OnePlus 9 Series Launch : ढासू स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच लाँच होणार, उरले फक्त काही तास

वनप्लसने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, कंपनी आपला आगामी स्मार्टफोन वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो 23 मार्च रोजी (आज) लाँच करणार आहे.

OnePlus 9 Series Launch : ढासू स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच लाँच होणार, उरले फक्त काही तास
OnePlus 9 Series
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 7:40 AM

मुंबई : वनप्लसने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, कंपनी आपला आगामी स्मार्टफोन वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो 23 मार्च रोजी (आज) लाँच करणार आहे. तसेच वनप्लस 9 लाइट, वनप्लस 9R आणि वनपल्सचं स्मार्टवॉचदेखील लाँच केलं जाईल. वनप्लसने आपल्या अधिकृत घोषणेत म्हटले आहे की, फोनचे हार्डवेअर आणि कॅमेरा अधिक शक्तिशाली बनविण्यासाठी कंपनी Hasselblad बरोबर काम करत आहे. (OnePlus 9 series and oneplus smart watch is going to launch today 23 march, know price, features)

OnePlus कंपनी एका ग्लोबल व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये ही सिरीज आणि स्मार्टवॉच लाँच करणार आहे. या इव्हेंटचं थेट प्रक्षेपण कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर, OnePlus आणि OnePlus India च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल. YouTube वर आधीच हा इव्हेंट क्रिएट करण्यात आला आहे. ज्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता होईल. या कार्यक्रमाचे प्रसारण फ्रेंच, जर्मन, इटालियन, स्पॅनिश आणि इंग्लिश या भाषांमध्ये केलं जाईल. आज ही सिरीज ग्लोबली लाँच केली जाईल, उद्या म्हणजेच 24 मार्च रोजी चीनमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला जाईल. 30 मार्चपासून याचा पहिला सेल सुरु होईल.

दरम्यान, लाँचिंगपूर्वीच कंपनीने या फोनबाबत वेगवेगळे खुलासे केले आहेत. वनप्लसच्या या नव्या सिरीजबाबत नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार वनप्लस 9 वर दोन वर्षांची वॉरंटी दिली जाणार आहे. वनप्लसचे सीईओ पीट लाऊ यांनी याबाबतची पुष्टी केली आहे. दरम्यान, ही वॉरंटी जगभरातील ग्राहकांसाठी असणार आहे की, केवळ चिनी ग्राहकांसाठीच असणार, याबाबत पीट यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. बहुतांशी स्मार्टफोन कंपन्या केवळ 1 वर्षाच्या वॉरंटीसह स्मार्टफोन लाँच करत असतात, अशा परिस्थितीत वनप्लसचं हे पाऊल जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरेल, असं बोललं जात आहे.

दरम्यान, वनप्लसने म्हटलं आहे की, ते वनप्लस 9 सिरीजमध्ये कस्टम सोनी IMX789 सेन्सर वापरणार आहेत. हा सेन्सर प्रायमरी कॅमेराच्या रुपात उपलब्ध असेल. कंपनीने म्हटले आहे की, आतापर्यंत कोणत्याही वनप्लस डिव्हाइसमधील हा सर्वात अॅडव्हान्स मेन कॅमेरा सेन्सर असेल. नवीन सेन्सर हा जुन्या सेन्सर्सच्या तुलनेत 64 पटीने अधिक दमदार असेल. ज्याच्या मदतीने तुम्ही प्रत्येक रंग आणि प्रत्येक फोटो अधिक चांगल्या प्रकारे कॅप्चर करु शकाल.

मूनशॉट घेता येणार?

मूनशॉटबद्दल बोलायचे झाल्यास या सिरीजमधील स्मार्टफोन्समध्ये लाँग झूम लेन्स दिली जाऊ शकते. हे फीचर यापूर्वी सॅमसंग आणि हुवावे सिरीजमध्ये पाहिलं आहे. ही लेन्स 10X ऑप्टिकल झूमसह डिझाईन केलेली असते. या फोनचा कॅमेरा इतका दमदार असेल असा दावा सध्या करता येणार नाही, परंतु या कॅमेरांना टक्कर देऊ शकेल असा कॅमेरा देण्याचा प्रयत्न वनप्लस कंपनी करत आहे.

वनप्लस (OnePlus) कंपनी त्यांची नवीन फ्लॅगशिप वनप्लस 9 सिरीज 23 मार्चला लॉन्च करण्याची तयारी करत आहे. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, या वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत कंपनी नॉर्ड 2 (OnePlus Nord 2) हा स्मार्टफोनदेखील लाँच करू शकते. अँड्रॉयड सेंट्रलच्या मते, नॉर्ड 2 मीडियाटेकचा डायमेन्शन 1200 चिपसेट सपोर्टेड फोन असेल.

मीडियाटेकचा फ्लॅगशिप डायमेन्शन 1200 एसओसी चिपसेट 6 एनएम मॅन्युफॅक्चर रिंग प्रक्रियेवर आधारित एक ऑक्टा-कोर चिपसेट आहे, ज्याचा स्पीड जास्तीत जास्त 3 गीगाहर्ट्ज इतकी आहे. या चिपसेटमध्ये 5 जी आणि वायफाय 6 चा सपोर्ट मिळेल. हा स्मार्टफोन कॉर्टेक्स ए478 परफॉरमन्स कोअरसह सादर केला जाणार आहे. ज्याचा जास्तीत जास्त स्पीड 3.0 गीगाहर्ट्ज इतका असेल. तीन एक्स्ट्रा ए78 कोरचा स्पीड 2.6 गीगाहर्ट्झ इतका असेल.

अशी असेल वनप्लस 9 सिरीज

वनप्लस 9 बाबत अनेक लीक्सद्वारे वेगवेगळी माहिती आतापर्यंत समोर आली आहे. नुकत्याच लीक झालेल्या माहितीनुसार वनप्लस 9 स्नॅपड्रॅगन 888 SoC द्वारे चालणारा स्मार्टफोन असेल. यामध्ये OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro, OnePlus 9 Lite चा समावेश आहे. टिपस्टर TechDroider द्वारे मिळालेल्या माहितीनुसार वनप्लस 9 मध्ये एक 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 402 पीपीआय पिक्सेल डेन्सिटीसह 6.55 इंचांचा फुल-एचडी + (1080 x 2400 पिक्सेल) डिस्प्ले (Full HD+ Display) दिला जाण्याची शक्यता आहे.

वनप्लस स्मार्टवॉचचं डिझाईन आणि फीचर्स

स्मार्टवॉच लाँच करण्यापूर्वी, वनप्लसने पुष्टी केली आहे की त्यांचे हे वॉच हार्ट रेट मॉनिटर करेल. कंपनीने पोस्ट केलेल्या एका छोट्या व्हिडिओमध्ये असेही दर्शवले आहे की, हे डिव्हाईस वॉटरप्रूफ असेल. टीझरनुसार ते ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. कंपनी आश्वासन देत आहे की, डिव्हाइसमध्ये एक शानदार आणि लाईटवेट डिझाईन असेल. “एका टीझरमध्ये असे सुचवले आहे की स्मार्टवॉचमध्ये साईड बटण, रबर किंवा सिलिकॉन स्ट्रॅप आणि एक राऊंड डायल असेल.

वनप्लस वॉच गुगलच्या वेअर ओएससह येत नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. हे आरटीओएस-आधारीत ऑपरेटिंग सिस्टमवर चालते, जे युजर्सना चांगला परफॉर्मन्स आणि बॅटरी प्रदान करते. शुक्रवारी एका अहवालात वनप्लस वॉचची प्रमुख वैशिष्ट्ये लीक झाली आहेत. फिटनेस ट्रॅकर Sleep, Stress level,Blood Saturation, Heart rate monitor करण्यास सक्षम आहे. यामध्ये ऑटोमॅटिक वर्कआऊट डिटेक्शन फीचर आणि स्विमिंग मोडदेखील देण्यात आला आहे.

– वनप्लस वॉचमध्ये 4 जीबी स्टोरेज आणि 46 मिमी डायल असल्याचे म्हटले आहे. वनप्लस टीव्हीसाठी रिमोट म्हणून हे घड्याळ वापरता येईल.

– फास्ट चार्जिंग सपोर्टसह हे स्मार्टवॉच सादर करण्यात आलं आहे. 20 मिनिटांच्या चार्जिंगवर हे वॉच 7 दिवसांची बॅटरी प्रदान करते.

– हे सिल्व्हर आणि ब्लॅक अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार आपण वनप्लस वॉच वरून फोन कॉल करू किंवा उत्तर देऊ शकता.

– हे डिव्हाईस आपल्या फोनवरील नोटिफिकेशन देखील दर्शवू शकतं आणि म्युझिक कंट्रोल करु शकतं. हे वॉच एलटीई व्हेरिएंटमध्ये सादर केलं जाईल.

किंमत

वनप्लसच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, हे स्मार्टवॉच परवडणार्‍या किंमतीत सर्वोत्कृष्ट दर्जाचा अनुभव प्रदान करेल. कंपनी 10,000 रुपये किंमतीसह वनप्लस वॉच बाजारात आणण्याची शक्यता आहे. जर या सेगमंटमध्ये वेअरेबल्स लाँच केले गेले तर हे वॉच इव्हॉल्व, रियलमी वॉच एस प्रो आणि अमेझफिट या स्मार्टवॉचशी स्पर्धा करेल. कंपनीचा फिटनेस ट्रॅकर Amazon.in वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. वनप्लस वॉचची बहुदा वनप्लस इंडियाच्या अधिकृत साईटवरून विक्री केली जाईल.

इतर बातम्या

पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार हे स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Samsung Galaxy M12 चा धुमाकूळ, अमेझॉनवर सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोन्सच्या यादीत अव्वल

हजाराच्या चार्जरसाठी कोट्यवधींचा दंड, Apple ला ‘या’ देशाचा जोरका झटका

(OnePlus 9 series and oneplus smart watch is going to launch today 23 march, know price, features)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.