भारतात ‘या’ दिवशी लॉंच होणार Realmeचा नवा 5जी स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

जानेवारी 2022 मध्ये आलेला रिअलमी 9 आय हा फोन स्नॅपड्रगन 680 चिपसेटसह होता. कंपनीने या फोनमध्ये 5 जी क्षमता वाढवण्यासाठी मीडियाटेक डायमेंसिटी प्रोसेसरचा वापर केला आहे.

भारतात 'या' दिवशी लॉंच होणार Realmeचा नवा 5जी स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 06, 2022 | 12:24 PM

Realme Smartphone : रिअलमी या कंपनीने भारतात नवा स्मार्टफोन (Realme Smartphone) लॉंच करण्याची तयारी केली असून खुद्द कंपनीद्वारेच ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवर त्याची माहिती शेअर करण्यात आली आहे. कंपनीने दरवेळेस आपल्या फोनमध्ये ग्राहकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे.  रिअलमीच्या या नव्या फोनचे नाव रिअलमी 9 आय 5जी (Realme 9I 5G) असे असेल. विशेष म्हणजे हा फोन 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होऊ शकेल.

या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 810 चिपसेटचा वापर करण्यात येईल. येत्या 18 ऑगस्ट रोजी दुपारी 11.30 वाजता हा फोन लॉंच होणार आहे. रिअलमी 9 आय हा स्मार्टफोन जानेवारी 2022मध्ये स्नॅपड्रगन 680 चिपसेटसह आला होता. मात्र आता 5 जी क्षमता वाढवण्यासाठी कंपनीने या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी प्रोसेसरचा वापर केला आहे. या फोनमध्ये बॅक पॅनेलवर कंपनीने ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

बायोमॅट्रिक अनलॉक सिस्टीम

या फोनमध्ये अनेक फीचर्स असून मागच्या बाजूस असणाऱ्या पॅनेलवर पॉवर बटन देण्यात आले आहे. त्यावर कंपनीद्वारे फिंगरप्रिंट स्कॅनर बसवण्यात आले असून, त्यामुळे बायोमॅट्रिक पद्धतीने मोबाईल अनलॉक करता येतो.

या फोनबद्दल रिअलमीने ट्विटर अकाऊंटवरून माहिती शेअर केली आहे.

https://twitter.com/realmeIndia/status/1555528601881444353/photo/1

जाणून घ्या काय आहेत नवी फीचर्स

रिअलमीच्या जुन्या स्मार्टफोनच्या व्हर्जनच्या तुलनेत नवे व्हेरिएंट वेगळे बनवण्यासाठी नवे डिझाइन वापरण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये लेझर लाइट डिझाइनही वापरण्यात आले आहे. रिअलमी 9 आय 5जी या मोबाईलच्या लॉंचिंगसाठी कंपनीने त्यांच्या ऑफिशिअल वेबसाइटवर नवीन मायक्रोसाइट तयार केली आहे, जी डायमेंसिटी 700 च्या तुलनेत 20 टक्के जास्त जलद आहे. त्यामध्ये ॲडव्हान्स 6 एनएम प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा नवा फोन 18 ऑगस्ट रोजी लॉंच करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें