AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

POCO चा 12 GB रॅमचा स्वस्त फोन लाँच! Samsung आणि Motorola देणार टक्कर

poco ने त्यांच्या ग्राहकांसाठी कमी बजेटमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या नवीन 5G फोनची सुरूवातीची किंमत 10 हजार रूपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. या डिव्हाइसची किंमत, विक्री तारीख, लाँच ऑफर्स आणि फोनमध्ये उपल्बध असलेल्या सर्व फिचर्सबद्दल जाणून घेऊयात...

POCO चा 12 GB रॅमचा स्वस्त फोन लाँच! Samsung आणि Motorola देणार टक्कर
पोकोचा दमदार फोनImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 04, 2025 | 3:20 PM
Share

स्मार्टफोन चाहत्यांसाठी ए‍क आंनदाची बातमी आहे. त्यात तुम्हाला सुद्धा नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल पण बजेट कमी आहे, तर चिंता करू नका कारण pocoने अगदी बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केलेला आहे. तर तुम्हाला 10,000 रूपयांपर्यंतच्या बजेटमध्ये जास्त रॅम आणि उत्तम वैशिष्टयांसह नवीन फोन खरेदी करता येणार आहे. POCO m7 5G स्मार्टफोन कमी किंमतीत लाँच करण्यात आलेला आहे. या पोको स्मार्टफोनच्या महत्वाच्या वैशिष्टयांबद्दल बोलायचे झाले तर, हे डिव्हाइस 12 जीबी पर्यंत रॅम (व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह), स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि प्रायमरी रिअर कॅमेऱ्यात सोनी सेन्सर यासारख्या खास वैशिष्ट्यांसह लाँच करण्यात आले आहे.

या नवीनतम पोको मोबाईल फोनची विक्री कधी सुरू होईल, या फोनची किंमत काय आहे आणि या फोनसोबत कोणत्या लाँच ऑफर्स उपलब्ध असतील. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात

Poco M7 5G ची भारतातील किंमत

Poco ब्रँडचा हा फोन 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे, परंतु या किमतीत तुम्हाला हा फोन सेलच्या पहिल्याच दिवशी मिळेल. या किमतीत तुम्हाला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट असलेला फोन खरेदी करता येणार आहे. त्याच वेळी 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट असणाऱ्या फोनची किंमत 10,999 रुपये आहे.

फोनच्या सेलबद्दल बोलायचे झाले तर, या फोनची विक्री 7 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. सध्या, लाँच ऑफर्सबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही किंवा पहिल्या दिवसाच्या ऑफरनंतर हा फोन कोणत्या किमतीत उपलब्ध होईल याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

Poco M7 5Gस्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले : या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये 6.8 -इंचाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे जो 600 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्टसह 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

प्रोसेसर : स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या नवीनतम पोको स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 2 चिपसेट वापरण्यात आला आहे. तुम्हाला हा फोन 6 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह मिळेल, ज्याच्या मदतीने 6 जीबी रॅम 12जीबीपर्यंत वाढवता येईल.

कॅमेरा : फोनच्या मागील बाजूस तुम्हाला 50-मेगापिक्सेलचा सोनी प्रायमरी कॅमेरा मिळेल, तसेच २-मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 8-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल.

बॅटरी : Poco M7 5G या स्मार्टफोनमध्ये 5160 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, जरी हा फोन 18 W फास्ट चार्जला सपोर्ट करतो परंतु रिटेल बॉक्समध्ये कंपनीकडून 33 W चा चार्जर दिला जाईल.

Poco M7 5G ला हे स्मार्टफोन देणार टक्कर

पोको कंपनीचा 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचा हा 5G फोन मोटोरोला G35 5G, सॅमसंग गॅलेक्सी एफ06 5G, इन्फिनिक्स हॉट 50 5G, रेडमी ए4 5G आणि लावा ब्लेझ 2 5G स्मार्टफोनशी स्पर्धा होणार असून या सर्व 5G स्मार्टफोन्सची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि तुम्हाला हे फोन फ्लिपकार्टवरून सहज खरेदी करता येईल.

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.