6GB/128GB, 64MP कॅमेरासह Moto चे दोन दमदार स्मार्टफोन भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

6GB/128GB, 64MP कॅमेरासह Moto चे दोन दमदार स्मार्टफोन भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Moto G10 Power G30

मोटोरोला (Motorola) कंपनी भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टफोन लाँच करण्यास सज्ज आहे. (Motorola will launch Moto G10 Power, Moto G30)

अक्षय चोरगे

|

Mar 09, 2021 | 10:31 AM

मुंबई : मोटोरोला (Motorola) कंपनी भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टफोन लाँच करण्यास सज्ज आहे. कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि अनेक लीक्सनंतर मोटोरोलाने याबाबतची पुष्टी केली होती की, मोटो जी 30 (Moto G30) आणि मोटो जी 10 (Moto G10) हे दोन स्मार्टफोन 9 मार्च रोजी (आज) भारतीय बाजारात सादर केले जातील. हे स्मार्टफोन युरोपियन बाजारात यापूर्वीच लाँच केले आहेत. दरम्यान, मोटोरोला कंपनी मोटो जी 10 (Moto G10) या स्मार्टफोनची मोटो जी 10 पॉवर (Moto G10 Power) या नावाने भारतीय बाजारात विक्री करेल. (Motorola Moto G30 and Moto G10 launching today,check price and feature)

मोटो जी 30 (Moto G30) आणि मोटो जी 10 (Moto G10) लॉन्च करण्यापूर्वीच हे दोन्ही फोन फ्लिपकार्टवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत. हे स्मार्टफोन केवळ फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असतील. फ्लिपकार्टच्या लिस्टिंगमध्ये मोटोरोलाने मोटो जी 30 आणि मोटो जी 10 चे डिझाइन उघड केले आहे. हे स्मार्टफोन स्टॉक एंड्रॉयड 11 आउट ऑफ द बॉक्ससह असतील. मोटो जी 30 ची किंमत EUR 179.99 (सुमारे 15,900 रुपये) आहे तर मोटो जी 10 ची किंमत 149.99 EUR (सुमारे 13,300 रुपये) आहे. दरम्यान हे स्मार्टफोन युरोपच्या तुलनेत भारतात स्वस्त होतील, असं म्हटलं जात आहे. जी 30 दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे ज्यात पेस्टल स्काय आणि फँटम ब्लॅक या रंगांचा समावेश आहे, तर मोटो जी 10 अरोरा ग्रे आणि इरिड्स पर्ल कलरमध्ये लॉन्च केला जाईल.

फ्लिपकार्टवर मोटोरोलाने मोटो जी 30 आणि मोटो जी 10 बद्दल फारसा खुलासा केला नसला तरी हे फोन युरोपमध्ये आधीच उपलब्ध आहेत आणि त्याच वैशिष्ट्यांसह भारतात लाँच केले जातील, असं म्हटलं जात आहे.

Moto G30 मध्ये का असेल खास?

मोटो जी 30 मध्ये 6.5 इंचाचा HD + डिस्प्ले आहे, जो 720 × 1,600 पिक्सेलसह सादर केला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट 90 × 90 इतका हाय आहे. या फोनच्या फ्रंट पॅनलवर वॉटरड्रॉप नॉच आहे ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे. मोटो जी 30 स्नॅपड्रॅगन 662 एसओसी प्रोसेसरला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसह जोडलेला आहे. मायक्रोएसडी कार्ड वापरुन या फोनची स्टोरेज स्पेस वाढवता येऊ शकते.

या फोनच्या मागील बाजूस, क्वाड-कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि दोन 2-मेगापिक्सलचे मॅक्रो शॉट्स आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. स्मार्टफोनमध्ये 20W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

Moto G10 चे स्पेसिफिकेशन्स

मोटो जी 10 बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन मोटो जी 30 पेक्षा थोडा स्वस्त आहे. स्मार्टफोनमध्ये 60 हर्ट्झच्या रीफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. मोटो जी 10 स्नॅपड्रॅगन 460 SoC द्वारे 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज सपोर्टेड आहे. कॅमेरा सेटअपमध्ये, मोटो जी 10 मध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि दोन 2-मेगापिक्सलचे सेन्सर असलेला क्वाड-कॅमेरा सेटअप आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10Wचार्जिंगला सपोर्ट करते.

इतर बातम्या

मूनशॉट फीचरसह दमदार कॅमेरा, ‘या’ दिवशी लाँच होणार OnePlus 9, OnePlus 9 Pro

Flipkart Carnival Sale सुरु, स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काऊंट, आयफोनवर 10000 रुपयांची सूट

Jio युजर्ससाठी खुशखबर! IPL चे सामने मोफत पाहता येणार

(Motorola Moto G30 and Moto G10 launching today,check price and feature)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें