मुंबई : भारत-चीन तणावाच्या (India-China tension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अॅपसह 118 चिनी अॅप बॅन केले. त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अॅप्लिकेशन बॅन केले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी PUBG Mobile गेम आता भारतात परतणार असल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हापासून हा गेम नेमका कधी लाँच होणार याची पबजी गेमच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान, पबजी गेम भारतात परतणार आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. हा गेम नव्या नावासह लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. कंपनीने या गेमसंबधीचा ट्रेलर यूट्यूबवर शेअर केला आहे. त्यामुळे या गेमच्या प्रतीक्षेत असलेल्या गेमर्सच्या उत्सुकता वाढल्या आहेत. (PUBG to relaunch in India as Battleground Mobile India)