AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनप्लसचा स्वातंत्र्य दिन सेल 2026 लवकरच होणार सुरू, महागडे वनप्लस स्मार्टफोन्स मिळणार स्वस्तात

तुम्ही जर नवीन वनप्लस स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा इअरबड्स खरेदी करण्याची वाट पाहत असाल तर ही एक उत्तम संधी असू शकते. कारण वनप्लसचा स्वातंत्र्य दिन सेल 2026 लवकरच सुरू होणार आहे. या सेलमध्ये अनेक लोकप्रिय उपकरणे सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. चला तर मग या सेलबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

वनप्लसचा स्वातंत्र्य दिन सेल 2026 लवकरच होणार सुरू, महागडे वनप्लस स्मार्टफोन्स मिळणार स्वस्तात
OnePlus Independence Day Sale 2026 Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 04, 2026 | 3:43 PM
Share

वनप्लसने भारतात त्यांच्या स्वातंत्र्य दिन सेल 2026 ची घोषणा केली आहे. हा सेल 7 ऑगस्टपासून सुरू होईल, ज्यामध्ये कंपनीचे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, नॉर्ड सिरीज, टॅब्लेट्स आणि ऑडिओ उत्पादनांवर आकर्षक सवलती दिल्या जाणार आहेत. या सेलदरम्यान अनेक डिव्हाइस कमी किमतीत उपलब्ध असतील, तसेच निवडक बँक कार्डांवर नो-कॉस्ट ईएमआयचे पर्याय आणि काही टॅब्लेट्ससोबत मोफत ॲक्सेसरीजही मिळतील. चला तर मग या सेलमध्ये कोणत्या मॉडेलवर किती सवलत दिली जात आहे ते जाणून घेऊयात.

वनप्लसचा स्वातंत्र्य दिन सेल 7 ऑगस्टपासून सुरू होईल

वनप्लसने भारतात आपल्या स्वातंत्र्य दिन सेल 2026 ची घोषणा केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा सेल 7 ऑगस्टपासून सुरू होईल. फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, नॉर्ड सिरीज, टॅब्लेट्स आणि ऑडिओ उत्पादनांवर विशेष ऑफर्स दिल्या जातील. ग्राहक वनप्लस इंडिया वेबसाइट, ॲमेझॉन, वनप्लस स्टोअर ॲप आणि वनप्लस एक्सपीरियन्स स्टोअरच्या माध्यमातून या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. निवडक स्मार्टफोन्सवर 6 महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट ईएमआयचे पर्यायही उपलब्ध असणार आहे.

वनप्लस 15, 15आर आणि नॉर्ड सिरीजवर सवलत उपलब्ध असेल

सेल दरम्यान OnePlus 15R ची प्रभावी सुरुवातीची किंमत 59 हजार 999 रूपयांवरून 56 हजार 999 रूपयांपर्यंत कमी केली जाईल. OnePlus 13S हा फोन 54 हजार 999 रूपयांऐवजी तुम्हाला 49 हजार 999 रूपयांच्या प्रभावी सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येणार आहे. OnePlus 15 स्मार्टफोन 85 हजार 999 रूपयांऐवजी तुम्हाला 81 हजार 999 रूपयांच्या प्रभावी सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होईल.

याव्यतिरिक्त या सेलमध्ये OnePlus Nord 6 ची प्रभावी सुरुवातीची किंमत 41 हजार 999 रूपये, OnePlus Nord CE 6 ची 31 हजार 999 रूपये, तर OnePlus Nord CE 6 Lite ची 23 हजार 749 रूपये OnePlus N6 ची 20 हजार 999 रूपये आणि OnePlus N6X ची 17 हजार 499 रूपये इतक्या कमी किमतीत हे स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आले आहे.

टॅब्लेट खरेदी केल्यावर तुम्हाला मोफत ॲक्सेसरीज मिळतील

वनप्लस टॅब्लेट खरेदीदारांसाठी विशेष ऑफर्स देखील देत आहे. या सेल दरम्यान वनप्लस पॅड 4 च्या खरेदीसोबत वनप्लस स्टायलो प्रो कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मोफत मिळेल. वनप्लस पॅड गो 2 च्या खरेदीसोबतही वनप्लस पॅड गो 2 स्टायलो मोफत मिळेल. याव्यतिरिक्त वनप्लस पॅड लाइटच्या खरेदीसोबत कंपनीकडून एक मोफत प्रोटेक्टिव्ह केस मिळेल.

ऑडिओ उत्पादनांवरही आकर्षक ऑफर्स

स्मार्टफोन आणि टॅब्लेट व्यतिरिक्त कंपनीने आपल्या ऑडिओ उत्पादनांच्या किमतीही कमी केल्या आहेत. OnePlus Buds 4, OnePlus Buds Pro 3, OnePlus Nord Buds 3R, OnePlus Nord Buds 4, OnePlus Nord Buds 4 Pro, Bullets Wireless Z3, आणि OnePlus BWZ2 ANC सारखी उत्पादने सेल दरम्यान कमी किमतीत उपलब्ध असतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही उत्पादने OnePlus वेबसाइट, Amazon, Flipkart, Blinkit, Myntra, OnePlus Experience Stores आणि निवडक पार्टनर स्टोअर्समधून खरेदीसाठी उपलब्ध असतील.

Follow Us
तर तुम्हाला गुंगी गुडिया म्हणणे योग्यच आहे!; सपकाळांचा सुनेत्रा...
Harshwardhan Sapkal | तर तुम्हाला गुंगी गुडिया म्हणणे योग्यच आहे!; सपकाळांचा सुनेत्रा पवारांवर पुन्हा हल्लाबोल
ओमराजे, सचिन अहिर थेट लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला; इतर खासदार...
ओमराजे, सचिन अहिर थेट लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला; इतर खासदार... दिल्लीत खरंच काही तरी घडतंय?
भाजपने घाबरण्याची गरज नाही, ED-CBI तुमचीच!; अभिजीत दिपकेंचा थेट टोला
Abhijeet Dipke | भाजपने घाबरण्याची गरज नाही, ED-CBI तुमचीच!; अभिजीत दिपके यांचा थेट टोला
मोठी बातमी! 6 महिन्यांच्या आतच... माणिकराव कोकाटेंच्या संदनिका वाटप...
मोठी बातमी! 6 महिन्यांच्या आतच... माणिकराव कोकाटेंच्या 1995 मधील सदनिका वाटप प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात काय घडलं?
गुंगी गुडियावरून राजकारण पेटलं!; मुंडेंनी काँग्रेसला दिलं सडेतोड उत्तर
Dhananjay Munde | गुंगी गुडियावरून राजकारण पेटलं!; धनंजय मुंडेंनी काँग्रेसला दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले...
धारशिवमध्ये तुफान राडा; जोरदार हाणामारी, गाड्या फोडल्या, दोन पक्ष...
Dharashiv | धारशिवमध्ये तुफान राडा; जोरदार हाणामारी, गाड्या फोडल्या, बड्या नेत्याचे समर्थक थेट... Video व्हायरल
धनुष्यबाणावर संकट? सुनावणीपूर्वी शिंदेंची मंत्र्यांसोबत बैठक
Shivsena | धनुष्यबाणावर संकट की दिलासा? सुनावणीपूर्वी शिंदेंची मंत्र्यांसोबत बंद दाराआड बैठक
सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया टीकेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
Rohit Pawar | सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया टीकेवर रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया! इंदिरा गांधींचं उदाहरण देत काय म्हणाले?
गुंगी गुडिया? ही काय भाषा? सुनेत्रा पवरांवरील काँग्रेसच्या टीकेवर...
गुंगी गुडिया? ही काय भाषा? सुनेत्रा पवरांवरील काँग्रेसच्या टीकेवर अंजली दमानियांचा संताप, आता थेट...
ब्लॅकलिस्ट कंपनीकडे परीक्षा नियोजन? पवारांनी उघड केली धक्कादायक...
Rohit Pawar | ब्लॅकलिस्ट कंपनीकडे परीक्षा नियोजन? रोहित पवारांनी उघड केली धक्कादायक क्रोनॉलॉजी, म्हणाले...