व्हॉट्सअॅपवर डिलीट झालेले मेसेज आता वाचा पुन्हा ! एड्रॉईड फोनमध्ये ‘हे’ सेटिंग ऑन करा आणि जाणून घ्या
व्हॉट्सअॅपवरील डिलीट मेसेजसंदर्भातील उत्सुकता आता संपणार आहे कारण फक्त काही सेकंदात हे सेटिंग ऑन करून तुम्ही कोणते मेसेज डिलीट झाले ते पाहू शकता तेही कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड न करत, पण हे कसं शक्य आहे जाणून घ्या सविस्तर...

व्हॉट्सअॅप हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारं मेसेजिंग अॅप असून, भारतात तर प्रत्येक स्मार्टफोन युजरच्या वापराचा हा अविभाज्य भाग बनला आहे. मेसेज, फोटो, व्हिडीओ पाठवणं असो वा कॉलिंग किंवा व्हिडीओ कॉल्स सर्व गोष्टींसाठी वापरल्या जाणाऱ्या या अॅपमध्ये गोपनीयतेसंबंधी अनेक सोयीसुविधा दिल्या आहेत. यातीलच एक विशेष सुविधा म्हणजे ‘डिलीट फॉर एव्हरीवन’. या फीचरमुळे एखादा चुकीचा मेसेज पाठवल्यानंतर तो सेंडर आणि रिसिव्हर दोघांच्याही चॅटमधून हटवता येतो.
मात्र, एखादा मेसेज डिलीट केला की त्याचा मागमूस राहतो “This message was deleted” असा मजकूर चॅटमध्ये दिसतो. त्यामुळे अनेकजणांच्या मनात उत्सुकता निर्माण होते की, नेमका काय मेसेज पाठवण्यात आला होता? काही जण यासाठी थर्ड पार्टी अॅप्स वापरतात, जे फोनच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकतात. यामुळेच आता आम्ही तुम्हाला अशा एका सोप्या आणि सुरक्षित अॅंड्रॉइड फीचरबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही डिलीट झालेले टेक्स्ट मेसेज पुन्हा वाचू शकता.
कसे वापराल ‘Notifications History’ हे फीचर?
ही सुविधा अॅंड्रॉइड 11 किंवा त्याहून अधिक व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. या सुविधेमुळे फोनमध्ये आलेली सर्व नोटिफिकेशन्स अगदी डिलीट झालेले व्हॉट्सअॅप मेसेजेससुद्धा 24 तासांपर्यंत सेव्ह होतात. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा:
फोनच्या ‘Settings’ मध्ये जा.
‘Notifications’ या पर्यायावर टॅप करा.
‘Advanced settings’ किंवा ‘More settings’ मध्ये जा.
‘Notification History’ या पर्यायावर जा आणि टॉगल ऑन करा.
एकदा हे फीचर ऑन केल्यावर, जेव्हा कोणी मेसेज पाठवून डिलीट करतो, तेव्हा तो मेसेज तुम्हाला नोटिफिकेशनच्या इतिहासात दिसतो. तुम्ही ‘Notification History’ मध्ये जाऊन मागील 24 तासांतील हटवलेले मेसेज पाहू शकता.
काही मर्यादा लक्षात ठेवा
1. या सुविधेचा उपयोग फक्त टेक्स्ट मेसेजसाठी होतो.
2. फोटो, व्हिडीओ किंवा ऑडिओ मेसेजेससाठी ही सुविधा लागू होत नाही.
3. फीचर फक्त अॅंड्रॉइड 11 किंवा त्याहून नव्या व्हर्जनमध्येच चालू होते.
4. एकदा टॉगल ऑन केल्यानंतरच नोटिफिकेशन्स सेव्ह होऊ लागतात त्यामुळे आधीचे डिलीट मेसेज यात दिसणार नाहीत.
5. हा फिचर सध्या आयफोनसाठी उपलब्ध नाही
