AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता ChatGPT बोलणार तुमच्याशी, माणसांसारखं! OpenAI ने दिली ‘ही’ जबरदस्त सर्विस फ्री!

OpenAI ने नुकतंच ChatGPT साठी एक नवीन आणि क्रांतिकारी फीचर सादर केलं आहे. ज्यामुळे आता वापरकर्ते ChatGPT सोबत फक्त टायपिंगनेच नव्हे तर थेट आवाजात संवाद साधू शकतात. तर काय आहे हे फीचर आणि कसं वापरायचं? जाणून घ्या सविस्तर.

आता ChatGPT बोलणार तुमच्याशी, माणसांसारखं! OpenAI ने दिली 'ही' जबरदस्त सर्विस फ्री!
chatgpt
| Edited By: | Updated on: Jun 26, 2025 | 11:49 PM
Share

ChatGPT बनवणारी कंपनी OpenAI गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांना पदावरून काढून टाकण्यात आल्याच्या बातम्यांनी तर टेक्नॉलॉजी जगात खळबळ उडवली होती. पण या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान, OpenAI ने आपल्या यूजर्ससाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे! ती म्हणजे त्यांच नविन ‘ChatGPT with Voice’ हे फीचर.

काय आहे ChatGPT with Voice फीचर?

या फीचरमुळे तुम्ही ChatGPT ला टाईप करण्याऐवजी थेट तुमच्या आवाजात प्रश्न विचारू शकता किंवा त्याच्याशी बोलू शकता. आणि गंमत म्हणजे, ChatGPT तुम्हाला उत्तरही एखाद्या माणसाप्रमाणेच, नैसर्गिक आवाजात देतो!

कसं वापरायचं हे फीचर?

1. तुम्हाला ChatGPT सोबत आवाजात बोलायचं असल्यास खालील स्टेप्स फॉलो करा:

2. ChatGPT चे अधिकृत अ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करा.

3. अ‍ॅप उघडल्यावर वरच्या बाजूला हेडफोनचं चिन्ह दिसेल, त्यावर टॅप करा.

4. आता तुम्ही थेट आवाजात ChatGPT शी संभाषण सुरू करू शकता.

OpenAI ने यासोबत एक व्हिडीओही शेअर केला आहे ज्यात एक व्यक्ती ChatGPT ला प्रश्न विचारते आणि ChatGPT उत्तर देतो तोही अत्यंत नैसर्गिक आवाजात!

टेक्नॉलॉजीच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल

ही सुविधा केवळ मनोरंजन किंवा माहितीपुरती मर्यादित नाही, तर शिक्षण, ग्राहक सेवा, दैनंदिन संवाद, इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये मोठी भूमिका बजावू शकते. OpenAI चा हा निर्णय AI सर्वांसाठी उपलब्ध करण्याच्या दिशेने एक मोठा टप्पा मानला जात आहे.

पूर्वी ही सोय केवळ प्रीमियम किंवा पेड वापरकर्त्यांसाठी मर्यादित होती

2023 च्या सप्टेंबर महिन्यात OpenAI ने ChatGPT व्हॉइस फीचर सुरू केलं होतं, मात्र तेव्हा ही सुविधा केवळ ChatGPT Plus सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांना उपलब्ध होती. यामध्ये युजर्सना त्यांच्या आवाजात ChatGPT शी संवाद साधता येत होता आणि नैसर्गिक आवाजात उत्तरं मिळत होती. परंतु आता OpenAI ने या निर्णयात मोठा बदल करत ही अत्याधुनिक सुविधा सर्वसामान्य, मोफत वापरकर्त्यांसाठीही खुली केली आहे, ज्यामुळे अधिक लोकांना AI चा सहज आणि सजीव अनुभव घेता येणार आहे.

ChatGPT Voice वापरताना घ्या ‘ही’ काळजी

1. तुम्ही ChatGPT ला विचारणारे प्रश्न किंवा माहिती वैयक्तिक असू शकते. त्यामुळे बँक डिटेल्स, पासवर्ड्स, आधार क्रमांक अशा संवेदनशील माहितीचा वापर टाळा.

2. तुम्ही ChatGPT ला विचारणारे प्रश्न किंवा माहिती वैयक्तिक असू शकते. त्यामुळे बँक डिटेल्स, पासवर्ड्स, आधार क्रमांक अशा संवेदनशील माहितीचा वापर टाळा.

3. हे फिचर वापरण्यासाठी इंटरनेट कनेक्शन लागणार आहे. नेटवर्क स्लो असेल, तर संवादात अडथळा येऊ शकतो.

4. गाडी चालवताना किंवा हात मोकळे नसताना वापर करत असल्यास, सुरक्षिततेसाठी हँड्सफ्री डिव्हाइस वापरा.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.