नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर असलेल्या एअरटेल कंपनीच्या ग्राहकांचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. रेड रॅबिट टीम या हॅकर्सच्या ग्रूपने ही माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. यामध्ये ग्राहकांचे आधार कार्ड क्रमांक, घराचा पत्ता आणि इतर गोपनीय माहितीचा समावेश आहे. (Airtel customers numbers Aadhaar details data leaked)

हॅकर्सच्या दाव्यानुसार, त्यांच्याकडे 25 लाखांपेक्षा जास्त युजर्सचा डेटा आहे. ही माहिती हॅकर्सना विकायची आहे. मात्र, हा हॅकर्सचा ग्रूप नेमका कुठला आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांनुसार, हॅकर्सनी एक वेगळे संकेतस्थळ तयार केले होते. मात्र, काही काळानंतर त्यांनी हे संकेतस्थळ बंद केले.

एअरटेल कंपनीचे स्पष्टीकरण

हॅकर्सच्या या दाव्यानंतर एअरटेल कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कंपनी आपल्या ग्राहकांच्या गोपनयी माहितीचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. आमच्या कोणत्याही ग्राहकाची माहिती चोरीला गेलेली नाही, असे एअरटेलकडून सांगण्यात आले.

हॅकर्सकडून देण्यात येणारी संपूर्ण माहिती खरी नाही. कारण यापैकी बहुतांश डेटा एअरटेल कंपनीचा नाही. आम्ही याबाबत संबंधित यंत्रणांना माहिती दिल्याचेही एअरटेलने सांगितले.

हॅकर्सचा दावा काय?

हॅकर्सनी प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट हा व्हीडिओ प्रदर्शित केला आहे. यामध्ये एअरटेलचा डेटाबेस एक्सिस करताना दाखवण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांची गोपनीय माहिती असल्याचा हॅकर्सचा दावा आहे.

विशेष म्हणजे हॅकर्सने एअरटेल सिक्युरिटी टीमशीही चर्चा केली. यात बिटकॉइनमध्ये 3500 डॉलर्स मिळविण्यासाठी कंपनीनेही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्याने हा डेटा वेबवर लीक करत विक्रीसाठी ठेवला असावा. यासाठी हॅकर्सने एक वेबसाईट तयार करत युजर्सचा डेटा नमुना म्हणून ठेवला आहे. सध्या ही वेबसाईट उपलब्ध नाही. (Airtel customers numbers Aadhaar details data leaked)

दरम्यान एअरटेलच्या डेटाबेसमधून कोणतीही माहिती लीक होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे किंवा एखाद्या सरकारी संस्थेकडून सुरक्षेच्या कारणास्तव जतन केलेला डेटाची चोरी झाली असावी, असे बोललं जात आहे.

लीक झालेल्या डेटामध्ये बहुतांश युजर्स हे जम्मू-काश्मीरमधील आहेत असे बोललं जात आहे. जम्मू-काश्मीरमधील अडीच लाख युजर्सचा डेटा लीक झाला आहे.

हॅकर्सने ज्या वेबसाईटवर डेटा अपलोड केला आहे, ती वेबसाईट सध्या बंद करण्यात आली आहे. मात्र ही वेबसाईट हॅकर्सने का बंद केली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच एअरटेलकडूनही याचे कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

संबंधित बातम्या :

युजर्सचा विरोध, तरीही मार्क झुकरबर्गकडून Whatsapp च्या नव्या Privacy policy चं समर्थन

प्रसिद्ध पॉर्न वेबसाईटचा डेटा चोरीला, 20 लाख युजर्सला झटका

Facebook वर UPI ट्रान्झॅक्शन डेटाचा एक्सेस नाही, WhatsAppचं स्पष्टीकरण

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI