256GB स्टोरेज, 64MP कॅमेरा, Realme चा आतापर्यंतचा सर्वात ढासू 5G फोन लाँच

Realme GT 5G फ्लॅगशिप स्मार्टफोन जागतिक स्तरावर लाँच करण्यात आला आहे. हा फोन आता शाओमी Mi 11 आणि सॅमसंग गॅलेक्सी एस 21 या स्मार्टफोनशी थेट स्पर्धा करेल.

256GB स्टोरेज, 64MP कॅमेरा, Realme चा आतापर्यंतचा सर्वात ढासू 5G फोन लाँच
Realme GT 5G
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 8:22 PM

मुंबई : Realme GT 5G फ्लॅगशिप स्मार्टफोन जागतिक स्तरावर लाँच करण्यात आला आहे. हा फोन आता शाओमी Mi 11 आणि सॅमसंग गॅलेक्सी एस 21 या स्मार्टफोनशी थेट स्पर्धा करेल. ग्लोबल लॉन्च इव्हेंटदरम्यान, रियलमीने लॅपटॉप, टॅब्लेट आणि रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर सारख्या नवीन डिव्हाईसेससह GT 5G हा फोन लाँच केला आहे. (Realme GT 5G flagship phone launched globaly with Snapdragon 888 chip)

रियलमीने मार्चमध्ये हा फोन चीनमध्ये लाँच केला होता. रियलमी GT म्हणजे Grand Tourers. रियलमीने GT 5G निळ्या आणि सिल्व्हर कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. तसेच याचं वेगन लेदर वर्जन रेसिंग यल्लो कलरमध्ये सादर करण्यात आलं आहे.

या फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास रियलमीने जाहीर केले की, त्याच्या GT 5G 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे 53 हजार रुपये इतकी आहे. तथापि, Amazon प्राइम ग्राहकांसाठी अर्ली बर्ड डिस्काऊंट देखील उपलब्ध आहे. 21 आणि 22 जूनच्या प्राइम डे सेलमध्ये ग्राहकांना ही सूट मिळेल. त्यावेळी ग्राहक रियलमी जीटी 5 जी 44 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. या फोनचं अजून एक व्हेरिएंट सादर करण्यात आलं आहे. या फोनचं 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 32 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु हे व्हेरिएंट केवळ अली एक्सप्रेसवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Realme GT 5G चे फीचर्स

फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट देण्यात आला आहे, जो कोणत्याही अँड्रॉइड फोनसाठी आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट आहे. त्याचवेळी फोनमध्ये 5 जी सपोर्टदेखील देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 6.43 इंचाचा फुल एचडी + सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल जो 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्लेमध्ये इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 12 जीबी LPDDR5 रॅम आणि 256 जीबी UFS 31 स्टोरेज आहे. फोन मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करतो. फोनमध्ये 4500mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये आपल्याला यूएसबी टाइप सी पोर्ट मिळेल. परंतु या फोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा दिली गेली नाही.

जबरदस्त कॅमेरा

या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 64 मेगापिक्सलचा सोनी सेन्सर, 8 मेगापिक्सल आणि मागील बाजूस 2 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक आहे. त्याच वेळी हा फोन डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स तसेच Hi Res ऑडिओसह येतो.

इतर बातम्या

Flipkart Sale : Narzo 30 Pro, Realme X7 आणि Moto चे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदीची संधी

धमाकेदार ऑफर! 14 हजारांचा 5G स्मार्टफोन 699 रुपयांत खरेदीची संधी

48MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरीसह दमदार स्मार्टफोन बाजारात, किंमत फक्त 7999

(Realme GT 5G flagship phone launched globaly with Snapdragon 888 chip)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.