Realme किफायतशीर 5G स्मार्टफोनसह 20 नवे फोन लाँच करण्याच्या तयारीत

Realme ने नुकतेच जाहीर केले आहे की, कंपनी 2024 पर्यंत 100 मिलियन अ‍ॅक्टिव्ह 5 जी स्मार्टफोन वापरकर्त्यांपर्यंत पोहोचू इच्छित आहे.

Realme किफायतशीर 5G स्मार्टफोनसह 20 नवे फोन लाँच करण्याच्या तयारीत
Realme

मुंबई : Realme ने नुकतेच जाहीर केले आहे की, कंपनी 2024 पर्यंत 100 मिलियन अ‍ॅक्टिव्ह 5 जी स्मार्टफोन वापरकर्त्यांपर्यंत पोहोचू इच्छित आहे. त्याचबरोबर कंपनीला येथे आपला 5 जी शेअर 70 टक्क्यांपर्यंत वाढवायचा आहे, पुढच्या वर्षी कंपनी 50 बाजारपेठांना टार्गेट करणार आहे. त्याचबरोबर कंपनी 2022 पर्यंत युजर्ससमोर 20 नवे 5G स्मार्टफोन सादर करण्याची योजना आखत आहे. सोबतच कंपनीने स्वस्तातला 5 जी फोन लाँच करण्याची योजना आखली आहे. कंपनी 7 हजार रुपयांच्या रेंजमध्ये एक 5 जी फोन लाँच करणार आहे. (Realme is planning a 5G phone for the masses that will cost around Rs 7,000)

Realme कंपनी लोकांना स्वस्त किंमतीत 5G डिव्हाइस वितरित करेल. येत्या काही वर्षांत Realme इथल्या लोकांना फक्त 7000 रुपयांमध्ये 5G फोन देईल. कंपनीने जीटी सिरीजअंतर्गत दोन नवीन फोन बाजारात नुकतेच सादर केले आहेत. तर दुसरा फोन जो कॅमेरा फ्लॅगशिप असेल तो लवकरच लाँच होईल. Realme कंपनी पुढील दोन वर्षांत 90% R&D रिसोर्सचा वापर करेल आणि 5 जी उत्पादन विकासात सुमारे 300 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करेल. ही कंपनी संपूर्ण आशियामध्ये मोठ्या प्रमाणात R&D केंद्रे स्थापित करणार आहे. तसेच युरोप, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतही R&D केंद्रांची स्थापना केली जाणार आहे.

Realme कंपनीने 13,999 रुपये इतक्या किंमतीत Realme 8 5G हा स्मार्टफोन याआधीच लाँच केला आहे. सध्या भारतात जे 5 जी फोन उपलब्ध आहेत. त्यातील सर्वात स्वस 5 जी फोन्सपैकी हा एक आहे. हा स्मार्टफोन 128 जीबी पर्यंतच्या ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो आणि यात डायनॅमिक रॅम एक्सपेंशन (डीआरई) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे जो बिल्ट-इन स्टोरेजला व्हर्च्युअल रॅममध्ये रूपांतरित करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. Realme चा हा फोन 90Hz डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे आणि त्यात ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्शन 700 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा तसेच एक होल-पंच डिस्प्ले आहे. हा फोन सायबर सिल्व्हर आणि सायबर ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.

Realme 8 5G के स्पेसिफिकेशन्स

  • ड्युअल-सिम (नॅनो) Realme 8 5G Android 11 वर Realme UI 2.0 वर चालतो आणि त्यात 90Hz रीफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा फुल-एचडी + (1,080 × 2,400 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • फोनमध्ये डीआरई तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे जो स्मूद मल्टीटास्किंगसाठी बिल्ट-इन स्टोरेजला व्हर्च्युअल रॅममध्ये रूपांतरित करतो.
  • स्मार्टफोनमध्ये एफ / 1.8 लेन्ससह 48 मेगापिक्सेल सॅमसंग GM1 प्रायमरी सेन्सर, एफ / 2.4 पोर्ट्रेट लेन्ससह 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आणि एफ / 2.4 मॅक्रो लेन्ससह 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
  • रियर कॅमेरा सेटअपला नाईटस्केप, 48M मोड, प्रो मोड, AI स्कॅन आणि सुपर मॅक्रोसारखे फीचर्स जोडलेले आहेत.
  • सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी या Realme 8 5G फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. ज्यामध्ये f / 2.1 लेन्सचा वापर करण्यात आला आहे. या फ्रंट कॅमेरामध्ये पोर्ट्रेट, नाइटस्केप आणि टाइमलॅप्स फीचर देण्यात आलं आहे.

इतर बातम्या

अ‍ॅमेझॉन देत आहे 10 हजार रुपयांपर्यंत गिफ्ट व्हाऊचर; बस्स.. तुम्हाला फक्त ‘ही’ किरकोळ प्रक्रिया करावी लागेल

मजेदार इन्स्टाग्राम रील्स आणि यूट्यूब व्हिडिओ बनवायचे आहेत; मग तात्काळ फोनमध्ये इन्स्टॉल करा हे 10 व्हिडिओ एडिटिंग अॅप्स

दरमहा फक्त 99 रुपये द्या आणि 4999 रुपयांचा हा ब्ल्यूटूथ स्पीकरला घरी आणा; जाणून घ्या टेलिकॉम कंपनीचा प्लान

(Realme is planning a 5G phone for the masses that will cost around Rs 7,000)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI