पडला तरी स्क्रीन फुटणार नाही, पाण्यात पडला तरी खराब होणार नाही, Nokia चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँच

नोकिया XR20 (Nokia XR20) भारतात लॉन्च करण्यात आला आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन मिलिटरी ग्रेड डिझाइनसह येतो. याचा अर्थ असा आहे की हा फोन खूप उच्च आणि खूप कमी तापमानात देखील सुरळीतपणे काम करेल.

पडला तरी स्क्रीन फुटणार नाही, पाण्यात पडला तरी खराब होणार नाही, Nokia चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँच
Nokia-XR20
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 7:10 PM

मुंबई : नोकिया XR20 (Nokia XR20) भारतात लॉन्च करण्यात आला आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन मिलिटरी ग्रेड डिझाइनसह येतो. याचा अर्थ असा आहे की हा फोन खूप उच्च आणि खूप कमी तापमानात देखील सुरळीतपणे काम करेल. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन 55 डिग्री ते 20 डिग्री तापमानापर्यंत सुरळीतपणे काम करू शकतो. तसेच, जरी हा फोन 1.8 मीटर उंचीवरून खाली पडला तरी या स्मार्टफोनला काहीही होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच हा फोन एक तासभर पाण्यात पडून राहिला तरी तो खराब होणार नाही. कंपनीचा दावा आहे की, या फोनला चार वर्षे ओएस अपडेट मिळत राहतील. (Nokia XR20 With Military-Grade Build, Launched in India, know Price and Specs)

स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप, ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट आणि 6.67 इंच फुलएचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्यात प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आला आहे. हा ड्युअल सिम स्मार्टफोन आहे आणि अँड्रॉइड 11 वर काम करतो. या फोनमध्ये 1,080 × 2,400 पिक्सेल रिझोल्यूशन देण्यात आले आहे. या फोनमध्ये युजर्सना 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस मिळेल.

Nokia XR20 ची बॅटरी

नोकिया XR20 हा 5G स्मार्टफोन आहे आणि यामध्ये 4630mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जरसह येते. हा फोन आयपी 68 वॉटर रेझिस्टंटसह येतो. यात 4G LTE, Bluetooth, WiFi 6 आणि 5G सह NFC सपोर्ट आहे. तसेच, यात 3.5 मिमी जॅक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने, यात साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, जो बायोमेट्रिक पद्धतीने फोन अनलॉक करण्याचे काम करतो.

नोकिया XR20 ची किंमत आणि लॉन्च ऑफर

नोकिया XR20 ची किंमत 46,999 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहेत. 20 ऑक्टोबरपासून हा फोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन ग्रेनाइट आणि अल्ट्रा ब्लू रंगात येतो. त्याची विक्री 30 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

Nokia XR20 चा कॅमेरा सेटअप

Nokia XR20 मध्ये बॅक पॅनेलवर ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, तर 13 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे, जो अल्ट्रा वाइड सेन्सर आहे. हा कॅमेरा सेटअप Zeiss ऑप्टिक्ससह येतो. तसेच या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर बातम्या

12GB/256GB, 50MP बॅक, 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo X70 स्मार्टफोन बाजारात, किंमत…

फेसबुकवर पोस्ट करताना विचार करा, नव्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई, पब्लिक फिगर्सवरील टीका रोखण्याचा कंपनीचा प्रयत्न

Xiaomi च्या स्लिम, लाइटवेट 5G फोनवर 1500 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

(Nokia XR20 With Military-Grade Build, Launched in India, know Price and Specs)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.