Pager : पेजरचा इतिहास आणि अंत, सर्वात आधी कोणी वापरला होता पेजर?

Pager History : लेबनॉन आणि सीरियामध्ये नुकत्याच झालेल्या पेजर स्फोटानंतर जगभरात पेजरची चर्चा आहे. लेबनॉनमधील दहशतवादी संघटना या पेजरचा वापर करत होती. इस्रायलने आपल्या सैनिकांचे पेजर हॅक करुन त्यात स्फोट घडवून आणल्याचा दावा हिजबुल्लाहने केला आहे. या स्फोटात 12 लोक ठार झाले आहेत तर सुमारे 3,000 लोकं जखमी झालेत.

Pager : पेजरचा इतिहास आणि अंत, सर्वात आधी कोणी वापरला होता पेजर?
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 5:18 PM

लेबनॉन आणि सीरियामध्ये झालेल्या सीरियल पेजर स्फोटांमुळे हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला मोठा फटका बसला आहे. ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3,000 हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. सीरियामध्ये देखील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पेजर स्फोटात जखमी झालेल्या अनेक लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा स्फोट इस्रायलने घडवून आणला असा आरोप होत आहे. लेबनीज संघटना हिजबुल्लाहने यावरुन इस्रायला इशारा देखील दिला आहे. पेजर स्फोट झाल्यापासून पेजर हा चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्येकजण याबद्दल चर्चा करत आहे. कदाचित भारतातील लोकांना पेजर्सची जास्त माहिती नसेल.

हिजबुल्लाहचे दहशतवादी लेबनॉनमध्ये पेजरचा मोठ्या प्रमाणावर वापर करत होते. पेजर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, जे संवाद  साधण्यासाठी वापरले जाते. पेजरच्या माध्यमातून तुम्ही लहान संदेश पाठवू किंवा प्राप्त करू शकता. पेजरची सुरुवात कशी झाली आणि नंतर त्याची लोकप्रियता कशी कमी होत गेली हे आपण जाणून घेऊयात.

पेजरचा इतिहास

पेजरचा एकामागे एक स्फोट झाल्यानंतर हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना याचा मोठा फटका बसला. हा स्फोट इस्रायलने घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केलाय. इस्रायल हा एक ज्यू देश आहे. पेजर हे उपकरणे वापरणारे पहिले लोकं पोलीस आणि ज्यू होते. 1921 मध्ये, पेजरसारखे उपकरण तयार केले गेले आणि अमेरिकेच्या डेट्रॉईट पोलिसांनी ते पहिल्यांदा वापरायला सुरुवात केली होती. पोलिसांच्या गाडीत रेडिओ सुसज्ज यंत्र बसवले होते. डेट्रॉईट पोलिसांनी अनेकदा गस्तीदरम्यान आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी या पेजरचा वापर केला होता.

One Way Police Radio Communications

वन-वे पोलीस रेडियो कम्युनिकेशन डिव्हाईस. (ethw.org/Rcolburn)

पहिला टेलिफोन पेजर

पेजरचा शोध १९४९ मध्ये इरविंग ‘अल’ ग्रॉस यांनी लावला होता. ग्रॉस हा एक ज्यू अभियंता होता आणि त्यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1918 रोजी टोरंटो, कॅनडा येथे झाला होता. ग्रॉसने बनवलेल्या पेजरला टेलिफोन पेजर देखील म्हणतात. 1950 मध्ये, न्यूयॉर्क सिटी ज्यू हॉस्पिटलने प्रथम हा पेजर वापरण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यावेळी या उपकरणाला पेजर म्हटले जात नव्हते. गंभीर मेसेज आणि त्वरित सूचना पाठविण्याच्या क्षमतेमुळे हे डिव्हाइस ओळखले गेले. टेलिफोन पेजर व्यतिरिक्त, ग्रॉसने वॉकी-टॉकी आणि सीबी रेडिओ सारख्या उपकरणांचेही पेटंट घेतले, जे 1970 मध्ये कालबाह्य झाले.

Pager Inventor

पेजरचा अविष्कार करणारे इरविंग ‘अल’ ग्रॉस.

मोटोरोलाने चमकवला ‘पेजर’

1959 मध्ये, मोटोरोलाने प्रथम ‘पेजर’ शब्द वापरण्यास सुरुवात केली. याच कंपनीने पेजरला जगभरात ओळख मिळवून दिली आणि पेजरचं उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी देखील बनली. 1960 मध्ये, जॉन फ्रान्सिस मिशेल यांनी मोटोरोलाच्या वॉकी-टॉकी आणि ऑटोमोबाईल रेडिओ तंत्रज्ञानाचे घटक एकत्र करून पहिले ट्रान्झिस्टोराइज्ड पेजर तयार केले होते.

मोटोरोला पुढील 40 वर्षापर्यंत पेजरच्या उत्पादनात अग्रेसर होता. त्यांनी PageBoy I लॉन्च केले. जे ग्राहकांसाठी पहिले टोन-ओन्ली पेजर आहे. टोन-ओन्ली पेजरसह, रिसीव्हरला फक्त एक टोन मिळतो.

Motorola Pageboy

मोटोरोला पेजबॉय पेजर. (facebook.com/pavekmuseum)

पेजरची किंमत

पेजर 1970 आणि 1980 च्या दशकात पेजर प्रचंड लोकप्रिय होते. त्यावेळी पेजरची किंमत 200 ते 300 डॉलर होती. याशिवाय, त्याच्या सेवेसाठी मासिक खर्च सुमारे 25 ते 30 डॉलर्स होता. रुग्णालये आणि व्यवसायांमध्ये काम करणाऱ्यांव्यतिरिक्त, फक्त काही लोक पेजर वापरत होते.

पेजर्सची संख्या

स्पोक या आणखी एका पेजर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या मते, 1980 मध्ये जगभरात पेजर वापरणाऱ्यांची संख्या सुमारे 32 लाख होती. संदेश पाठविण्याची श्रेणी मर्यादित होती, कारण ते केवळ रुग्णालये आणि डॉक्टरांसारख्या निवडक ठिकाणी खास लोक वापरत होते. यापूर्वी टोन व्यतिरिक्त पेजरवर ऑडिओ मेसेजची सुविधाही उपलब्ध होती.

अंकीय प्रदर्शन पेजर

अंकीय डिस्प्ले पेजर 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आले होते. या पेजर्सचा आवाज येत नव्हता. ज्यामुळे रुग्णालयांमध्ये शांतता राखण्यास मदत झाली. या पेजर्सने डिव्हाइसच्या शीर्षस्थानी एक नंबर प्रदर्शित केला, जो कॉल किंवा अंतर्गत कोड म्हणून काम करत होता.

Numeric Pager

न्यूमेरिक पेजर. (Comstock/Stockbyte/Getty Images)

अल्फान्यूमेरिक डिस्प्ले पेजर

1980 मध्ये, अल्फान्यूमेरिक डिस्प्ले पेजरने देखील बाजारात आला. याचा उपयोग डिजिटल नेटवर्कद्वारे मजकूर संदेशच्या रुपात पाठवण्यासाठी केला गेला. हे पेजर ऑपरेटर डिस्पॅच, डिव्हाइस IXO आणि संगणक अंतर्गत कार्य करते जे टेलिलोकेटर अल्फान्यूमेरिक प्रोटोकॉल (TAP) द्वारे अल्फान्यूमेरिक पेज पाठवते.

Alphanumeric Pager

अल्फान्यूमेरिक पेजर. (James Keyser/Getty Images)

टू-वे पेजर

टू-वे पेजर म्हणजे ज्यांच्याकडे QWERTY कीपॅड असतात आणि ते संदेश पाठवू शकतात तसेच कोणत्याही संदेशाला उत्तर देखील देऊ शकतात. टू-वे पेजर आजही अनेक मोठ्या हॉस्पिटल्स आणि आरोग्य यंत्रणांमध्ये वापरले जातात. या ठिकाणी टू-वे पेजिंग केले जाते, परंतु वन-वे पेजर्सची लोकप्रियताही कायम आहे.

पेजर उत्पादन कंपन्या

1. मोटोरोला : मोटोरोलाने पेजर बनवण्याच्या क्षेत्रात सर्वात मोठे योगदान दिले आहे. मोटोरोलाच्या सर्वात प्रसिद्ध पेजर मॉडेल्समध्ये ‘पेजबॉय’ आणि ‘ब्राव्हो’ यांचा समावेश आहे.

2. NEC कॉर्पोरेशन: NEC कॉर्पोरेशन देखील पेजर बनवणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे.

3. फिलिप्स: फिलिप्सने अनेक प्रकारचे पेजर बनवले आहेत, जे विविध वैशिष्ट्यांसह आणि डिझाइनसह आले आहेत.

4. Panasonic: Panasonic ने पेजरचे अनेक मॉडेल्स बनवले, जे विशेषतः जपान आणि आशियाई देशांमध्ये लोकप्रिय होते.

5. स्पोक: स्पोक ही एक मोठी पेजर कंपनी आहे, जी पेजिंग सेवा पुरवते आणि प्रीमियम पेजर बनवते.

भारतात पेजरचा वापर

बीपर म्हणून ओळखले जाणारे पेजर भारतातही लोकप्रिय आहे. पेजर भारतात 1995 मध्ये लॉन्च करण्यात आले, ज्यामध्ये 1991 च्या आर्थिक सुधारणांनी मोठी भूमिका बजावली. भारतात पेजर खरेदी करणे स्टेटस सिम्बॉल होते. पेजरच्या माध्यमातून एकमेकांना संदेश पाठवण्यात लोकांना खूप मदत मिळाली. मोटोरोला, मोबिलिंक, बीपीएल आणि पेजलिंक सारख्या कंपन्या भारतातील पेजर उद्योगात पुढे होत्या. त्यावेळी एका पेजरची किंमत सुमारे 10,500 रुपये होती.

Pager

पेजर. (japatino/Moment/Getty Images)

पेजरचा वापर का कमी झाला?

1994 मध्ये 6 कोटींहून अधिक लोकांनी पेजरचा वापर केला अशी नोंद आहे. मोबाईलच्या तुलनेत पेजर हे संवादाचे किफायतशीर साधन होते. पण नंतर मोबाईल फोन्स स्वस्त होत गेल्याने पेजर्सची लोकप्रियता कमी झाली. पेजरच्या तुलनेत, मोबाइल फोन अधिक चांगल्या आणि आणखी वैशिष्ट्यांसह लॉन्च होत गेले. संदेश पाठवण्याव्यतिरिक्त, थेट कॉल देखील केले जाऊ शकत होते. याशिवाय फोनवर इंटरनेटही वापरता येणार होते. हेच मुख्य कारण होते की लोकांनी पेजरऐवजी मोबाईलचा वापर करायला सुरुवात केली.

हिजबुल्लाहने पेजर का निवडले?

लेबनीज संघटना हिजबुल्लाहने आपल्या लोकांना टेलिफोन किंवा मोबाईल फोन वापरण्यास मनाई केली होती. इस्रायलकडून मोबाईल हॅक करून आपल्या संघटनेचे नुकसान होऊ शकते, अशी भीती हिजबुल्लाहला होती. म्हणूनच हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाहने आपल्या सैनिकांना पेजर वापरण्यास सांगितले होते.

पेजर मध्ये स्फोट

पेजर स्फोट मागे इस्रायलच असल्याचा दावा हिजबुल्लाहने केला आहे. स्फोट झालेले पेजर तैवानच्या गोल्ड अपोलो कंपनीकडून खरेदी करण्यात आले होते. कंपनीचे म्हणणे आहे की पेजर त्यांच्या ब्रँडचे होते पण ते हंगेरियन उत्पादक कंपनीने बनवले होते.

तैवानी माध्यमांनी नोंदवले की गोल्ड अपोलोसह 5,000 AP924 मॉडेल पेजर्सची ऑर्डर देण्यात आली आहे. लेबनॉनच्या बातम्यांनी दावा केला आहे की डिलिव्हरीपूर्वीच इस्रायलने या पेजर्समध्ये स्फोटके बसवली होती. विशिष्ट संदेश येताच पेजरचा स्फोट सुरू झाला मात्र, इस्रायलने याला दुजोरा दिलेला नाही.

पेजर आता कुठे वापरले जाते?

पेजरचा वापर केवळ आता हिजबुल्लाहच करत नाही, तर अमेरिका, ब्रिटनसारखे विकसित देशही पेजर वापरतात. यापैकी, पेजर विशेषतः रुग्णालये आणि आरोग्य उद्योगांमध्ये वापरले जातात. याशिवाय आपत्कालीन सेवा आणि काही विशेष कंपन्या संवादासाठी पेजरचा वापर करतात.

तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....